Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 12:01 AM IST

Aajche Rashi Bhavishya (4 Sep 2018): सर्व 12 राशींचे राशिभविष्य येथे वाचा

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 4 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (4 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

  पॉझिटिव्ह - जास्त कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. लोक तुम्हाला सल्ला विचारातील आणि तुम्ही शांत, सौम्य प्रकारे त्यांची मदत कराल. गोचर कुंडलीतील तिसऱ्या स्थानात चंद्र असल्यामुळे तुमच्या राशीसाठी स्थिती चांगली राहील. अपूर्ण कामे पूर्ण होतील. योगयप्रकारे विचार करून प्लॅनिंग करावी. जुने काम पूर्ण करण्यासाठी संधी मिळेल. धैर्य बाळगावे. प्रत्येक काम काळजीपूर्वक करावे. जोडीदारासोबत वेळ व्यतीत कराल.


  निगेटिव्ह - आई-वडील किंवा एखाद्या नातेवाईकाची चिंता राहील. कोणताही निर्णय घेण्यात घाई करू नये. तुम्ही कुंठित होऊ शकता. खर्च वाढू शकतो. जुन्या समस्यांमुळे मूड खराब होऊ शकतो. कामाच्या बाबतीत सुस्त राहाल.


  काय करावे - एखाद्या विद्वानांकडून उजव्या हातावर लाल दोरा (गंडा) बांधून घ्यावा आणि दक्षिणा द्यावी.
   

  लव्ह - जुन्या प्रेमाची भेट होऊ शकते. लव्ह पार्टनरवर खर्च होईल.


  करिअर - तुमच्याकडून काही चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. चुकीच्या गोष्टी आणि काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कराल. काही विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. काही विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.


  हेल्थ - सावध राहावे. आळस आणि थकवा जाणवू शकतो.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  आजचे वृषभ राशिफळ (4 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - ध्येय साध्य करण्यासाठी खूप परिश्रम  घेऊ शकता. धन लाभ होण्याचे योग आहेत. नवा बिझनेस, पार्टनरशिप आणि रोमान्ससाठी चांगला दिवस आहे. काही लोकांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. विचार करून कोणताही निर्णय घ्या. आज तुमचे कौतुक होईल. धनलाभ होण्याचे संकेतही आहेत. कुटुंबाच्या सहकार्याने अडचणींचे निवारण होईल. 


  निगेटिव्ह - एखाद्या प्रकरणात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. बिझनेसमध्ये अचानक चढ उतार येऊ शकतात. जुन्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होण्याचे योग आहेत. अनेक गोष्टी किंवा समस्या तुमच्यासमोर एकाचवेळी उभ्या राहू शकतात. कोणत्याही कामावर सहजपणे लक्ष केंद्रीत करता येणार नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवा. विनाकारणच्या कामात अडकू सकतात. 


  काय करावे - जुन्या बिनकामाच्या फाइल आणि कागद फाडून फेकून द्या. कामाचा टेबल स्वच्छ ठेवा. 


  लव्ह - पार्टनरचे म्हणणे किंवा गरजा समजण्यासाठी त्याच्यावर चीडचीड करू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा. पार्टनरकडून प्रेम, सरप्राइज आणि सहकार्य मिळेल. 


  करिअर - समजूतदारीचा फायदाही मिळेल. व्यवसायातील नव्या संधी ओळखा. काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. काही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. 


  हेल्थ - पोटाचे रोग होण्याची शक्यता आहे. सावध राहा. एखदी अॅलर्जीदेखिल होऊ शकते. 

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  मिथुन राशिफळ, 4 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. कामामध्ये मन लागेल. चंद्र तुमच्या राशीत आहे. हातामध्ये घेतलेले प्रत्येक काम पूर्ण कराल. अपोझिट जेंडरकडे आकर्षण वाढेल. हा काळ चांगला आहे. प्रेम संबंध मजबूत होतील. धन लाभाचे योग आहेत. लव्ह लाईफ किंवा प्रोफेशनल लाईफशी संबंधित नवीन ऑफर मिळू शकतात. पैशांच्या स्थितीमध्ये बदल होण्याचे योग आहेत. दीर्घ काळापासून अडकलेले काम पूर्ण होऊ शकते.


  निगेटिव्ह - वादग्रस्त लोकांपासून दूर राहावे. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार अवश्य करावा. काही चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. खर्च वाढू शकतो. व्यर्थ वस्तूंची खरेदी होऊ शकते. ऑफिसमध्ये गैरसमज किंवा मतभेद निर्माण होऊ शकतात. यामुळे तणावात राहाल.


