Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 12:01 AM IST

Today Horoscope in Hindi (3 Sep 2018): 12 राशीचे राशीफळ एकत्र वाचा दिव्य मराठीच्या या पेजवर

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 3 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, मेष राशिफळ (Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीच्या लोकांची सर्वात मोठी शक्ती म्हणजे, तुमचे धाडस, यामुळे आज काही गोष्टींमध्ये दिवस चांगला राहील पण काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला सांभाळूनही राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

   

  पॉझिटिव्ह - आज तुम्ही काहीतरी नवीन आणि सकारात्मक विचार कराल. चंद्राची स्थिती तुमच्यासाठी खास राहील. धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहेत. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. मनातील गोष्टी इतरांसमोर व्यक्त करू शकाल. एखादी गुंतवणूक करण्याचा निश्चय कराल. गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. तुमचे घेतलेले निर्णय योग्य ठरतील.


  निगेटिव्ह - ऑफिस, करिअर आणि बिझनेसच्या चिंतेमध्ये तुमच्या जवळच्याच लोकांकडे तुमचे दुर्लक्ष होऊ शकते. वेळेचे नियोजन जुळून येणार नाही. यामुळे तुमची काही कामे अपूर्ण राहू शकतात. तुमच्यावर एखादे कर्ज फेडण्याचा दबाव राहील. कुटुंबाकडे लक्ष देऊ शकणार नाहीत.


  काय करावे - एखाद्या गरिबाला हिरव्या भाज्या दान कराव्यात.


  लव्ह - जोडीदारासोबतचे संबंध मधुर बनवण्याचा प्रयत्न कराल. 


  करिअर - ऑफिसमध्ये काम जास्त राहू शकते. सहकाऱ्यांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


  हेल्थ - जखम होण्याचे योग आहेत. डोकेदुखीही होऊ शकते.

   
 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - तुमच्या राशीत चंद्र राहणार आहे. दिवसभर व्यग्र राहाल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. पैसे कमावण्याच्या काही नामी संधी चालून येतील. त्यासाठी सतर्क राहा. आज ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. अडकलेला पैसे परत मिळण्याचे योग्य बनत आहेत. एखाद्या मित्राच्या मदतीने अडचणीतून मार्ग काढाल. आज अडचणीही कमी होतील. एखादे जुने कोर्ट प्रकरण आज संपुष्टात येईल. तुम्हाला पैसा आणि सन्मान दोन्ही प्राप्त होतील. कोणतेही काम सुरू करण्यासाठी आज दिवस चांगला आहे. 


  निगेटिव्ह - अवास्तव खर्च टाळून काटकसर गरजेची आहे. एखाद्या मित्रासोबत संबंध कटू-गोड होण्याची शक्यता आहे. काही अपरिहार्य खर्च वाढणार आहे. एखाद्या कागदोपत्री व्यवहाराचा गुंता वाढेल.


  काय करावे - भिन्न लिंगी व्यक्तीला सजावटीची किंवा सुगंधित वस्तू भेट द्या.


  लव्ह लाइफ - लव्ह लाइफ उत्तम राहील. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल.


  करियर  - आज कठोर मेहनतीचा दिवस आहे. अधिकारी कामाचा दबाव बनवतील. सावधगिरीने काम करा. विद्यार्थी त्रस्त होतील.


  हेल्थ - आरोग्याबद्दल सावध राहा. तुमची तब्येत आज बिघडू शकते.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांमध्ये विविध काम एकाच वेळी करण्याची क्षमता असते. तुमच्या याच गुणामुळे आज तुम्हाला फायदा किंवा नुकसानही होऊ शकते. यामुळे आज तुम्ही एकाच वेळी एकच काम करावे. आज तुमच्या आयुष्यात काय घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - नवीन प्रोजेक्ट समोर येऊ शकतो. नवीन लोकांच्या भेटी होतील.स्वतःचा पैसा आणि करिअरची स्थिती मजबूत करण्याची संधी मिळू शकते. सकारात्मक राहिल्या कोणीही तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. एखादे कठीण वाटणारे काम तुम्ही करण्यास तयार व्हाल. अडचणींवर मात करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 


