Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Dec 06, 2018, 12:00 AM IST

Today Horoscope in Hindi (6 Dec 2018): कशी आहे ग्रहांची स्थिती, कोणत्या ग्रह तुम्हाला करून देऊ शकतो धनलाभ, येथे वाचा

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 6 Dec 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.
  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    मेष राशिफळ (6 Dec 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - सॅलरीसहित काही खास कामासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा होऊ शकते. आज तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकण्यास मिळू शकते. ट्रेनिंगही होऊ शकते. जे काही आज शिकून घ्याल ते भविष्यासाठी योग्य राहील. अचानक महत्त्वाचे काम आजपासून सुरु करावे लागेल. नवीन आणि खास कामाची प्लॅनिंगही होईल.


    निगेटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानामध्ये आहे. यामुळे कामाचे पूर्ण फळ मिळणार नाही. कामामध्ये मन कमी लागेल. तुम्हाला सावध राहावे लागेल. कोणत्याही प्रकारचे आज नुकसान होऊ शकते. निर्माण कार्यामध्येही खर्च होण्याची शक्यता आहे. कामामध्ये सावध राहावे. वाहनांमुळे जखम होण्याची शक्यता आहे. स्वतःची गाडी इतरांना आज देऊ नये.


    काय करावे - पाण्याच्या टाकीत पिवळे फुल टाकावे.


    लव्ह - तुम्हाला पार्टनरकडून ज्या उत्तराची अपेक्षा आहे, ते लवकरच मिळेल. मनाचा आवाज ऐकत राहा. जोडीदारासोबत एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.


    करिअर - नोकरदार लोकांना इन्क्रिमेंट किंवा प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. विचारपूर्वक गुंतवणूक करावी. काही विद्यार्थ्यांना मेहनतीपेक्षा कमी यश प्राप्त होऊ शकते.


    हेल्थ - पोटाच्या समस्या वाढू शकतात. अंग आणि डोकेदुखी होऊ शकते.

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    6 Dec 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - जे काम करत आहात, त्यात मेहनतीच्या हिशेबाने फळही मिळायला लागेल. तुमच्या ऊर्जा-उत्साह ठासून भरलेला राहील. आज काही नवे खरेदी करण्याचा विचार मनात येईल. चंद्राच्या सहकार्यामुळे तुमची बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील. आज एखाद वाद मिटवण्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही आज मनात येईल ते काम तडीस नेऊ शकता. जवळच्या नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. नव्या लोकांशी मैत्री होईल. आज एखादा प्रवासही ठरू शकतो. नवे विचार दिवसभर डोक्यात घोळत राहतील. तुमच्यासाठी हेही चांगले राहील. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल.


    निगेटिव्ह - पैशांच्या बाबतीत त्रस्त व्हाल. दुर्लक्ष करू नका. प्रत्येक जण तुमच्याशी सहमत असेलच असे नाही. आज कुणालाही तुमचे म्हणणे बळजबरी पटवून देण्याच्या फंदात पडू नका. वाद होतील. नातेसंबंधांत कटुता येण्याची शक्यता.


    काय करावे - तळलेला पदार्थ एखाद्या गरिबाला खाऊ घाला.


    लव्ह - लव्ह पार्टनरशी सौजन्याने वागा. भावनिक दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका.


    करिअर- बिझनेसमध्ये पैसा थांबणार नाही. आज नवी गुंतवणूक करू शकता. काम जास्त राहील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सहज यश मिळेल.


    हेल्थ- मानसिक थकवा आणि झोपही कमी राहील.

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    6 Dec 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - चांगली बातमी मिळणार असल्याचे योग जुळून येत आहे. पगारवाढ किंवा प्रमोशनचा संकेत मिळू शकतो. एखाद्या जुन्या गुंतवणुकीचा आज फायदा मिळू शकतो. नवीन ऑफर मिळतील. एखादी वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर आज त्यामध्ये यश मिळेल. आज अनेक लोक तुमची मदत करू शकतात. यामुळे तुम्हाला फायदा होईल. जमीन-प्लॉट कामामध्ये आज फायदा होऊ शकतो. वागणूक आणि उदारतेमुळे आज तुम्ही काही लोकांची मने जिंकून घेऊ शकता.


