Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 12:01 AM IST

आजचे राशिभविष्य (6 Sep 2018): जाणून घ्या, सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती आणि कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  Today Horoscope (6 Sep 2018, आजचे राशिभविष्य): कसा राहील आजचा दिवस आणि कोणाचा होणार भाग्योदय. प्रेमात कोणाचा होणार वाद आणि कोण करणार रोमान्स. नोकरी आणि व्यापार कामात कोणाला लागणार लॉटरी. कसे राहील आरोग्य आणि कोणाला राहावे लागेल सावध. कोणत्या राशीचे उजळणार भाग्य आणि कोण होणार आज उदास. स्वतःच्या राशीनुसार जाणून घ्या, 6 Sep 2018 च्या संपूर्ण दिवसाची स्थिती रिलिजन दिव्य मराठीवर.

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  मेष राशिफळ (6 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक आज कोणत्याही आव्हानाचा सामना भयमुक्त होऊन करतील. आज तुम्ही कामाचे प्रेशरही व्यवस्थित हॅण्डल कराल. जाणून घ्या, मेष राशीच्या लोकांसाठी कशी राहील आजची सूर्य-चंद्राची स्थिती, धन लाभाचे योग आहेत की नाही, कुटुंब आणि व्यवसायासाठी कसा राहील आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

   

  पॉझिटिव्ह - मनातील गोष्ट एखाद्याशी शेअर करू शकता. यामुळे तुम्हाला फायदा होईल. कुटुंबातील मतभेद दूर होतील. घराच्या बाहेरही तुम्हाला काही लोकांसोबत असलेले गैरसमज दूर करावी लागतील. दिवस चांगला राहील. तुमच्या जवळपास चालू असलेल्या गोष्टींवर लक्ष ठेवावे. आज तुम्हाला व्यर्थ विचार आणि मनातील शंका दूर करण्याची आवश्यकता आहे. शांततेने स्वतःचा विचार करा.


  निगेटिव्ह - खरेदी करताना सावध राहावे. चंद्रामुळे धावपळ होऊ शकते. अडचणीसुद्धा वाढू शकतात. प्रत्येक काम सावधपणे करावे. एखादी अनामिक भीती त्रासदायक ठरेल. पैशांच्या बाबतीत सावध राहावे. शत्रू त्रास देण्याचा प्रयत्न करतील. खर्च वाढू शकतो.


  काय करू नये - सूर्यास्ताच्या वेळी काहीच खाऊ-पिऊ नये.


  लव्ह - मनामध्ये पार्टनरविषयी संमिश्र भावना राहतील. वादामध्ये पडू नये. प्रेम मिळाल्यामुळे आनंदी राहाल.


  करिअर - नोकरी-व्यवसायात काही मनाविरुद्ध बदल घर शकतात आणि यामध्ये तुमचे करिअरही राहील. द्विधामनस्थितीमुळे कामात मन लागणार नाही. निर्णय घेणे अवघड जाईल. मन अभ्यासात कमी लागेल. काम जास्त राहील.


  हेल्थ - पोटाचे आजार होऊ शकतात. मानसिक तणाव राहील. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  वृष राशिफळ, (6 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक आज आळशीपणामुळे काही कामे अपूर्ण सोडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामामध्ये पक्षपातीपणा करू नये. आज 6 Sep 2018 तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - विश्वास ठेवा आणि विनम्रपणे पुढे जा. बहुतांश समस्यांचा तोडगा लवकरच मिळेल. प्रवासाचा योग आहे. असपासच्या ठिकाणी प्रवासाला जाऊ शकता. काही कामे वेळेत पूर्ण होतील. पैशांच्या प्रकरणांत मित्रांचे सहकार्य मिळेल. मुले आणि कुटुंबाचे सहकार्यही मिळत राहील. फायद्याच्या संधी मिळतील. 


  निगेटिव्ह - काही कामांत तुम्हाला लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो. काही कामांत नशीब साथ देणार नाही. त्यामुळे कामात अडथळे निर्माण होतील. परिश्रमाचे फळ मिळणार नाही. काही कामांमध्ये इच्छा नसतानाही तडजोड करावी लागेल. काम आणि परिश्रमही जास्त राहील. तुम्हाला कामाच्या तुलनेत कमी मोबदला मिळेल. 