  निगेटिव्ह - ऑफिसमध्ये कोणाविषयीसुद्धा वाईट बोलू नये. स्वतःच्या टॅलेंटचा वापर करू शकणार नाहीत. यामुळे निराश होऊ शकता. संशय मनात ठेवून कोणविषयी काहीही बोलू नये आणि निर्णयही घेऊ नये. अनियमित दिनचर्या आणि वातावरण बदलामुळे तब्येत बिघडू शकते.


  काय करावे - हनुमान मंदिरात पुजाऱ्याला गोड पोळी आणि लाल वस्त्र दान करा.


  लव्ह - स्वतःचा राग पार्टनरवर काढू नका. तुमच्या एखाद्या कामामुळे जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दलचा सन्मान वाढेल.


  करिअर - दिवस चांगला राहील. नवीन काम मिळू शकते. अभ्यासात जास्त मेहनत करावी लागेल. कामामध्ये मन लागणार नाही.


  हेल्थ - मानसिक थकवा जाणवू शकतो. जुने आजार डोके वर काढू शकतात.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीच्या लाभात चंद्र असणे तुमच्यासाठी शुभ आहे. आज ज्या संधी मिळतील त्यासाठी संयम ठेवा. काळानुरुप आपल्या योजनांमध्ये बदल घडवून आणणे फायद्याचे ठरेल. आपल्या योजनांवर फेरविचार करुन काम केल्यास यश मिळेल. चंद्र गोचर कुंडलीत लाभात असल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रयत्न आणि मेहनत करत राहा. विचारपुर्वकच एखादा निर्णय घ्या. तुम्हाला यश नक्की मिळेल. अचानक धन लाभाचे योग आहेत. व्यवसाय आणि नोकरीत यश मिळेल.


  निगेटिव्ह - लहानमोठ्या त्रासामुळे किंवा अपयशामुळे तुम्ही खचू शकता. स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करा. चांगल्या संधी हातून निसटू शकतात. एखादी व्यक्ती तुमच्यावर एखादा निर्णय घेण्यासाठी दबाव टाकू शकते. काही ग्रहांमुळे तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. मेहनतीच्या तुलनेत यश कमीच मिळेल. 


  काय करावे - एखाद्या मंदिरातील प्रसाद खा. 


  लव्ह - जोडीदारासोबत संपूर्ण दिवस आनंदी आणि फिरण्यात जाईल. दिवस चांगला राहिली. लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. 


  करिअर - अचानक झालेल्या धन लाभामुळे तुम्ही व्यवसायासाठी नवीन योजना आखाल. प्रोफेशनल रिलेशन मजबूत होईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. 


  हेल्थ - कर्क राशीच्या लोकांना जुने आजार त्रास देऊ शकतात. स्वतःची काळजी घ्या.   

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक आरामदायक जीवन पसंत करतात. यामुळे आज बहुतांश काम कम्फर्ट झोनमध्ये राहून करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच आत्मविश्वास आणि धाडसी स्वभावामुळे काही काम मन लावून कराल. आरोग्य, धन-संपत्ती, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रासाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा सविस्तर.

   

  पॉझिटिव्ह - जवळच्या मित्रासोबत संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. आसपासचे लोक आणि त्यांच्या गरजांची काळजी घ्या. कुटुंब आणि प्रॉपर्टी संदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे. मनातील गोष्टी स्पष्टपणे व्यक्त करा. परंतु, लोक काय म्हणत आहेत याचाही विचार करा. लोक आपल्याला काही सांगण्यासाठी खूप उत्सूक राहतील. ऑफिसमध्ये टीम भावनेने काम कराल. कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. मुला-बाळांकडून मदत मिळू शकते. चंद्र गोचर कुंडलीच्या दहाव्या भावात आहे. त्यामुळे, आपल्याला मित्र आणि भावांचे सहकार्य लाभू शकते. ऑफिसमध्ये सोबतच्या लोकांच्या कामात आपण मदत करू शकता. विरुद्ध लिंगी सहकारी आपल्या पक्षात राहण्याची शक्यता आहे. 