  काय करावे - कुमारिकांच्या पाया पडावे.
   

  लव्ह - प्रेमाने नात्यामधील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करावा. सयंम ठेवावा. वाणीवर नियंत्रण ठेवावे.


  करिअर - काही गोष्टींमध्ये तुम्हाला शत्रूवर विजय मिळेल. कामाच्या ठिकाणी नशिबाची साथ मिळेल. एखादी शुभ वार्ता समजू शकते. जुन्या कष्टाचे फळ मिळेल.


  हेल्थ - तुमचे आरोग्य ठीकठाक राहील. जुने आजार नष्ट होऊ शकतात.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  4 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - तुम्ही योजना बनवा आणि त्यावर काम करण्यास  सुरूवात करा. तुमच्याकडे रोजगार नसेल, तरी देखील तुम्ही कमाईचे कोणते न कोणते माध्यम शोधून काढू शकता. नवे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. आत्मविश्वास आणि सकारात्मकता दोन्ही अतिशय उत्तम स्थितीत आहे. खुली चर्चा तुम्हाला चांगले परिणाम देऊ शकते. कुटुंबात सुख-शांती राहिल. महत्वाच्या कामासाठी बाहेर देखील जावे लागू शकते.


  निगेटिव्ह - कर्क राशिचे काही लोक रोजगारामुळे असंतुष्ट होऊ शकतात. सावध रहा, तुम्ही एखाद्या गोष्टीत अति करू शकता. अति चतुराई तुमच्यासाठई धोकादायक सिद्द होऊ शकते. सावधान आणि गंभीर रहा. थकान भी महसूस होऊ शकते. नशिबाची साथ न मिळाल्यामुळे थोडी निराशी होऊ शकते. तुम्ही एखाद्या षडयंत्राचे शिकार देखील होऊ शकता. दुसऱ्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुम्हाला याचा पश्चाताप होऊ शकतो. 


  काय करावे - पूर्व दिशेत देवाला दिवा लावा. दिव्यात कुंकु टाका आणि त्याच्या शेजारी लाल फूल ठेवा.


  लव्ह - तुम्ही रोमँटिंक मूडमध्ये रहाल. अनेक इच्छा आकांक्षा तुमच्या मनात राहू शकतात. पार्टनरला तुमच्या एखादी गोष्टीचे वाईट वाटू शकते. नात्यांना संभाळावे लागेल.


  करिअर - व्यावसाय आण कार्यक्षेत्रासाठी दिवस फारसा चांगला नाही. नवीन गुंतवणूक करू नका. मोठे खर्च होऊ शकतात. या राशिच्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीत चांगले यश मिळू शकते.

   

  हेल्थ - तब्बेतीची काळजी घ्या.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  4 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक आरामदायक जीवन पसंत करतात. यामुळे आज बहुतांश काम कम्फर्ट झोनमध्ये राहून करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच आत्मविश्वास आणि धाडसी स्वभावामुळे काही काम मन लावून कराल. आरोग्य, धन-संपत्ती, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रासाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा सविस्तर.

  पॉझिटिव्ह - ज्या छोट्या-छोट्या गोष्टींची इच्छा कराल त्या पूर्ण होतील. गोचर कुंडलीच्या लाभ भावाचा चंद्र आपल्यासाठी शुभ राहील. उत्साह राहील, तसेच हा दिवस नेहमी स्मरणात राहील. एखाद्या योजनेवर त्रस्त असाल तर समाधान मिळू शकते. एखादी व्यक्ती आपली मदत करू शकते. आपल्याला गरज असताना मदत मिळू शकते. केलेल्या कामांचा आज फायदा होऊ शकतो. कर्जातून सुटका होऊ शकते. संकोच आणि भीती आज संपणार असे संकेत आहेत. बिझनेसमध्ये नफा मिळेल. 
   

  निगेटिव्ह - आपण आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करू शकता. अधिक शहाणपण आपल्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. जास्त काम असल्यामुळे आपल्याला थकवा जाणवेल. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांनी थोडे सावध राहावे.


  काय करावे - एखाद्या मंदिर किंवा धार्मिक स्थळावर नि:शुल्क सेवा द्यावी.