  काय करावे - विष्णुला तुलसीपत्र अर्पण करा. 
   

  लव्ह - प्रेमाचे उत्तर प्रेमाने मिळेल. कोणाला प्रपोज करायची इच्छा असेल तर करा, नव्या संबंधांची सुरुवातही होऊ शकते. 


  करिअर -  करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते. ती सोडू नका. खालच्या स्तरातील लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नव्या योजना समोर येतील. अनुभवी लोकांकडून सल्ला घेऊनच काही करायला हवे. विद्यार्थी परीश्रम करतील तरी योग्य फळ मिळणार नाही.


  हेल्थ - लहान आजारांतील रोगांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. नाक, कानात समस्या निर्माण होऊ शकते. 

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  आजचे मिथुन राशिफळ (6 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

   

  पॉझिटिव्ह - नवीन गुंतवणुकीसाठी ग्रहांची मदत मिळेल. तुमच्यासाठी दिवस ठीक-ठाक राहील. पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढेल. दृढ निश्चय आणि तुमच्याजवळ असलेल्या ऊर्जेच्या बळावर महत्त्वपूर्ण काम पूर्ण करू शकाल. कुटुंबातील लोक तुमच्यावर खुश होतील. तुमची ठरवलेली कामे पूर्ण होतील. आज यशस्वी व्हाल.


  निगेटिव्ह - काही लोक तुमच्यावर ईर्ष्या करतील. तुम्हाला आज काही जवळचे लोक मदत करण्यास टाळाटाळ करतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणारी एखादी संधी हातामधून निघून जाईल. दिवसभरातील कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.


  काय करावे - गुलाबाचे फुल सोबत ठेवा.


  लव्ह - लव्ह-लाइफमध्ये कामातील व्यस्तता बाधा ठरू शकते. जोडीदारासोबत जेवढा वेळ घालवता येईल तेवढा वेळ व्यतीत करावा.


  करिअर - जास्त कमावण्याच्या हव्यासापोटी शेअर-सट्टामध्ये पैसे लावू नयेत. आज जॉब आणि बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नये. महत्त्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. व्यर्थ रिस्क घेऊ नये. विद्यार्थ्यांना मनासारख्या गोष्टी न घडल्यामुळे वाईट वाटू शकते.


  हेल्थ - झोपेची कमी आणि थकवा आल्यामुळे डोळ्यांचा त्रास होऊ शकतो.

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - धैर्य, मेहनत आणि प्रामाणिकपणा गरजेचा आहे. प्रयत्न केल्यास कठीण कामही सोप्या पद्धतीने तुम्ही करु शकाल. काही नवीन संधी तुम्हाला मिळतील. इतरांशी झालेल्या भेटीगाठीतून नवीन गोष्टी तुम्हाला समजतील. मित्र आणि भावाच्या मदतीने विचारात असलेली कामे पूर्ण होतील. आवश्यक कामात बदल होऊ शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी किंवा एखाद्याला आर्थिक मदत करण्यापूर्वी सल्ला नक्की घ्या.


  निगेटिव्ह - तुम्ही एखाद्याचे म्हणणे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसाल. भविष्याचा विचार करुन टेन्शन घ्याल. झोप पूर्ण न झाल्याने अस्वस्थ वाटेल. अज्ञात व्यक्तीच्या बोलण्यात येऊ नका. पैशांची जोखिम उचलू नका. नोकरी आणि व्यवसाय करणा-या लोकांनी मोठे निर्णय सावधगिरीने घ्यावे. 


  काय करावे - जास्त स्पायसी आणि तेलकट खाण्यापासून दूर राहावे.
   

  लव्ह - तुमची लव्ह लाइफ चांगली राहील. एखाद्या व्यक्तीशी भेट झाल्याने तुम्ही त्याच्याशी प्रभावित व्हाल. पार्टनरकडून प्रेम आणि सुख मिळेल. 


  करिअर -  पैशांकडे लक्ष द्या. नोकरी करणा-यांनी अधिका-यांकडून मदतीची अपेक्षा ठेऊ नका. बिझनेस करणा-या लोकांचा पैसा अडकू शकतो. शिकण्यासाठी बरेच काही आहे, पण वेळ कमी असल्याने तुम्ही निराश होऊ शकता. 


