Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 12:00 AM IST

Today Horoscope in Hindi (7 Sep 2018): कशी आहे ग्रहांची स्थिती, कोणत्या ग्रह तुम्हाला करून देऊ शकतो धनलाभ, येथे वाचा

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 7 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (7 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर

  पॉझिटिव्ह - दिवस ठीक-ठाक राहील. आपल्या लोकांचे प्रेम आणि सहकार्य मिळाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. कुटुंबासाठी वेळ काढावा. एखादी गुप्त गोष्ट आज तुमच्यासमोर येऊ शकते. धैर्य बाळगून चर्चा केल्याने आज समस्येचे समाधान मिळेल. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या मित्राची आज मदत करू शकता.


  निगेटिव्ह - कोणत्या न कोणत्या प्रकराची भीती आज तुमच्या मनात राहील. काही कामे अपूर्ण राहू शकतात. काम पूर्ण न झाल्याची जाणीव तुम्हाला राहील. दैनंदिन काम आहे तेच करा, इतर काहीही नवीन करू नये. कोणताही निर्णय घेऊ नये. सावध राहावे.


  काय करावे - देवीला मेंदी अर्पण करावी.


  लव्ह - पार्टनरसोबत दिवस व्यतीत कराल. जुन्या आठवणी ताज्या होतील. प्रेम आणि सहकार्य मिळेल.


  करिअर - कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळणार नाही. पैसा अडकू शकतो. पुढे जाण्याचा दिवस आहे. एखादा परीक्षा फॉर्म भरू शकता.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला आहे. जुने आजार नष्ट होऊ शकतात.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  वृष राशिफळ, (7 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक आज आळशीपणामुळे काही कामे अपूर्ण सोडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामामध्ये पक्षपातीपणा करू नये. आज 7 Sep 2018 तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - तुमच्यात आत्मविश्वास जास्त राहील. स्वत:चे महत्त्व जाणून नोकरीत प्रमोशनबद्दल सखोल विचार करा. तुमच्यासाठी काहीतरी नवे आणि सकारात्मक करण्याची वेळ आहे. धनलाभ होऊ शकतो. एखादे गिफ्टसुद्धा मिळू शकते. नातेसंबंधांबद्दल जबाबदारी वाढू शकते. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. पैशांची आवश्यक कामे आटोपून घ्या. एखाद्या मित्राकडूनही मदत मिळण्याचे योग आहेत. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल.


  निगेटिव्ह - आज तुम्ही अतिआत्मविश्वासात येऊन काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. सावध राहा. वृषभ राशीच्या व्यक्तींना मेहनत जास्त करावी लागणार आहे. आपल्या स्वभावात उग्रता येऊ देऊ नका. सावधान राहा.


  काय करावे - 5 काजू खा.


  लव्ह - जीवनसाथीच्या प्रगतीचे योग आहेत. प्रेमात यश मिळेल. मानसिक दबाव असूनही तुम्ही आनंदी राहाल.


  करिअर -  नोकरी आणि बिझनेसमध्ये तुमच्या बाजूने परिस्थिती राहील. व्यवसाय वृद्धीचा विषय हातावर येईल. अभ्यासात मन न लागल्याने त्रास होईल. मित्रांकडून मदत मिळेल.


  हेल्थ - पोटदुखीची शक्यता आहे. जेवण सावधगिरीने करा.

   
 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांमध्ये विविध काम एकाच वेळी करण्याची क्षमता असते. तुमच्या याच गुणामुळे आज तुम्हाला फायदा किंवा नुकसानही होऊ शकते. यामुळे आज तुम्ही एकाच वेळी एकच काम करावे. आज तुमच्या आयुष्यात काय घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज तुम्ही खूप व्यस्त राहाल. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, यासाठी तयार राहा. प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल. एखाद्या खास कामाची ऑफर मिळू शकते. धनलाभ होईल आणि तुम्ही तुमच्याव वाणीने कोणालाही सहमत करून घ्याल. मित्रांची मदत मिळेल.