    निगेटिव्ह - वयोवृद्ध किंवा एखाद्या अधिकाऱ्यासोबत तणाव, विरोध किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. सावध राहावे. काही गोष्टींमध्ये मन मारून सहमती दाखवावी लागेल. खर्चही वाढू शकतो. या राशीचे लोक कोर्ट प्रकरणात आज अडकू शकतात.


    काय करावे - पांढरे फुल नालीमध्ये टाकावे.


    लव्ह - प्रेमासाठी आजचा दिवस चांगला आहे. सयंम ठेवल्यास सर्वकाही ठीक होईल.


    करिअर - नोकरदार लोकांनी धैर्य बाळगावे. ऑफिसमध्ये कोणाशीही व्यर्थ वाद घालू नये. गुंतवणुकीसाठी दिवस सामान्य आहे. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील.


    हेल्थ - तुमची तब्येत अचानक बिघडू शकते. जुना आजार डोके वर काढू शकतो.

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    6 Dec 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - लांबच्या ठिकाणाहून एखादी सुखद वार्ता मिळू शकते. नवीन ऑफरसाठी तयार राहा. विचारपुर्वक निर्णय घ्यावा. अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आज गोचर कुंडलीच्या पाचव्या भावातील चंद्र  शुभ ठरेल. काही चांगले बदल घडतील. आज तुम्ही तुमचे काम अधिक  चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न कराल. कार्यक्षेत्रात नवीन योजना आखाल. अपोझिट जेंडरमुळे लक्ष विचलित होईल. आकर्षण वाढू शकेल. लव्ह प्रपोजल देण्याची इच्छा होईल. 


    निगेटिव्ह - काही खास कामांत चुका होऊ शकतील. कामात मन कमी लागेल. निरर्थक गोष्टींमुळे लक्ष विचलित होईल. गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमचा खोटारडेपणा उघड होऊ शकतो. 


    काय करावे - काटेरी झाडावर दुध अर्पण करा.


    लव्ह- दिवस उत्तम. जोडीदाराकडून मदत आणि धन लाभ होण्याचे योग आहेत. 


    करिअर- बिझनेस आणि नौकरीशी संबंधित अडकलेला पैसा परत मिळू शकतो. वरिष्ठांशी मधुर संबंध तयार होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल.  


    हेल्थ - डोळ्यासंदर्भातील तक्रार उद्भवू शकते. सावध राहा. जे लोक चश्मा वापरतात त्यांचा नंबर वाढू शकतो.  

     
  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    आजचे सिंह राशिफळ (6 Dec 2018, Aajche Singh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - परिस्थिंमध्ये बदल दिसून येईल. चंद्राची स्थिती आपले आयुष्य सुखमय करेल. लोकांसमोर आपली प्रतिष्ठा वाढेल. यासाठी आपणही पूर्ण प्रयत्न कराल. आपल्या सृजनशीलतेने मित्रांना आकर्षित करू शकाल. आपले म्हणणे अगदी योग्यरित्या मांडू शकाल. आपले आयुष्य जितके सहज आणि सामान्य राहील तितकेच आपल्यासाठी चांगले ठरेल. आईकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.


    निगेटिव्ह - जुने ताण-तणाव वाढू शकतात. थकवा जाणवेल. कामकाज-नोकरीच्या बाबतीत काही नवीन करण्याची गरज नाही. जे काम सुरू करण्याचा विचार करत आहात ते तूर्तास करू नका. घाई-घाईत किंवा अतीउत्साही होऊन काम करू नका. रिस्क घेऊन काम नाही केलात तर योग्य राहील. आपल्याला काहीसे सावध राहावे लागेल. ठरवलेली कामे पूर्ण होत नसल्याने तणाव वाढू शकतो.


    काय करावे - आई किंवा आईसमान एखाद्या महिलेला प्रणाम करावे.


    लव्ह - जोडीदारासोबत काहीसा वाद होईल, पण लवकरच सर्वच ठीक होईल. 