  हेल्थ - तब्येत सामान्य राहील, अंगदुखी आणि आळस राहील.  

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya): सिंह राशीचे लोक आरामदायक जीवन पसंत करतात. यामुळे आज बहुतांश काम कम्फर्ट झोनमध्ये राहून करण्याचा प्रयत्न कराल. यासोबतच आत्मविश्वास आणि धाडसी स्वभावामुळे काही काम मन लावून कराल. आरोग्य, धन-संपत्ती, कुटुंब आणि व्यवसाय क्षेत्रासाठी कसा राहील आजचा दिवस, वाचा सविस्तर.

  पॉझिटिव्ह - घर, परिवार आणि मित्र मंडळींविषयी आणि सक्रीय राहाल. आपल्या कामावर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला आवश्य कामी येईल. गुप्तरित्या काही आवष्यक कामकाज करण्यात आपण यशस्वी ठराल. यात्रेचा देखील योग आहे. आपण अधिक भावूक होऊ शकता. ही वेळ अधिकाधिक मेहनत घेण्याची आहे. सोबत असलेल्या लोकांकडून वेळेवर सहकार्य मिळू शकते. 


  निगेटिव्ह - आपल्याला प्रत्येक कार्य सतर्क राहून करावे लागेल. कुणालाही न मागता सल्ला देऊ नका. एखादी छोटीशी चूक सुद्धा आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अनाश्यक खर्च वाढू शकता. हवेतून पसरणाऱ्या रोगांपासून सावध राहावे. एखाद्या प्रकारच्या संक्रमणाची भीती सुद्धा राहील. विचार आणि भावनांमध्ये आक्रमकता येऊ शकते. जास्तीचे खर्च आणि अपयशामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. 


  काय करावे - पिंपळाच्या झाडाला हळदचे पाणी अर्पण करावे.

   
  लव्ह - आपण लव्ह लाइफमध्ये वादांपासून दूरच राहा. अविवाहित लोकांनी सतर्क राहावे. कुणालाही लव्ह प्रपोझल पाठवण्याची घाई करू नका. थोडा धीर धरावा. 


  करिअर - कार्यक्षेत्रात सावधान राहण्याचा योग आहे. नोकरीत ट्रान्सफरचा योग जुळत आहे. अधिकाऱ्यांकडूनही मदत मिळू शकणार नाही. गृहित धरलेली कामे आज अपुरे राहू शकतात. बिझनेस करणाऱ्या लोकांनी देव-घेव आणि गुंतवणुकीत कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नये. विद्यार्थ्यांसाठी दिवस अनुकूल आहे. आपल्या अभ्यासावर लक्ष द्या. अभ्यासाची वेळ इकडे-तिकडे वाय घालू नका.


  हेल्थ - भूख न लागल्याने आणि कमी झोपेमुळे अशक्तपणा जाणवू शकतो.

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह -  काम करायची इच्छा नसेल तरीही काम करा. आज तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल. त्याचा फायदा आगामी काळात मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधीही मिळेल. एखाद्या विशेष गोष्टीबाबत तुमचे मत बदलू शकते. कुटुंबाला तुमची खूप गरज वाटेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जुन्या नियोजनामुळे धन लाभ होऊ शकतो. 


  निगेटिव्ह - लहान लहान गोष्टींमध्ये अडकू शकता. ऑफिसमध्ये तांत्रिक गोष्टीत अडकू शकता. त्यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. काही मित्र किंना लोकांचा स्वभाव विचित्र असू शकतो. जुनाट आजारांचा त्रास होईल. अपघात किंवा जखमी होण्याची शक्यता आहे. शत्रू वरचढ ठरू शकतो, सावध राहा. आपल्या योजना कोणाबरोबरही शेअर केल्या नाही तर अधिक चांगले. 


  काय करावे - तेल आणि काळे मीठ मिसळून घराबाहेर ठेवा. 


  लव्ह - जीवनसाथी आणि पार्टनरकडून गिफ्ट मिळू शकते. एकत्र वेळ घालवाल. फिरायलाही जाऊ शकता. 