  निगेटिव्ह - कामधंदा आणि वयक्तिक गोष्टींमध्ये तुम्ही आक्रमक होऊ शकता. कोणाचाही अपमान करू नये. स्वतःवर नियंत्रण ठेवावे. धावपळ होऊ शकते.


  काय करावे - टोमॅटो दान करावेत.


  लव्ह- पार्टनरकडून आज तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. तुमचे संबंध मधुर राहतील.


  करिअर - बिझनेसमध्ये स्पर्धेपासून दूर राहावे. व्यवहार गुप्त ठेवा. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.


  हेल्थ - गळ्याचे आजार त्रास देऊ शकतात. पोट खराब होऊ शकते. सावध राहावे.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - कमामध्ये मन लावण्याचे पुर्ण प्रयत्न कराल. अशापस्थितीसाठी तुम्हाला तयार राहावे लागेल. संधी मिळाली तर थोडे वेळ एकटे राहा. घर- कुंटुंबातील काही वस्तूंची खरेदी होऊ शकते. प्रवास करण्याचा योगही बनू शकतो. दुर राहणाऱ्या लोकांशी तुमचा संवाद होऊ शकतो. 
   

  निगेटिव्ह- पळापळीचा दिवस असेल. जवळ- जवळ सर्व कामांमध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. तुम्हाला नशीबाची साथ काही प्रमाणातच मिळेल. काही लोकांवर व्यर्थ रागही काढू शकतात. तुमचा खर्च वाढू शकतो. अतीप्रमाणात काही खरेदी कराल किंवा न पाहता- समजता काही खरेदी करुन स्वत:चे नुकसान करुन घेऊ शकतात. सावधान राहा! तुमचा खर्च वाढू शकतो.


  काय करावे - चेहऱ्यावर गुलाबाचे पाणी लावा.


  लव्ह - लाइफ पार्टनरचे वागने तुम्हाला परेशान करु शकते. हळू-हळू सर्व ठिक होईल. लग्न झालेल्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल.


  करिअर - बिझनेसबाबत काही टेंशन होऊ शकते. सोबत काम करणाऱ्या व्यक्तींपासुन परेशान होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल. 

   

  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत सावधान राहावे लागेल. हवामानानुसार आजारी पडू शकतात.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  सिंह राशी, 7 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आपल्याकडे पैश्यांची स्थिती सामान्य राहील. एखाद्याला नाराज न करताही आपण बोलू शकता. थोडेसे धाडस दाखवणे किंवा धोका पत्करण्यात संकोच बाळगू नका. मन लावून धैर्याने काम केल्यास समस्या सुटत राहील. कुठल्याही बाबतीत तडजोड करण्यासाठी तयार राहा. आपले नवीन मित्र बनतील. एखाद्या प्रिय मित्र, प्रेम किंवा जोडीदाराला अधिक वेळ द्याल. थट्टा-मस्करीत दिवस जाईल. यातून आपला अडकलेला पैसा मिळू शकतो. 

   
  निगेटिव्ह - वाद सुरू होण्यापूर्वीच दूर व्हा. बोलणे किंवा आपले विचार मांडण्यासाठी अडथळा जाणवेल. व्यर्थ खर्च होऊ शकतो. वेळ जसा जात आहे तसाच जाऊ द्या. कुठल्याही भानगडीत पडू नका. आज कदाचित पळा-पळ होऊ शकते. प्रवासाचा योग जुळत आहे. अनेक कामे एकाचवेळी येऊ शकतात. त्यामुळे, आपण काहीसे त्रस्त राहाल. 


  काय करावे - तीळ दान करा.


  लव्ह - दिवस चांगला राहील. कुटुंबात आपले महत्व वाढेल. पार्टनरने सांगितलेल्या गोष्टी गांभीर्याने घ्या. अन्यथा वाद होऊ शकतात.


  करिअर - बिझनेसमध्ये त्रास वाढेल. पैश्यांमध्ये गुंतागुंत होण्याचे योग आहेत. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाहीत. विद्यार्थ्यांनी सावध राहावे. अती आत्मविश्वासामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, सतर्क राहा.


