Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 12:01 AM IST

Today Horoscope in Hindi (1 Sep 2018): कशी आहे ग्रहांची स्थिती, कोणत्या ग्रह तुम्हाला करून देऊ शकतो धनलाभ, येथे वाचा

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  Today Horoscope (1 Sep 2018, आजचे राशिभविष्य): कसा राहील आजचा दिवस आणि कोणाचा होणार भाग्योदय. प्रेमात कोणाचा होणार वाद आणि कोण करणार रोमान्स. नोकरी आणि व्यापार कामात कोणाला लागणार लॉटरी. कसे राहील आरोग्य आणि कोणाला राहावे लागेल सावध. कोणत्या राशीचे उजळणार भाग्य आणि कोण होणार आज उदास. स्वतःच्या राशीनुसार जाणून घ्या, 1 Sep 2018 च्या संपूर्ण दिवसाची स्थिती रिलिजन दिव्य मराठीवर.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (1 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर
   

  पॉझिटिव्ह - तुमची ठरवलेली कामे पूर्ण होतील. प्लॅन न केलेलेही एखादे मोठे काम लवकर पूर्ण होऊ शकते. नशिबाची साथ मिळू शकते. तुमचे लक्ष पैशांच्या व्यवस्थेवर राहील. खरेदी होऊ शकते. पैसे कमावण्याची संधीही मिळू शकते. एखाद्या जुन्या वस्तूची खरेदी किंवा विक्री होऊ शकते. काही मित्र अचानक भेटू शकतात. मित्र, प्रेमी, अपत्य सर्वांसोबत तुमचे संबंध चांगले राहतील. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.


  निगेटिव्ह - गरजेपेक्षा जास्त खर्च करू नये. आक्रमक झाल्यामुळे चांगल्या गोष्टीही बिघडू शकतात. वाद होण्याचे योग जुळून येत आहेत. पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहू शकतात. सावध राहावे. मनाविरुद्ध खर्च होऊ शकतो.


  काय करू नये - मोबाईल, इंटरनेट इ. संचार साधनांवर खर्च करू नये.
   

  लव्ह - लव्ह लाइफसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील. जुन्या प्रेमाची भेट होऊ शकते. काही लोकांचे प्रेम प्रसंग पुढे जाऊ शकतात. जोडीदाराचे प्रेम मिळेल.


  करिअर - नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. पदोन्नती आणि धन लाभाचे योग जुळून येत आहेत. गुंतवणूक करताना सावध राहावे. विद्यार्थ्यांसाठी दिवस ठीक आहे. 


  हेल्थ - तुमच्या आरोग्यासाठी दिवस ठीक नाही. पोट किंवा कंबरेचा त्रास होऊ शकतो.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे वृषभ राशिफळ (1 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - ऑफिस वा फील्डमध्ये तुम्ही दिलेल्या सूचनेचा सन्मान होईल. काही जण तुमचे म्हणणे ऐकतील. पूर्ण उत्साहाने काम कराल. एखाद्या रचनात्मक कामात अपत्याचीही साथ मिळू शकते. आक्रामकतेला आवर घाला. बहुतांश लोक तुमच्यापासून प्रभावित होतील. अचानक तुमची भेट घेण्यासाठी कोणीतरी येईल. गूढ गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.


  निगेटिव्ह - विचार न करता कोणतेही काम केले नाही तर चांगलेच आहे. दिवसभर होणाऱ्या काही घटनांमुळे तुम्ही त्रस्त असाल. आज थोडे बेचैनही होऊ शकता. प्रेमी, जीवनसाथी किंवा परिवारातील एखाद्या सदस्याशी तुमचे खटके उडतील. नातेसंबंधातील गुंता वाढेल. आज एखाद्या सोबतच्या व्यक्तीला तुम्ही नाराज कराल. छोट्या प्रवासामुळे तुमच्या अडचणीत भर पडेल. एखाद्या विशेष कामानिमित्त प्रवासाचे योग बनत आहेत. तुमचा खर्च वाढेल.