  करिअर - बिझनेस किंवा नोकरीनिमित्त महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. आज असी काही कामे करावी लागू शकतात जी करायची इच्छा नसेल. नोकरीत शत्रूंचा त्रास होऊ शकतो. कॅम्पसमध्ये वेळ वाया जाऊ शकतो. घरात बसून अभ्यास केलेले अधिक चांगले राहील. 


  हेल्थ - जुन्या रोगांचा त्रास संभवण्याची शक्यता आहे. जखमीही होऊ शकता. 

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  तूळ राशी, 6 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - संयमाने काम करावे लागेल. बहुतांश प्रकरणे तुमच्या बाजुने निकाली लागतील. आज तुम्ही जे कराल, त्याचा लाभ भविष्यात मिळेल. शब्द पाळायला शिका. दुसर्‍यांनाही समजून घ्यावे लागेल. ओळखीतील लोकांकडून मदत मिळेल. अनेक समस्यांवर मात कराल. आनंद मिळेल. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणात यश मिळेल. मन प्रसन्न राहील. आर्थिक चणचण दूर होईल. रखडलेला पैसा मोकळा होईल.
   

  निगेटिव्ह - कामाच्या व्याप वाढण्याची शक्यता. कामे वेळेत हातावेगळी करावी लागतील. एखाद्या मुद्द्यावर स्पष्ट बोलावे लागले. बोलताना संयम राखा. त्यांचा तुम्हालाचा फटका बसेल. 


  काय करावे - काळ्या कुत्र्याला तेल लावलेली पोळी खाऊ घाला.
   

  लव्ह - जोडीदारापासून आर्थिक लाभ मिळेल. लव्ह लाइफमध्ये तडजोड करावी लागेल. आवडत्या व्यक्तीसोबत संवाद साधाल. 


  करिअर - बिझनेसचा विस्तार करण्‍यासाठी गुंतवणूक करावी लागेल. काही निर्णय प्रगती आणि आर्थिक फायदा करुन देणारे ठरतील. बेरोजगारांना अच्छा दिन येतील. नोकरी मिळेल. वरिष्‍ठांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. मोठी जबाबदारी मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील. 


  हेल्थ - सध्या वातावरण दुषीत आहे. आरोग्याची काळजी घ्या. 

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  आजचे वृश्चिक राशिफळ (6 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये काहीवेळा ईर्ष्या निर्माण होते. आज तुम्हाला यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावे लागेल. जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे होऊ शकते नुकसान.

  पॉझिटिव्ह - आज तुम्हाला काही नवीन अनुभव येऊ शकतात. तुमचे लक्ष आज दूर राहणा-या लोकांवर राहिल. तिथल्या संबंधीत कामाविषयी विचार करु शकता. तुमच्या निवास स्थानापासून दूर किंवा विदेशातून धनलाभाचे योग जुळत आहेत. काही लोकांसोबत तुम्ही अचानक मैत्री करु शकता. मित्र आणि प्रेमी तुमच्यासाठी मदत करु शकतात. तुमचे कामही चांगले चालेल. एखादी नवीन आणि चांगली सवय लागू शकते. जो बदल होतोय, तो स्विकारा. अचानक प्रवासाचे योग जुळतील. घरात आनंदी वातावरण राहिल. तुमची वेळ चांगली राहिल. एखाद्या मोठ्या गोष्टीत समझौता आणि सहकार्य करण्यात प्रत्येक वेळी तयार राहा. सुरु केलेले जास्तीत जास्त काम पुर्ण होऊ शकतात. 


  निगेटिव्ह - तुमच्या सवयीत काही बदल करावे लागतील. एखाद्या वाईट सवयीमुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. तुम्ही ते सोडून देऊ शकता. मानहानीचे योग जुळत आहेत, सावध राहा. काही न सुटलेले प्रश्न तुमच्या समोर येऊ शकतात. नोकरी बदलण्याची इच्छा होईल. 
  आजचा उपाय - हळद आणि चंदन मिसळून गायीला टिका लावा. 


  लव्ह - आज तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकता. अविवाहित लोकांसाठी वेळ चांगली आहे. कुणाला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. 


  करिअर - काम बदलण्याची इच्छा राहिल. नोकरी आणि बिझनेसमध्ये मन लागेल. अभ्यासात कमी मन लागेल. जुन्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. सोबत काम करणा-या काही लोकांसडून तुम्हाला मदत मिळू शकते.