  लव्ह - जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मनात ज्या काही चिंता आहेत त्या मुक्तपणे व्यक्त करा. पार्टनरसोबत असलेले जुने संबंध सुधारण्यात मदत होईल. 


  करिअर - दिवसाची सुरुवात चांगली राहील. स्वतःला कमी लेखू नका. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. 


  हेल्थ - पोटाचा त्रास उद्भवू शकतो. डायबेटिक रुग्णांनी स्वतःची काळजी घ्यावी. दूरचा प्रवास करणे शक्यतो टाळावे, आरोग्य बिघडण्याचे संकेत आहेत. 

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  4 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह -  बहुतांश कामे पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जो प्लान कराल त्याचे चांगले फळ मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. थोडा संयम ठेवावा लागेल. मनात जे असेल ते मित्रांबरोबर शेअर करू शकता. त्यातून तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही बॉससमोर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकता. पगार वाढीबाबत अनेकप्रकारचे विचार मनात येऊ शकतात. 


  निगेटिव्ह - ऑफिसमध्ये काही लोकांच्या वर्तणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. लहान-लहान बाबींवर तुमची चीडचीड होऊ शकते. काहीतरी अज्ञात भिती त्रासदायक ठरू शकते. जेवढा अधिक विचार कराल, तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल. मानसिक तणावही वाढू सकतो. 


  काय करावे - पिंपळाच्या झाडाखाली तीळाच्या तेलाचा दिवा लावा. 

    
  लव्ह - लव्ह लाइफमध्ये नशिबाची साथ मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळा. पार्टनरप्रति प्रामाणिक राहा. 


  करिअर - एखादा मोठा निर्णय घेण्याच्या विचारात असेल तर नक्की घ्या. नव्या नोकरीचा विषय मनात घोळत राहील. पैशांशी संबंधित काम करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. चागल्या यशासाठी विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव असेल. 


  हेल्थ - जुने रोग नष्ट होऊ शकतात. काही कठीण बाब असेल तर ती अधिक त्रासदायक ठरेल. 

   
 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  4 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.

  पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीत चंद्र भाग्य स्थानात आहे. आधी घेतलेल्या परिश्रमाचे फळ आज तुम्हाला मिळेल. नोकरी, बिझनेसमध्ये प्रगती कराल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. कामात मन लागेल. सकारात्मक विचार प्रगतीसाठी पोषक ठरतील. मोठा निर्णय घ्याल. कौटुंबिक जीवनात खुशखबर मिळेल. आई-वडिलांकडून मदत मिळेल. 


  निगेटिव्ह - मोठा निर्णय घेताना अडचणी येतील. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. परिश्रम कमी झाल्याने कामे अर्धवट राहातील. उत्साहाच्या भरात चुकीच्या ‍ठिकाणी गुंतवणूक करू नका. नोकरीतील सहकार्‍यांवर विश्वास ठेऊ नका. 


  काय करावे - भैरव मंदिरात काळ्या वस्त्रात उडीत ठेवून तेलाचा दिवा लावाला.
   

  लव्ह - जोडीदाराप्रती वेगवेगळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करा. जोडीदाराचा सहवास आर्थिक फायदा मिळवून देईल. आवक वाढेल.


  करिअर - नोकरी आणि बिझनेसमध्ये प्रगती होईल. स्पर्धेत यश मिळेल. कॉमर्स विभागातील विद्यार्थ्यांचा जास्त परिश्रम घ्यावा लागेल.


  हेल्थ - आरोग्य उत्तम राहील.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  आजचे वृश्चिक राशिफळ (4 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.

  पॉझिटव्ह - मनातील गोष्टी सांगण्यात आणि दूस-यांसोबत गप्पा मारायला तुम्हाला आवडेल. जुन्या गोष्टी मनात सुरु राहतील. प्रवासाचे नियोजन करु शकता. दूस-यांची मदतही करावी लागेल. काही खास गोष्टींमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. आज एखादी नवीन गोष्ट किंवा एखादे गुपीत तुम्हाला कळू शकते. मनोरंजनाची संधी मिळू शकते. 


  निगेटिव्ह - एखाद्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानावर चंद्र आहे. यामुळे तुम्ही टेंशनमध्ये राहाल. अचानक नुकसान होऊ शकते. तुम्ही थोडे सावध राहा. कुटूंबातील लोकांसोबत वाद होऊ शकतात. तुम्ही एखादे चुकीचे काम न करताही तुमच्यावर आरोप लावले जाऊ शकतात. सांभाळून राहावे. 