  काय करावे - घर वा ऑफिसच्या टेबलवर एक फूल ठेवा.


  लव्ह लाइफ - जीवनसाथीच्या भावनांचा आदर करा. फिरायला जाण्याचा मूड झाल्यास जरूर जा.


  करिअर - बिझनेससाठी उत्तम दिवस. ऑफिसमध्ये कुणाशी वाद घालू नका. हाताखालच्या लोकांकडून मदत मिळेल. विद्यार्थी करिअरमध्ये पुढे जाऊ शकतात.


  हेल्थ - दुखापतीची शक्यता. आज खाण्या-पिण्यावर नियंत्रण हवेच.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे मिथुन राशिफळ (1 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या योग्यतेचा पूर्ण फायदा घेऊ शकता. एखाद्याकडून मदत हवी असल्यास, मिळेल. चंद्र तुमच्यासाठी शुभ आहे. धनलाभाचे योग आहेत. स्वतःच्या बळावर यश प्राप्त होऊ शकते. लोक तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार करू नका. सौदेबाजी आणि पैशांच्या बाबतीत तुम्हाला इतरांचे मनसुबे लक्षात येतील. मित्रांच्या मदतीने यश प्राप्त होऊ शकते. महत्त्वाची प्लॅनिंग करण्यासाठी हा काळ योग्य आहे.


  निगेटिव्ह - आज तुम्हाला थोडेसे सावध राहावे लागेल. काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात आणि यामुळे तणाव जाणवेल. तुमच्यावर जबाबदारीचे ओझे राहील. अचानक आव्हानात्मक स्थिती निर्माण होईल.


  काय करावे - मंदिरात कुंकू दान करावे.


  लव्ह - लव्ह प्रपोजलमध्ये यश प्राप्त होऊ शकते. पार्टनर तुमची मदत करेल. संबंध सुधारतील.


  करिअर - पैशांशी संबंधित काम सुरु होऊ शकतात. फायदाही होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील.


  हेल्थ - तोंडाचे आजार होऊ शकतात. जास्त गरम किंवा थंड खाऊ नये.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे कर्क राशिफळ (1 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): मदतीच्या स्वभावामुळे आज तुम्ही इतरांची मदत कराल. याचा फायदा तुम्हाला भविष्यात मिळेल. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील. नोकरी आणि बिझनेस, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - गुंतवणूक, खरेदी-विक्री, जमीनीच्या व्यवहारांसाठी आजचा दिवस चांगला असून कर्क राशीच्या लोकांना यातून फायदा होऊ शकतो. आज तुम्ही स्वतःत बदल घडवण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या खास कारणाने उत्साह राहील. आपल्या काम आणि करिअरवर लक्ष देणे योग्य. करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते. 


  निगेटिव्ह - ज्या व्यक्ती तुमच्या अतिशय जवळच्या आहेत, त्या तुमच्यावर थोड्या नाराज राहू शकतात. सावधगिरी न बाळगल्यास एखाद्या मित्रासोबत अनबन होऊ शकते. कौटुंबिक मतभेद होण्याचे योग आहेत. 


  काय करावे - पपई खा.


  लव्ह - जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. विचारपूर्वक गंमत करा.  वाणीवर संयम बाळगा.  


  करिअर - अडकलेली कामे मार्गी लागतील. अडकलेला पैसाही परत मिळण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी थोडा तणावाचा दिवस ठरु शकतो, पण यशदेखील मिळेल. 