  हेल्थ - तुमचे आरोग्य चांगले राहिल. जुन्या अडचणी दूर होतील. जखम झालेली असेल तर आराम मिळेल. 

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज तुम्ही तुमच्या जवळपास असलेल्या लोकांना चांगल्या आणि ज्ञानाच्या गोष्टी सांगण्याचा प्रत्यन कराल परंतु तुमची एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुमच्या राशीमध्ये धनलाभाचा योग आहे की नाही, कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - काही विशेष नियोजित कामे यशस्वी होऊ शकतात. एक काम संपताच दुसऱ्याचे प्लानिंग सुरू करा. लवकरच तुम्हाला काही चांगल्या संधीही मिळतील. पैशांच्या अडचणीचा सामना करत असाल तर दिलासा मिळू शकतो. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि ठरवलेली कामे उरकण्यात यश मिळू शकते. घर किंवा ऑफिसमध्ये काहीतरी नवे करण्याचा प्रयत्न कराल. 


  निगेटिव्ह - एखाद्या मोठ्या पदावर असाल तर सावध राहा. तुमचे एखादे वक्तव्य किंवा तशी बाब तुम्हाला अडचणीत आणू शकते. धावपळीत तुमचा तणाव वाढू शकतो. उत्साहात येऊन तुम्ही स्वतःचेच नुकसान करून घेऊ शकता. 
   

  लव्ह -  तुमचे प्रपोजलही मंजूर होऊ शकते. प्रेम व्यक्त करण्याचा विचार करत असाल तर करुन टाका. 


  करिअर - बिझनेसशी संबंधित कोर्टाच्या प्रकरणात तुमची बाजू मजबूत होईल. व्यवसाय वाढवण्यात यश मिळू शकेल. खालच्या स्तरातील लोकांकडून मदत मिळू शकते. विद्यार्थ्यांना परिश्रमाचे फळ मिळू शकते. 


  हेल्‍थ - थकवा होईल. आराम केला नाही तर त्रासाला सामोरे जावे लागू शकते. 

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  6 Sep 2018, मकर राशिफळ (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज आपले काम पूर्ण करण्यासाठी अनुभवाची पराकाष्ठा करतील. नवीन कार्यपद्धतीवर तुम्ही कमी विश्वास ठेवाल. आजच्या ग्रह-नक्षत्रांची स्थितीही सांगत आहे की, काही जुने काम आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते, कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे, आरोग्य आणि लव्ह लाइफसाठी कसा राहील दिवस. वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज तुम्‍ही सकारात्‍मक आणि उत्‍साही राहाल. तुमच्‍याशी भेटून काही लोक प्रभावित होतील. नात्‍यांमध्‍ये सुधारणा होईल. जीवनसाथी किंवा प्रेमीसोबतचे नाते आणखी बहरेल. अतिशय सहजतेने हे काम होईल. जुन्‍या अडचणींवर उपाय मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. मुलांकडून सूख आणि आर्थिक सहाय्यता मिळेल. विवाहाचे प्रस्‍तावही मिळतील. 


  निगेटिव्ह - दैनंदिन कामात काही अडथळे येऊ शकतात. एखादी न आवडणारी घटनाही घडू शकते. आळसामुळे काही कामे बिघडू शकतात. मकर राशीच्‍या लोकांनी सावधानता बाळगावी. आरोग्‍याच्‍या बाबतीतही दिवस चांगला राहणार नाही. अनेक गोष्‍टींमध्‍ये तुम्‍हाला सांभाळून राहावे लागेल. नविन गुंतवणूक करू नका. 


  काय करावे - एखाद्या मंदिरात दान द्या. 


  लव्‍ह - खासगी संबंधात गंभीर मतभेदाचे योग बनत आहेत. धैय ठेवा, ही वेळही निघून जाईल. 


  करिअर - नवे विचार व नव्‍या पद्धतींनी पुढे जाल. ऑफिसमध्‍ये मेहनतही अधिक घ्‍यावी लागेल. एखादे नवे कामही मिळू शकते. मुलाखत देण्‍यासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थ्‍यांना यश मिळेल. 