  निगेटिव्ह - प्रवासाचे एखादे कार्यक्रम पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. एखाद्या स्वरुपाचा उशीर होण्याचा योग आहे. अज्ञात भीतीने आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. आपल्या मनातील गोष्टी प्रत्येकासमोर व्यक्त करू नका. प्रत्येकावर विश्वास ठेवणे टाळा. आपल्याला एखाद्या स्वरुपाचा दगा सुद्धा मिळू शकतो. प्रॉपर्टीच्या बाबतीत कुणावरही पूर्णपणे विश्वास ठेवू नका.


  काय करू नये - तुटल्या किंवा फुटलेल्या भांड्यांचा वापर करू नका.


  लव्ह लाइफ - लव्ह लाइप चांगली आहे. जोडीदारासोबत फिरण्यासाठी जाऊ शकता. गिफ्ट मिळू शकते. आपल्या समस्या दुसऱ्यांसमोर व्यक्त कराल तर काहीसा दिलासा मिळू शकतो. 


  करिअर - प्रोफेशनसलाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा आहे. धन लाभाचा योग जुळत असला तरीही खर्च सुद्धा वाढण्याचे संकेत आहेत. कॉमर्सवाल्या विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. 


  हेल्थ - आरोग्यावर दुर्लक्ष करू नका. कफ आणि पित्ताचे रोग होऊ शकतात. रोग जुना असल्यास दुसऱ्या एखाद्या डॉक्टरचा सल्ला घ्या.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  कन्या राशी, 3 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - जोडीदाराकडून प्रेम आणि सुखाची अपेक्षा असेल. दैनंदिन कामात फायदा होऊ शकतो. जोडीदाराशी एखाद्या जुन्या विषयावर चर्चा रंगेल. एखाद्या मित्राशी संबंध आणखी दृढ होतील. काही रोचक व्यक्तींचीही आज भेट होण्याचे योग तयार होत आहेत. कुटुंबासोबत चांगले संबंध बनतील. घरीच वेळ घालवाल. एक्स्ट्रा इन्कमची संधी मिळू शकते. आज केलेल्या कामांचा फायदा येणाऱ्या काळात मिळेल. एकूण तुमच्यासाठी दिवस सामान्य राहील.
   

  निगेटिव्ह - कोणताही मोठा निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. पैशांच्या स्थितीवरून एखाद्या प्रकारचा संभ्रम असू शकतो. देण्याघेण्याचा व्यवहार मांडून ठेवा. आरोग्य ठीक नसेल. भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये मन रमेल. आळसामुळे कामात मन लागणार नाही. स्वत:वर कंट्रोल ठेवणे आवश्यक आहे.


  काय करावे - आपले उष्टे कुणालाही खाऊ घालू नका.


  लव्ह - जोडीदाराची झालेली चुकीची समजूत दूर करण्याचा प्रयत्न कराल. जीवनसाथीवर संताप करणे टाळा.


  करिअर-  धनलाभ होऊ शकतो, परंतु प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते. अभ्यासात मन लागेल. स्पर्धा परीक्षेत यश नक्कीच मिळेल.


  हेल्थ - आरोग्याबाबत आज सतर्क राहा.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.
   

  पॉझिटिव्ह - पगारवाढबाबत अधिकारिर्‍यांसोबत चर्चा होण्याची शक्यता. नवे कौशल्य आत्मसात कराल. ट्रेनिंगला जावे लागेल. जे काही नवे कराल, त्याचा आगामी दिवसांत फायदा होईल. जो कोणता निर्णय घ्याल, त्यात यश मिळेल. संधीचे सोने कराल. कायम सतर्क राहावे लागेल.