  हेल्थ - प्रकृतीकडे लक्ष द्या. थकवा आणि कमी झोप झाल्याने त्रास होऊ शकतो.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे सिंह राशिफळ (1 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक उदार आणि मोठ्या मनाचे असल्यामुळे आज काही लोकांची मदत करतील. याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. या व्यतिरिक्त आज राग आणि चिडचिड करण्यापासून दूर राहावे. अन्यथा नुकसान होऊ शकते. आज तुम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - आपल्या राशीसाठी चंद्राची स्थिती चांगली आहे. आज आपल्याला केलेल्या कामांचे पूर्ण फळ मिळू शकते. आपले मन खूप सक्रीय राहील. भविष्याशी निगडीत काही चांगले संकेत मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वासाने केलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. आवश्यक कामांना स्वतः वेळ देण्याची गरज आहे. जबाबदारीच्या कामांवर सुद्धा आपल्याला पूर्णपणे लक्ष घालावे लागेल. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी दिवस चांगला आहे. आपले संबंध आणखी मजबूत होऊ शकतात. पैश्यांच्या बाबतीत सुरू असलेल्या काही अडचणी दूर होऊन उत्साह राहील. अडकलेली कामे पूर्ण होण्याचा योग आहे.


  निगेटिव्ह - आपला मूड काहीसा आक्रमक होऊ शकतो. आपण आसपासच्या लोकांशी हुज्जत घालणार असे संकेत आहेत. त्यामुळे, सावध राहा. काही लोक आपल्या कामात अडथळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात राहतील. आपण विचारांमध्ये गुंतलात तर जास्त अडकण्याची भीती आहे. आपल्याला थोडे सावध राहावे लागेल. बॉस किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीकडून काहीसा त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी छोटीशी समस्या राहील. 


  काय करावे - सीट कवर, बेडशीट आणि टेबल क्लॉथ चेंज करा

   
  लव्ह लाइफ - पार्टनरसोबत शांतता आणि ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करा. पार्टनर आपल्याकडे आकर्षित होऊ शकतो. 


  करिअर - आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. बिझनेस करण्यासाठी चांगला दिवस आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली नाही. यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. 


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत सावध राहा. आज काहीसा थकवा जाणवेल.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  1 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - सहकाऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. जेवढे मोठे मन ठेवाल तेवढ्या अडचणी कमी होतील. कौटुंबीक संबंधांना अधिक महत्त्व द्याल. अविवाहितांना एखादा विवाहाचा प्रस्तावही मिळू शकतो. एखादा मित्र किंवा व्यवसायातील भागीदार पैसा कमावण्याची नवी कल्पनाही सांगू शकतो. आई वडिलांपासून दूर राहत असाल तर घरी जाण्याचा योग आहे.


  निगेटिव्ह - कोणतीही जबाबदारी बळजबरी डोक्यावर घेतल्याच अडचणी वाढू शकतात. त्यामुळे तुमचा तणावही वाढू शकतो. चंद्र  गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानी आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात अडथळा येऊ शकतो. कामाचा ताणही वाढू शकतो. काही प्रकरणांत तुमची भूमिका अडचणीची ठरू शकते. सावध राहावे लागेल. प्रवासावर जास्त खर्च होऊ शकतो. एखाद्या अडचणीत अडकल्यानंतर गुंता अधिक वाढू शकतो. सावध राहा. तुमच्यावर खोटे खारोपही लागू शकतात. भावांचे सहकार्य मिळाले नाही तर त्रास होऊ शकतो. 


  काय कराल - पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा. 
   

  लव्ह - पार्टनरच्या संशयाला बळी पडू शकता. जराही खोटं बोलू नका अन्यथा नुकसान होऊ शकते. 


  करीअर - तुमची काही कामे अर्धवट राहू शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. अधिकारी किंवा मोठ्या लोकांच्या भेटी होतील. काही कामे खोळंबल्याने मूड खराब राहील. 


  हेल्थ - जुन्या आजारांनी त्रस्त राहू शकता. आरोग्याची काळजी घ्या. खाण्या पिण्याकडेही लक्ष ठेवा. 

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे तूळ राशिफळ (1 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीचे लोक आज काही गोष्टींमध्ये द्विधामनस्थितीत अडकू शकतात. कोणत्याही कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील. आरोग्य, धन-संपत्ती, कुतुकीब आणि व्यवसाय क्षेत्रामध्ये कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर.