    करिअर - मानसिक संतुलन ठेवा. करिअर आणि प्रोफेशनसाठी ही वेळ सामान्य राहील. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. घाई-गर्दीत टेंशन होऊ शकते.


    हेल्थ - मोसमी आजार आपले त्रास वाढवू शकतात. अॅलर्जी सुद्धा होऊ शकते. सावध राहा.

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    6 Dec 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - एखाद्या खास कामासाठी आज जास्त मेहनत करावी लागू शकते. आज काहीतरी नवे करण्याचीही इछ्छा असेल. चांगली बातमी मिळू शकते. यापूर्वी केलेल्या कामांचे यश मिळेल. तुम्हाला हवी ती खरेदी करू शकता. वेळेचा सदुपयोग केला तर एखादे मोठे काम मार्गी लागू सकते. प्रेम आणि रोमँटिक संबंधांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. कुटुंबातील वाद किंवा अडचण सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वी व्हाल. मित्र भावांकडूनही मदत मिळेल. प्रियकराकडूनही भेट होण्याची शक्यता आहे. पलव्ह पार्टनरशी भेट होण्याची शक्यता आहे. 


    निगेटिव्ह - एखाद्या होष्टीवर जास्तच भावूक होऊन रिअॅक्ट झाल्यास तुमची चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते. काही बाबींमुळे तुमचा ताण वाढू शकतो. डोकेदुखी, थकव्यामुळे त्रस्त होऊ शकता. ठरवलेली कामे पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात. 


    काय करावे - देवीच्या मंदिरात लाल फुल अर्पण करा. 


    लव्ह - लव्ह लाइफला मॅरिड लाइफ बनवायची असेल तर कुटुंबासमोर म्हणणे मांडा. 


    करिअर - अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चढ-उतारांनी भरलेला असू शकतो, पण यशही मिळेल. 


    हेल्थ - भोजन करताना सावध राहा अन्यथा पोटाला त्रास होऊ शकतो. 

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    आजचे तूळ राशिफळ (6 Dec 2018, Aajche Tula Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - चंद्र तुमच्या राशीसाठी शुभ आहे. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. आज केलेली मेहनत पुढे खुप कामी येईल. तुमच्यावर काही जास्तीच्या जबाबदाऱ्याही पडू शकतात. आवक वाढू शकते. कामाचा ताण थोडा कमी होऊ शकतो. तुमच्या उत्साहामुळे सर्वजण आनंदी राहतील. व्यावहारात सकारात्मक राहा. मित्रांचे सहयोग मिळेल. मुलांच्या यशाचा आनंद मिळेल. तुमच्या जवळपासचे लोक आनंदी राहतील.


    निगेटिव्ह - योजना केल्याशिवाय कोणतेही काम करू नका. नशिबाच्या भरवश्यावर राहून कुठलेही काम सुरु करू नका. तुमच्यासोबत काही विचित्र घटनाही घडू शकतात. वाहन सांभाळून चालवावे. तुम्हाला इच्छा नसतानाही एखाद्याकडून पैसे उधार घ्यावे लागू शकतात. काही कामात खूप मेहनत करूनही ऐच्छिक फळ मिळणार नाही.


    काय करावे - छोट्या मुलीला गोड खाऊ घालावे.


    लव्ह - तुमच्या सहकार्याने तुमच्या जोडीदाराचे थांबलेले काम पूर्ण होऊ शकते. जोडीदाराचा सहवास सुखावेल.


    करिअर - कामात आणि व्यवसायातही फायदा होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती मिळेल.


    हेल्थ - पोटाच्या संबंधित समस्या वाढू शकतात. झोप न झाल्यामुळे त्रास

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    आजचे वृश्चिक राशिफळ (6 Dec 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - विचारात असलेली कामे वेळेत पूर्ण होतील. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. आज तुमच्या राशीत चंद्र असेल. पैसा कमावण्याची चांगली संधी लवकरच मिळू शकते. आज तुम्हाला सतर्क राहावे लागेल. पैसा आणि सन्मान दोन्हीही मिळेल. विचाराता असलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. आज तुमच्या अडचणी कमी होतील. कोर्टातील जुने प्रकरण संपुष्टात येईल. 