  हेल्‍थ - आळसाचा त्‍याग करा. अन्‍यथा नुकसान होऊ शकते. डोकेदुखी होण्‍याची शक्‍यता आहे.   

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  कुंभ राशी, 6 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.

  पॉझिटिव्ह - तुम्ही नुकतेच जे काम सुरू केले आहे. त्यासाठी तुमचे विचार व्यावहारीक ठेवा. एखाद्या समस्येचे सकारात्मक आणि संतोषजनक समाधान निघू शकते. तुमच्यासाठी आजचा दिवस रोमॅन्टीक असेल. नव्या कपड्यांची खरेदीही होऊ शकते. पैशांच्या कामासाठी काहीसा प्रवासही होऊ शकतो. 


  निगेटिव्ह - एखाद्या गोष्टीसाठी कोणावर अधिक दबाव टाकू नका. पैशांबाबत काही प्रकरणांबद्दल तुम्ही कोणताही निर्णय घेऊ नका तरच चांगले होईल. गुंतवणूकीच्या बाबतीत तुम्हाला धैर्य ठेवावे लागेल. दुसऱ्यांसोबत व्यवहार करण्यामध्ये तुम्हाला सावधानता बाळगावी लागेल. आजच्या समस्या तुमच्या कामात अडथळे बनु शकतात. 
   

  काय करावे - खोटे बालू नका.


  लव्ह - आज तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. पार्टरकडून सुख आणि आनंद मिळेल. नविन मित्र बनवाल.


  करिअर - आज तुम्ही ऑफिसच्या राजकरणाचे शिकार होऊ शकतात. ऑफिसमध्ये काही खास लोकांकडून तुम्हाला मदत मिळू शकते. याने तुम्ही परेशान असाल. नोकरीमध्ये स्वत:च्या प्रदर्शनवर लक्ष द्यावे लागेल. बेरोजगार लोकांना मुलाखत देतांना सावधानता बाळगावी लागेल. कॉमर्स आणि मेडिकल फील्ड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.


  हेल्थ - तब्येतीबाबत सावध राहा. हवामानानुसार आजारी पडू शकतात.

 • आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  मीन राशी, 6 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्ह - आज तुमच्‍यासोबत काही सुखद घटना घडतील. बेरोजगार लोकांना नोकरीच्‍या नव्‍या संधी मिळू शकतात. एखाद्या शुभ चिंतकाने सल्‍ला दिल्‍यास तो मान्‍य करून घ्‍यावा. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाला निघण्‍याची शक्‍यता आहे. प्रेमीसोबत चांगला वेळ घालवाल. स्‍वत:वर नियंत्रण ठेवा. नियम पाळाल आणि मर्यादेत राहाल तर तुमच्‍यासाठी हे चांगलेच आहे. अविवाहित लोकांनी प्रेमात थोडा संयम बाळगावा. कुटुंबाच्‍या एका सदस्‍याबाबतीत तुम्‍हाला चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आपला व्‍यवहार सकारात्‍मक ठेवा. केवळ आपल्‍या कामावर लक्ष द्या. 


  निगेटिव्ह - काही गोष्‍टींमध्‍ये तुम्‍ही अति कराल. तुमच्‍यासाठी हे नुकसानदायक आहे. पैसा उधार देण्‍यापासून वाचा. कोणत्‍याही कामात घाईगडबड करू नका. जोखिम घेण्‍यापासून वाचा. 


  काय करू नये - कोणतीही महिला किंवा मुलीचे मन दुखवू नका. 


  लव्‍ह - स्‍वत:वर नियंत्रण ठेवा. दिवस चांगला राहिल. पार्टनरसोबत वेळ चांगला जाईल. 

  करिअर - नोकरी आणि व्‍यवासायातील जुने कामे आज पुर्ण होऊ शकतात. बेरोजगार लोकांनी रोजगारासाठी नव्‍या दिशेने प्रयत्‍न करावेत. हिंमत ठेवा, यश मिळेल. विद्यार्थ्‍यांसाठी दिवस मेहनतीचा राहिल. 


  हेल्‍थ - दिवसभराच्‍या धावपळीमुळे थकाव आणि डोकेदुखी होऊ शकते. आराम करावा. 

Trending