  काय करावे - कोणत्याही मंदिराच्या दारावर हळद आणि चंदनाने स्वस्तिक काढा. 


  लव्ह - पार्टनरला भावना व्यक्त करण्याची संधी द्या.  


  करिअर - रुटीन कामांमध्ये फायदा आणि धन लाभ होऊ शकतो. नवीन पार्टनर मिळू शकतात. विद्यार्थी आनंदी राहतील. 


  हेल्थ - तुमच्या आरोग्यात किरोकोळ बिघाड होऊ शकतो. 

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  धनु राशी, 4 Sep 2018 (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या स्वभावानुसार काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक व्यव्यहारात आज तुम्ही काहीसे गंभीर व्हाल. आज तुमच्या आयुष्यात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, काय सांगतात तुमच्या नशिबाचे ग्रह-तारे वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह -  तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. मेहनतीच्या बळावर आज तुमचा सर्वांवर प्रभाव असेल. धन आणि कुटुंबाच्या सहयोगाने तुमचे मन प्रसन्न राहील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या कार्यक्षेत्रात तुम्ही ज्या सन्मानासाठी प्रयत्न करत होते, तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. भौतिक सुखांनी न्हाऊन निघाल. कमिशनवर काम करणाऱ्यांनाही आज फायदा होईल.


  निगेटिव्ह - आज तुम्हाला सावध राहावे लागेल. कुणासाठीही खूप जास्त नकारात्मक भावना व्यक्त करू नका. जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत, त्यांचा अपमान करू नका. परंपरा आणि नियमांना विरोध करू नका. एकाग्रता ठेवण्यात तुम्हाला अडचण होईल. जोखमीची गुंतवणूक टाळा. सोबत्याची उपेक्षा करू नका.


  काय करावे - गोमातेला वंदन करा.


  लव्ह - जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा. लव्ह लाइफमध्ये हट्ट केल्यास किंवा आपलेच म्हणणे पुढे रेटल्यास अडचणीत याल. यामुळे समस्यांत वाढ होईल.


  करिअर - चित्रपट, फॅशन आणि ग्लॅमरशी संबंधित विद्यार्थ्यांनी सावध राहावे. बारीकसारीक विचार करूनच गुंतवणूक करा. नोकरदारांनी आज दांडी मारू नये. सहकाऱ्यांकडून मदत निश्चित मिळेल.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आज तुमच्यासाठी दिवस चांगला आहे.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  आजचे मकर राशिफळ (4 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.

  पॉझिटिव्ह - विचारात असलेले काम पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. आपल्या सर्व पर्यायांवर विचार करा. तुम्ही आज दुसऱ्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न कराल. ऑफिसमधील लोकांसोबत काही फ्लॅनिंग होऊ शकते. कोणत्याही स्थानावर स्वत:ला उत्तम प्रकारे प्रेझेंट करू शकाल. स्वत:चे विष्लेषण करून शकता आणि स्वत:त काही बदल देखील घडवून आणण्याची इच्छा असेल. नवे विचार आणि नव्या ऑफर्स देखील आझ मिळू शकतात. जे जे काही काम असेल ते वेळत पूर्ण होऊ शकेल. चांगल्या लोकांसोबत राहिल्याचा  फायदा होइल. धनप्राप्तीचे योग आहेत. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.


  निगेटिव्ह - जीवनसाथीसी संबंधीत चिंता भेडसावेल. तुम्ही हलक्या तणावात राहू शकता. थोडे अस्वस्थ देखील होऊ शकता. तुम्हाला चिंतेत पाहून तुमचा लाईफ पार्टनर देखील चिंताग्रस्त होऊ शकतो. संभाळून वागा. आज तुम्ही खोटे वचनं आणि खोट्या प्रशंसेमुळे अडचणीत येऊ शकता.


  काय करावे - आपल्या जेवणातून एक भाकर गायीसाठी काढून ठेवा.
   

  लव्ह - लाईफपार्टनरशी संबंध बिघडू शकतात. एखाद्या कौटुंबीक कारणामुळे त्रस्त होऊ शकता.


  करिअर - गुंतवणूकीसाठी योग वेळ नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणून फायदेशीर ठरणार नाही. विद्यार्थ्यांसाठी दिवस उत्तम राहिल. मित्रांकडून मदत मिळू शकते.