    निगेटिव्ह - वायफळ खर्चावर नियंत्रण आणा. मित्रासोबत मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कागदपत्रांच्या कामात तुम्ही व्यस्त व्हाल. 


    काय करावे - अपोझिट जेंडर असलेल्या व्यक्तीला सुगंधित किंवा सजावटीची वस्तू गिफ्ट म्हणून द्या.  


    लव्ह लाइफ - लव्ह लाइफ उत्तम राहिल. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. 


    करिअर - परिश्रमात दिवस जाईल. वरिष्ठ तुमच्यावर कामाचा दबाव टाकू शकतात. सावध राहा. विद्यार्थ्यांनाही अडचणी भेडसावू शकतात.

     
    हेल्थ- प्रकृतीकडे लक्ष द्या. तुमची तब्येत बिघडू शकते.  

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    6 Dec 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - पैशांच्या बाबतीत दिवस चांगला. शांत राहा. लोक स्वत:हून मदतीसाठी पुढे येतील. एखादे काम नशिबाने पूर्ण होईल. एखादा ठरलेला प्रवास अचानक बदलावा लागू शकतो. समाज आणि कार्यक्षेत्रात मोठ्या व्यक्तींकडून सन्मान मिळेल. एखाद्या कठीण कामात अनाहुत मदत मिळेल, ज्यामुळे दिलासा मिळेल. दूरचे नातेसंबंध मजबूत होतील. जबाबदाऱ्या पार पाडाल.


    निगेटिव्ह - भावुक होऊन कोणताही मोठा निर्णय घ्याल, तर नुकसानीची शक्यता. वायफळ कामांत गुंतून वेळ घालवाल. खर्चात वाढ होईल. घाईगडबडीमुळे नुकसानीची शक्यता. मनात एकाच वेळी अनेक कामे येतील. यामुळे महत्त्वाचे ऐनवेळी विसरून जाल.


    काय करू नये - सिगारेट पिऊ नका.


    लव्ह - विवाहितांसाठी भाग्याचा दिवस. जोडीदाराशी संबंध सुधारतील. परंतु प्रेमीयुगुलांना संमिश्र फळ.


    करिअर - नोकरी आणि बिझनेससाठी शुभ दिवस. आर्थिक फायदाही होऊ शकतो. विद्यार्थ्यांना कमी मेहनतीत यश मिळू शकते.


    हेल्थ- आरोग्य उत्तम राहील. परंतु पायात त्रास जाणवण्याची शक्यता.

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    मकर राशी, 6 Dec 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीच्या लाभ स्थानी चंद्र असल्याने तुमच्यासाठी शुभ आहे. आज जी संधी मिळेल तिला  धैर्याने सामोरे जावे लागेल. वेळेनुसार तुमच्या नियोजनात बदल केला तर फायदा होईल. तुमच्या योजनेवर पुनर्विचार केला तर यशस्वी व्हाल. चंद्र गोचर कुंडलीच्या लाभस्थानी असेल तर पैशांच्या दृष्टीने तुम्ची स्थिती आधीच्या तुलनेत अधिक चांगली असू शकते. थोडाफार विचार करूनच एखादा निर्णय घ्या. परिस्थिती अधिक चांगली होऊ शकते. थोडा विचार करूनच निर्णय घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. अचानक धनलाभाचे योग तयार होत आहेत. बिझनेस आणि नोकरीमध्येही यश मिळू शकते. कामही वाढू शकते. 


    निगेटिव्ह - लहान सहान अडचणी किंवा अपयशांनी तणाव येऊ शकतो. स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करा. यामुळे चांगल्या संधी हातून सुटू शकतात. एखादा व्यक्ती एखाद्या विषयावर लगेचच निर्णय घेण्यासाठी दबाव आणू शकतो. काही ग्रहांमुळे जास्त परिश्रम घ्यावे लागू शकतात. त्यादृष्टीने यश कमी मिळेल. 


    काय करावे - कोणत्याही मंदिरातील प्रसाद खा. 