   

  पॉझिटिव्ह - नोकरीच्या ‍ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. मनात रोमान्स किंवा प्रेमभावना जागृत होती. आपल्या जबाबदारीकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्रात काही बदल होण्याची शक्यता आहे. याचा तुम्हाला लाभ मिळू शकतो. नव्या संधी उपलब्ध होतील. रूटीन काम वेळेत पूर्ण कराल. प्रगती साधाल. 


  निगेटिव्ह - कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. विचारांवर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. आर्थिक अडचणीमुळे तणाव निर्माण होईल. बिझनेस किंवा नोकरीत जास्त वेळ द्यावा लागेल. काही लोकांना तुमचे बोलणे, वागणे खटकेल. त्यांच्याकडे दूर्लक्ष करा. कोण्याच्या आर्थिक व्यवहारात मध्यस्थी करू नका.  


  काय करावे - चंदनाचा टिळा कपाळावर लावा.
    

  लव्ह - लव्ह लाइफ उत्तम राहील. मोठा निर्णय घेऊ नकतात. जोडीदारासोबत मनतील गोष्ट शेअर करा.


  करिअर - नोकरी किंवा बिझनेसमध्ये नव्या ओळखी होती. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.


  हेल्थ - स्वास्थ उत्तम राहिल.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  वृश्चिक राशी, 1 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.

   

  पॉझिटिव्ह - तुम्ही नोकरी किंवा बिझनेसमध्ये काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न करु शकता. एखादा जवळचा व्यक्ती तुमची मदत करेल. नात्यांच्या बाबतीत तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल. चंद्र आज गोचर कुंडलीच्या सहाव्या स्थानावर राहिल. कामाच्या हिशोबाने तुम्ही खुप मेहनत कराल आणि तेवढेच महत्त्वाकांक्षी राहाल. तुम्ही आज एखादे काम नवीन पध्दतीने करण्याचा प्रयत्न करु शकता. अचानक किंवा तात्काळ गुंतवणूक करण्याचे प्रकरण तुमच्यासमोर येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत संपुर्ण दिवसाची प्लानिंग पहिलेच करुन ठेवा. 


  निगेटिव्ह - कौटुंबिक कारणांमुळे कामावरुन तुमचे लक्ष विचलित होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापुर्वी योग्य विचार करा. वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे सावध राहा. जुन्या शत्रूंसोबत सामना होऊ शकतो. वाहने सावकाश चालावा. व्यवसायात कर्जही घ्यावे लागू शकते. 


  काय करावे - इलेक्ट्रॉनिक साहित्य सावधगिरीने खरेदी करा. 


  लव्ह - लव्ह पार्टनरवर तुमचा खर्च वाढू शकतो. विवाहित लोकांसाठी दिवस चांगला राहिल. संबंध अजूनच मजबूत होतील. 


  करिअर - बिझनेस आणि नोकरीमध्ये वायफळ खर्च झाल्यामुळे अडचणी वाढतील. विद्यांर्थ्यांना यश मिळेल.

   
  हेल्थ - गॅस्ट्रिक प्रॉब्लम होऊ शकते. जॉइंट पेन होईल. 

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  धनु राशी, 1 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - जेवढी करू शकतात तेवढीच गुंतवणूक करा. गोचर कुंडलीच्या पाचव्या स्थानातील चंद्र तुमची वचने पूर्ण करू शकतो. इतरांना तुम्ही जी वचने दिली होती, ती पूर्ण करण्यात अर्ध्यापेक्षा जास्त दिवस खर्ची पडेल. तुम्ही इतरांच्या गरजा आणि त्यांची परिस्थिती चांगल्या प्रकारे समजू शकता. अपत्याकडूनही मदत मिळेल. तुमच्या योजना यशस्वी होतील.