  निगेटिव्ह - कामात लक्ष लागणार नाही. चंद्र गोचर कुंडलीतील आठव्या स्थानी आहे. त्यामुळे प्रगतीत अनेक अडचणी येतील. सतर्क राहावे लागेल. कोणत्याही प्रकरे नुकसान होऊ शकते. कोणताही निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहन चालवताना सावगिरी बाळगा. दुसर्‍यास वाहन देऊ नका. नुकसान होईल. 


  काय करावे - पाण्याच्या टाकीत पिवळे फूल टाका.


  लव्ह लाइफ - जोडीदारासोबत संयमाने वागा. कुटुंबासोबत सहलीला जाल.


  करिअर - नोकरदार वर्गाला इन्क्रीमेंट किंवा प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. विचारपूर्वक पैसा गुंतवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम घ्यावे लागतील.


  हेल्थ - पोटाचे विकार डोके वर काढतील.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  वृश्चिक राशी, 3 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya: वृश्चिक राशीच्या लोकांनी आज वेळ मॅनेज करून चालावे. आज तुम्ही वेळ आणि संधीचा पूर्ण लाभ घेण्याचा प्रयत्न कराल आणि जुने नुकसानही फायद्यात बदलण्याचा प्रयत्न कराल. जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा आजचा दिवस.

   

  पॉझिटिव्ह - जे काम करत आहात, त्यामध्ये जितकी मेहनत कराल तितके फळं मिळेल. तुमच्यात ऊर्जा जास्त राहिली. तुम्ही खुप काही करु शकता. जवळच्या नात्यांवर लक्ष द्यावे लागेल. नवीन लोकांसोबत मैत्री होईल. प्रवासाचा योग जुळू शकतो. नवीन विचार डोक्यात दिवसभर घुमत राहतील. खरेदी करण्याची इच्छा होईल. चंद्रामुळे तुमचे अनेक काम योग्य वेळी पुर्ण होऊ शकतात. तुम्हाला सहकार्य मिळेल. लोकांचे लक्ष तुमच्यावर राहिल. तुमच्यासाठी हे चांगले राहिल. मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. वाद मिटवण्यातही यश मिळू शकते. 
   

  निगेटिव्ह - पैशांच्या बाबतीत कठीण परिस्थिती येऊ शकते. दुर्लक्ष करु नका. प्रत्येक व्यक्ती तुमच्या बोलण्यावर सहमत नसेल. कुणालाही बळजबरी सहमत करण्याचा प्रयत्न करु नका. जवळच्या नात्यांमध्ये वाद होऊ शकतो. 


  काय करावे - जेवणातील तळलेले पदार्थ गरीबांना खाऊ घाला. 


  लव्ह - पार्टनरसोबत प्रेमाने वागा आणि पार्टनरवर भावनिक दबाव टाकू नका.


  करिअर - बिझनेसमध्ये पैसा अडकू शकते. सावधगिरीने गुंतवणूक करा. तुम्हाला जास्त काम राहिल. विद्यांर्थ्यांसाठी दिवस चांगला असू शकतो. स्पर्धा परिक्षांमध्ये बसणा-या विद्यार्थांना सहज यश मिळू शकते. 


  हेल्थ - मानसिक थकवा जाणवेल. झोप कमी येईल. 

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  धनु राशी, 3 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - एकत्र काम करण्याचा दिवस आहे. करिअरमधील पर्यायांवर लक्ष द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मनातील तणाव दूर करण्यासाठी मित्र तुमची मदत करतील. मनात प्रत्येक बाबीसाठी उत्सुकता तयार होईल. मौज-मजा करण्याची किंवा एखादे धाडस करण्याची लहर होईल. घर, जमीन आणि संपत्तीशी संबंधित महत्तवाची प्रकरणे समोर येऊ शकतात. गुंतवणुकीबाबत एखादा संकेतही तुम्हाला मिळू शकतो.