    लव्ह - पार्टनरबरोबर संपूर्ण दिवस मनोरंजन आणि फिरण्यात जाऊ सकतो. दिवस चांगला राहील. 


    करिअर -  अचानक धनलाभामुळे बिझनेसमध्ये नव्या योजना ठरवू शकता. प्रोफेशनल रिलेशन मजबूत होतील. विद्यार्थ्यांना अधिक परिश्रम करावे लागेल. 


    हेल्थ - मकर राशी असलेल्यांना काही जुनाट रोगांचा सामना करावा लागू शकतो. सावध राहा. 

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    आजचे कुंभ राशिफळ (6 Dec 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - चंद्रमा गोचर कुंडलीच्या घरात असेल. भावंडांची आणि मित्रांची साथ लाभेल. परिवारातील व्यक्तींसोबत वेळ घालवाल. मुलांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणीही सोबती कुठल्याना कुठल्या कामात मदत करतील. अपोजिट जेंडरही तुमच्या फेवरमध्ये येतील. कुटूंब आणि जमीनीच्या प्रकरणात लक्ष द्या. लोक तुमच्या मनातील गोष्टी काढण्याचा प्रयत्न करतील. ऑफीसमध्ये टीमने काम केल्यास तुम्हाला फायदा होईल.


    निगेटिव्ह - प्रवासची योजना रद्द होऊ शकते. काही कामात ऊशीरदेखील होऊ शकतो. एखाद्या गोष्टीची भीती मनात असेल. आपल्या मनातील गोष्टी सगळ्यासोबत शेअर करू नका. कोणवरही विश्वास करू नका. प्रॉपर्टीच्या प्रकरणात दगा फटका होऊ शकतो.


    काय करू नये - तुटलेल्या क्रॉकरीचा उपयोग करू नका.


    लव्ह - लव्ह लाइफ चांगली राहील. जोडिदारासोबत बाहेर फिरण्याचा योग येऊ शकतो. तुम्हाला गिफ्ट मिळू शकते.


    करिअर - प्रोफेशनसाठी दिवस चांगला असेल. धन लाभ होऊ शकतो पण खर्चदेखील वाढू शकतो. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जास्ती मेहनत घ्यावी लागेल.


    हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत काळजीपुर्वक राहा. कफ आणि पित्ताची समस्या होऊ शकते. जुन्या आजारांबद्दल दुसऱ्या डॉक्टरांकडून सल्ला घेऊ शकतात.

  • आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 6 Dec 2018
    6 Dec 2018, मीन राशिफळ (Aajche Meen Rashi Bhavishya):

    पॉझिटिव्ह - आज नशीबाच्या घरी चंद्र असल्याने व्यवसाय करणाऱ्यांना नशीबाची साथ मिळणार आहे आणि फायदा देखील होणार आहे. लिखाण आणि ग्लॅमर क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता. आसपासचे तसेच तुमच्यासोबत काम करणारे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. काही लोक तुमच्यापासून प्रभावित होतील. एखादी जुनी वस्तू खरेदी करू शकता. घर-परिवार, नातेवाईक आणि संपत्ती संबंधीचे प्रकरणे तुमच्यासाठी महत्वपूर्ण होऊ शकतात. इच्छुकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमी किंवा साथीदारासोबत बाहेर फिरायला जाऊ शकतात. 


    निगेटिव्ह - विचारपूर्वक करणाऱ्या कामात अडचणी येऊ शकतात. काही तुमच्याविषयी ईर्षेची भावना ठेवतील.

     

    काय करावे - अपंग व्यक्तीला मदत करा


    लव्ह - आज आपण लव लाइफ संबंधी असलेले महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकता.  


    करिअर - आज व्यवसायसंबंथीत नवीन योजना तयार होऊ शकतात. ऑफिसमध्येही नवीन योजनांसह प्रगती कराल. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत करण्याची आवश्यकता. यामुळे भविष्यात येणारी परिस्थिती तुमच्या बाजूने होऊ शकते.  


    हेल्थ - आज आपल्याला थकल्यासारखे वाटू शकते.

Trending