  निगेटिव्ह - थोडेसे कन्फ्यूजन किंवा संदेश निर्माण होईल. अडचणी आणि व्यग्रतेमुळे तूमचा मूड खराब होईल. इतरांचा राग आपल्या जवळच्या व्यक्तींवर काढल्यास तुमचेच नुकसान होईल. एखादी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न कराल, हे चांगले नाही. विचार न करता बोलणे तुमच्या अंगावर शेकणार आहे. ठरवलेले सगळेच पूर्ण होऊ शकणार नाही.


  काय करावे - एखाद्या गरीब मुलाला चॉकलेट खाऊ घाला.


  लव्ह - लव्ह पार्टनरशी वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. मनातल्या गोष्टी जोडीदाराशी जरूर शेअर करा.


  करिअर - ऑफिसमध्ये आळसामुळे नुकसान होईल. सावधान राहा. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागणार आहे.


  हेल्थ - आळस आणि थकव्यामुळे त्रस्त व्हाल. झोप कमी होईल, ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवण्याची शक्यता.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे मकर राशिफळ (1 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.

   

  पॉझिटिव्ह - आपत्य आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्यांचा सल्ला आणि गरजांवर लक्ष द्या.  आज तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवा. एकदा स्वत:वर नियंत्रण ठेवले की, तुमचे काम पूर्ण होतील. बदलांचा दिवस आहे. जे बदल तुम्ही अनेक दिवसांपासून टाळत आला आहात, ते आज होतील. एखादा नवा मित्र देखील तुम्हाला मिळू शकतो. धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होऊ शकते.


  निगेटिव्ह - कामात अडथळे निर्मान होऊ शकतात. तुम्ही थोडे त्रस्त होऊ शकता. महत्वकांक्षा पूर्ण न झाल्यामुळे निराश होऊ शकता. मनाला दुख: देणारी एखादी जूनी गोष्ट तुमच्या सामोर येऊ शकते. दोस्त, प्रेमी, आपत्य, कुटुंब कोणाहीसोबत वाद होऊ शकतात. कामाचा व्याप तुमच्यावर अधिकचा असेल. नशिबाची साथ कमीच मिळेल.


  काय करावे - ऑनलाइन शॉपिंग किंवा देण्या-घेण्याचे व्यवहार करू नका.


  प्रेम- प्रेमातील स्थिती अधिक चांगली करू शकणार नाही आणि त्रस्थ देखील होऊ शकता. काही काळासाठी तुमच्या भावनांवर ताबा मिळवा.


  करिअर - पैसा गुंतवणूक करण्यात सावधानता बाळगा. नोकरदार वर्गासाठी दिवस सामान्य राहिल. मकर राशिच्या विद्यार्थ्यांना जास्तीच्या मेहनतीतूनच यश मिळेल.


  हेल्थ - दिवसभर तब्बेतीची काळजी वाटू शकते. ब्लड प्रेशरचे पेशन्ट देखील त्रस्थ होऊ शकतात.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  1 Sep 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीचे लोक जाणूनबुजून स्वतःच्या विचारात गर्क राहतात यामुळे इतरांना तुमच्यापाशी येणे शक्य होत नाही. यामुळे आज काही लोक तुमच्यासाठी मनातील गोष्ट शेअर करू शकणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या या स्वभावाचा फायदा होऊ शकतो, पंरतु काही गोष्टींमध्ये नुकसानही सहन करावे लागू शकते. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, दिवस कसा राहील.

  पॉझिटिव्ह - सेव्हिंग वाढू शकते. ऑफिसमध्ये काही लोक तुम्हाला मोठ्या जिम्मेदारीसाठी उत्तेजीत करु शकतात. टॅक्स, गुंतवणूक आणि उधार पैसे देण्याचे प्रकरण समोर येऊ शकतात. एखाद्या योग्य आणि व्यावसायिक सल्लागाराशी संपर्क साधू शकता. एखाद्या प्रवासचीही योजना बनू शकते. तुम्ही सर्व कामात हिम्मत ठेवाल तर यश मिळू शकते.