  निगेटिव्ह - सावधान राहा. वाद होण्याचे योग तयार होत आहेत. दुखापत होऊ शकते. आज थोडीशी जास्तच मेहनत होऊ शकते. पार्टनरवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू नका. पैशांमध्ये हेराफेरीही होऊ शकते. गुंतवणूक आणि उधार देण्याघेण्याआधी विचार करा. आज सावधान राहावे लागेल. नशिबाच्या भरवशावर बिलकूल राहू नका. वेळ तुमच्या बाजूने वाटत नसेल तर शांत राहा. काहीही नवे करू नका.


  काय करावे - जेवणासोबत साखर वा पांढरी मिठाई खा.
   

  लव्ह - पार्टनर आणि तुमच्यात वादाचे जे विषय आहेत, ते सारखे तुमच्यासमोर येऊ शकतात. यामुळे एकदाचे त्यांचे समाधान करणेच उत्तम. जीवनसाथीकडून आनंद प्राप्त होईल. तुमच्यासाठी दिवसही चांगला राहील.


  करिअर - खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये काहीही नवे करणे शक्यतो टाळा. अभ्यासात मन लावण्यासाठी एकटे बसा. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ राहील.


  हेल्थ - काम जास्त असल्याने पायांमध्ये वेदना होऊ शकतात.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  मकर राशी, 3 Sep 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.

   

  पॉझिटिव्ह - आज भेटणा-या प्रत्येक व्यक्तीशी बोलण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. यामध्ये संकोच करण्यासारखे काहीच नाही. कुटूंबासोबतचे संबंध सुधारु शकतात. प्रेमीसोबत वेळ घालवाल. पहिले कामाविषयी योग्य विचार करा आणि नंतरच एखादे काम हातात घ्या. तरच तुमच्यासाठी चांगले राहिल. आपल्या काम करण्याच्या पध्दतीत सुधारणा करा. 


  निगेटिव्ह - कोणत्याही कामाला सोपे समजू नका. तुमच्या समोर अनेक आव्हाने आहेत. तुमच्यासाठी निर्णय घेणे खुप कठीण होईल. पैशांसंबंधीत कामं सांभाळून करा. पैसे अडकण्याची शक्यता आहे. पैशांमुळे टेंशनमध्ये येऊ शकता. स्वतःला विविध अडचणींमध्ये फसलेले असल्याची जाणिव होईल. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. फक्त स्वतः काय विचार करता याचा विचार न करता समोरच्याचे ऐकून घ्या. वाढत्या खर्चामुळे तुम्ही टेंशनमध्ये येऊ शकता. एखाद्या कामात गरजेपेक्षा जास्त वेळ आणि मेहनत करावी लागू शकते. 


  काय करावे - जेवणापुर्वी 1-1 घास गाय आणि श्वानासाठी काढून ठेवा. 


  लव्ह - तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला आहे. जुनी भांडण संपवू शकता. विवाहित लोकांना जीवनसाथीसोबत प्रेम आणि सुख मिळेल. 


  करिअर - बिझनेसविषयी टेंशन राहिल. हळुहळू सर्व काही ठिक होईल. विद्यार्थ्यांना अडचणी सतावू शकतात. मित्राकडून मदत मिळेल. पुढे जाण्याची संधी मिळू शकते. 


  आरोग्य - वातावरणातील बदलामुळे आजारी पडू शकता. इन्फेक्शन होऊ शकते. 

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीचे लोक जाणूनबुजून स्वतःच्या विचारात गर्क राहतात यामुळे इतरांना तुमच्यापाशी येणे शक्य होत नाही. यामुळे आज काही लोक तुमच्यासाठी मनातील गोष्ट शेअर करू शकणार नाहीत. आज तुम्हाला तुमच्या या स्वभावाचा फायदा होऊ शकतो, पंरतु काही गोष्टींमध्ये नुकसानही सहन करावे लागू शकते. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, दिवस कसा राहील.