  हेल्थ - तब्बेतीत चढ उतार येऊ शकतात छोटा मोटा त्रास देखील होऊ शकतो.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  कुंभ राशी, 4 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.

   

  पॉझिटिव्ह - लोकांची मदत कराल. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होईल आणि तुम्ही त्यांना चांगल्याप्रकारे निभवाल. जवळील लोकांची सहानुभूती ठेवा. लोक तुमच्याकडून आनंदी असेल. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये तुम्हाला गंभीरतेने विचार करावा लागेल. ऑफिसमध्ये आपल्या कामात सोबतच्या लोकांपूढेही निघू शकतात. नशिबानं पुर्ण झालेले काम तुम्हाला आनंद देऊ शकेल. सफलतेचा पुरस्कारही तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून सहयोग मिळेल. दुसऱ्यांची मदत करा. दुसऱ्यांशी गोड बोला. 
   

  निगेटिव्ह - काही लोक गुपीत पद्धतीने तुम्हाला विरोध करु शकतात. अशास्थितीमध्ये तुम्हाला सावधान राहावे लागेल. दुसऱ्यांना कमी लेखण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर, स्वत:चे नुकसान होऊ शकते. कोणत्या प्रकारच्या राजनीतीमध्ये तुम्ही गोंधळू शकता. याने तुमचा वेळही खराब होऊ शकतो. थकवा आणि तणाव परिस्थितींमध्ये अडकून राहण्यापासून स्वत:ला वाचवा. ऑफिसमध्ये कठिन स्थितीही बनू शकते. तुम्ही कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्यापुर्वी त्याच्याविषयी विचार करा. 


  काय कराल - आपली बहिण, मावशी किंवा कोणत्याही मैत्रिणीला मिठाई खाऊ घाला.


  लव्ह - तुमची लव्ह लाईफ सामान्य असेल. दिवसही आनंदी असेल. पार्टनरही तुमच्या भावनेची  किंमत करेल.


  करिअर - कार्यक्षेत्रामध्ये सहयोग तर मिळणार नाही, पण स्वत:च्या हिम्मतीवर महत्वपूर्ण काम तुम्ही कराल. शेयर मार्केटमध्ये फायदा होण्याचे योग बनत आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.


  हेल्थ - अधिक मेहनतीने परेशान होऊ शकतात. डोकेदुखीही होऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 4 Sep 2018
  मीन राशी, 4 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्‍ह - पैशासंबंधी काही लाभ होऊ शकतो. आत्‍मविश्‍वासाने पुढे जाल. प्रयत्‍न केल्‍यास काही नव्‍या संधी तुमचे दार ठोठावू शकतात. स्‍वत:वर विश्‍वास ठेवा. एखादी गोपनिय गोष्‍ट कळू शकते. एखादे प्रेम प्रकरणही सुरू होऊ शकते. कोणाला प्रपोज केले तर त्‍याचा स्‍वीकार होण्‍याची शक्‍यता आहे. एखाद्या विशेष व्‍यक्‍तीसाठी तुमच्‍या मनात रोमँटीक विचार येतील. मित्रांकडूनही मदत मिळेल. 


  निगेटिव्ह - भावनावर नियंत्रण ठेवा. अधिक संवेदनशीलतेचा त्रास होऊ शकतो. गैरसमजुतीचे शिकार बनू नका. अधिक मेहनत घ्‍यावी लागेल. एखादे काम हातात घेतल्‍यावर त्‍याला पूर्ण करूनच सोडा. चंद्रमामुळे मानसिक तणावा वाढू शकतो. जे काम तुम्‍हाला आवडत नसेल त्‍याला अजिबात‍ करू नका. आपल्‍या खासगी गरजांबाबत सावधानता बाळगा. पैशांमुळे तणाव वाढू शकतो. 


  काय करावे - दुध, पाणी प्‍या. 


  लव्‍ह - पार्टनरवर आपला निर्णय लादू नका. दिवस सामान्‍य राहिल. पार्टनरसोबत एखादी समस्‍या उद्भवल्‍यास मोठ्यांचा सल्‍ला घ्‍या. 


  करिअर - नोकरदार लोकांचा तणाव काहीसा कमी होऊ शकतो. विद्यार्थी त्रस्‍त असू शकता. थोडा तणावही राहिल. अभ्‍यासात मन लागणार नाही. 


  हेल्थ - वाहनांपासून सावधानता बाळगा. जखमी होऊ शकतात.  

Trending