  निगेटिव्ह - कमी बोला आणि तुमचे गुपीत उघड होऊ नका देऊ. अनपेक्षित विवादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही कामाशी तुमची परेशानी वाढू शकते. विचार न करता कोणत्याच प्रकरणात पडू नका. बोलण्या-बोलण्यामध्ये एखाद्याशी हुज्जत घालू शकता. व्यर्थ क्रोधीत होऊ नका याने स्वत:ला नुकसान होऊ शकते.


  काय कराल -  माताजींच्या मंदिरात कपुर दान करा.
   

  लव्ह लाइफ -  आज तुम्ही काही अधिक असहनशीलही होऊ शकतात. छोटया- छोटया गोष्टी तुम्हाला काही बेचेन करु शकता. नात्यांमध्ये बदल होण्याचे योग बनत आहे.


  करियर- आर्थिक प्रकरणांमध्ये तुमची स्थिती मजबूत होऊ शकते. बिझनेस करणाऱ्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत केल्यानंतर सफलता मिळू शकते.


  हेल्थ - तब्येतीत सामान्य उतार-चढाव होऊ शकतो.

 • आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  1 Sep 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीच्या लोकांनी जास्त संवेदनशील होणे ठीक नाही. यामुळे आज तुमची काही कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. याउलट काही कामामध्ये तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाही होईल. यामुळे आज तुम्ही नोकरी किंवा बिझनेसमध्ये मनाविरुद्ध परिस्थितीपासून दूर राहाल. तुम्ही मदत करण्यासाठी नेहमी तयार राहता. यामुळे आज तुम्हाला काही ग्रहांची मदत मिळू शकते. जाणून घ्या, सूर्य-चंद्राच्या स्थितीचा प्रभाव कसा राहील तुमच्या राशीवर.

  पॉझिटिव्ह - कामकाजामध्‍ये व्‍यवहारिक राहाल तर तुमचे कामे पुर्ण होतील. तुमच्‍यासमोर ज्‍या अडचणी येतील त्‍या थोड्याच वेळासाठी असतील. लवकरच त्‍या अडचणी नाहिशा होतील. आपल्‍या सामर्थ्‍याचा योग्‍य उपयोग कराल. जुना एखादा वाद संपुष्‍टात येऊ शकतो. काही लोकांशी भावनिक बंध निर्माण होतील. व्‍यवसायात फायदा होऊ शकतो. शेअर मार्केट आणि दलाल म्‍हणून काम करणा-यांचाही फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन सुखी राहिल. वाहन खरेदी करण्‍याची योजना बनवाल. 


  निगेटिव्ह - आज तुम्‍ही आवश्‍यकतेपेक्षा अधिक गंभीर राहाल. यामुळे उगीच तणाव निर्माण होईल. इतरांना स्‍वत:हून सल्‍ले देऊ नका. दुस-याच्‍या कामात दखल देऊ नका. असे केल्‍यास तुम्‍ही स्‍वत:ला अडचणीत टाकू शकता. 


  काय करू नये - कोणालाही खोटे आश्‍वासन देऊ नका. 


  लव्‍ह लाईफ - आज जास्‍तीत जास्‍त वेळ पार्टनरसोबत घालवाल. छोट्या मोठ्या गोष्‍टींकडे लक्ष देऊ नका. बोलण्‍यावर संयम ठेवा. प्रेमींसाठी दिवस चांगला राहिल. 


  करिअर - नोकरदार आणि व्‍यवसायिकांसाठी दिवस चांगला राहिल. मात्र जोखिमपूर्ण गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्‍यांना चांगले यश मिळू शकते. 


  हेल्‍थ - थकाव आणि आळस येईल. वातावरणाच्‍या बदलामुळे आजारी पडण्‍याची शक्‍यता आहे.   

Trending