   

  पॉझिटिव्ह - पैशांमुळे निर्माण झालेल्या अडचणीतून दिलासा मिळू  शकतो. नवीन संधी तुमच्यासमोर उभ्या आहेत. मनोरंजन होऊ शकतं. प्रेमी युगुलांसाठी चांगला काळ आहे. अडकलेली कौटुंबिक कामे मार्गी लागतील. संतती सुख लाभेल.


  निगेटिव्ह - वादापासून दूर राहा. नशीबाची साथ कमी मिळेल. कोणत्याही कामात जास्त रिस्क घेऊ नका. विचारात असलेली कामे मार्गी लागण्याचे योग आहेत. तुम्हाला मनासारखे समाधान लाभत नाहीये. प्रकृतीशी संबंधित समस्या जाणवू शकते. तुमच्या मनात काही शंका असल्यास त्याचे सर्वप्रथम निराकरण करा.


  काय करावे - चना डाळ स्वतः खा किंवा ब्राम्हणांना दान करा.
   

  लव्ह - तुमचे भावनात्मक संबंध आणखी सुधारतील. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. जोडीदार तुमच्या भावनांचा सन्मान करेल. 


  करिअर-  अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात पुढे जाण्याची चांगली संधी मिळू शकते. नोकरीत जबाबदारी वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


  हेल्थ - प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या. जास्त जेवण केल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 3 Sep 2018
  3 Sep 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीच्या लोकांनी जास्त संवेदनशील होणे ठीक नाही. यामुळे आज तुमची काही कामे अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. याउलट काही कामामध्ये तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाही होईल. यामुळे आज तुम्ही नोकरी किंवा बिझनेसमध्ये मनाविरुद्ध परिस्थितीपासून दूर राहाल. तुम्ही मदत करण्यासाठी नेहमी तयार राहता. यामुळे आज तुम्हाला काही ग्रहांची मदत मिळू शकते. जाणून घ्या, सूर्य-चंद्राच्या स्थितीचा प्रभाव कसा राहील तुमच्या राशीवर.

   

  पॉझिटिव्ह - खरेदीसाठी चांगली वेळ आहे. वेळेचा सदुपयोग कराल तर एखादे मोठे काम पुर्ण होऊ शकते. प्रेम आणि रोमँटीक संबंधासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबामधील तणाव कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न केल्‍यास यश मिळू शकते. मित्र आणि भावंडांकडूनही मदत मिळेल. एखाद्या विशेष कामासाठी अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. आज एखादी नवी गोष्‍ट करण्‍याचाही प्रयत्‍न कराल. प्रिय व्‍यक्‍तीशी भेट होण्‍याची शक्‍यता आहे. एखादी चांगली बातमी आज मिळू शकते. 


  निगेटिव्ह - एखाद्या गोष्‍टीवर खुप भावूक होऊन रिअॅक्‍ट केल्‍यास तुमची चुकीची इमेज बनू शकते. काही गोष्‍टींमुळे तणाव वाढेल. डोकेदुखी आणि थकव्‍यामुळे त्रस्‍त होऊ शकतात. विचार केलेली कामे पुर्ण करण्‍यात काही अडचणी येतील. 


  काय करावे - माताजींच्‍या मंदिरात लाल फुल अर्पण करा. 


  लव्‍ह - लव्‍ह लाईफला मॅरिड लाईफमध्‍ये बदलायचे असेल तर पालकांसमोर आपल्‍या इच्‍छा व्‍यक्‍त करा. 


  करिअर - अधिका-यांकडून मदत मिळू शकते. विद्यार्थ्‍यांना यश मिळू शकते. दिवस ठिकठाक राहिल.


  हेल्‍थ - जेवणाकडे लक्ष असू द्या. अन्‍यथा पोट बिघडू शकते. 

   

Trending