  हेल्थ - आपले आरोग्य चांगले राहील. मानसिक शांती लाभण्याची शक्यता आहे.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - चंद्रमा गोचर कुंडलीच्या लाभस्थानी असेल. तुमची विचार करण्याची पद्धत आकर्षक असेल आणि कामाची त्याहून चांगली. मालमत्तेची खरेदी विक्री होण्याची शक्यता अधिक आहे. पैशांच्या वसुलीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कामकाज चांगले चालेल. जुने वाद संपू शकतात. जे काम आज व्हायला हवे ते यशस्वीपणे पूर्ण कराल. समोर येणाऱ्या प्रत्येक स्थितीचा चांगला अंदाज येईल. तुमच्या यशावर सर्वांना गर्व असेल. एखाद्या नात्यात दुरावाही येऊ शकतो. इतरांच्या मदतीसाठी थोडा त्याग करायला तयार राहा. एचानक काहीतरी चांली बातमी मिळू शकते. फायदा होईल. लोक तुमचे कौतुक करतील, त्याचा तुम्हाला फायदाही होईल. 


  निगेटिव्ह - शारीरिकदृष्ट्या थकवा किंवा सुस्ती आल्याचे जाणवेल. तुम्हाला तुमच्या चुकांवर पश्चात्तापही होऊ शकतो. तुम्हाला काही कामांत लोकांचे सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे त्रास होईल. 


  काय करावे - एखाद्या गरीबाला जुने कपडे दान करा. 


  लव्ह - दिवस चांगला राहील. पार्टनरबरोबर वेळ जाईल. 


  करिअर - अनोळखींवर विश्वास ठेवू नका. आर्थिक स्थितीमुळे मनोधैर्य वाढेल. जॉब आणि बिजनेसमध्ये ठरलेली कामे पूर्ण होतील. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना काहीशी मेहनत करावी लागेल. 


  आरोग्य - मानसिक तणावही राहील. भूक न लागल्याने त्रस्त राहाल. 

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, तूळ राशिफळ (Aajche Tula Rashi Bhavishya): तूळ राशीच्या लोकांनी आज कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या संशयी स्वभावाला दूर ठेवावे. यासोबतच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची आवश्यकता आहे. तुमच्या स्वभावाची खास गोष्ट संतुलित राहणे ही आहे. यामुळे आज तुमचे खास काम पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही कोणते काम चांगल्याप्रकारे पूर्ण करू शकाल आणि कोणत्या कामामध्ये सांभाळून राहावे. वाचा, सविस्तर.

  पॉझिटिव्ह - तुमच्यात मानसिक ऊर्जा भरपूर असेल. त्यातून नव्या गोष्टी शिकायला मिळतील. तुमची माहिती वाढवण्यातही मदत मिळेल. कोणत्याही परिस्थितीसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहाल. तुम्हाला आनंदी होण्याच्या संधी मिळतील. जुन्या मित्रांशी भेट होईल. मित्रांबरोबर भविष्यातील योजना आणि गुंतवणुकीबाबत सल्ला घेऊ शकता. थोडी-थोडी गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. 


  निगेटिव्ह - मनात असणारे प्रत्येकाला सांगू नका. काहीसा थकवा जाणवू शकतो. विनाकारणचा खर्च करू नका. शत्रू तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. 


  काय करावे - हळद घातलेले दूध प्या. 
   

  लव्ह - लव पार्टनरशी किरकोळ वाद होऊ शकतो. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 


  करिअर -  विचार करून निर्णय घेतल्यास फायदा होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीप्रमाणे फळ मिळेल. कार्यक्षेत्र आणि  बिझनेसमध्ये सहकार्य मिळेल. फायदाही होऊ शकतो. पैसे आणि करिअरच्या क्षेत्रात चांगली बातमी मिळू शकते. 


  आरोग्य - तब्येत काहीशी खराब असू शकते. मसाल्याचे जेवण घेणे टाळा. 

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  7 Sep 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांना वेळेचे फार महत्त्व असते. यामुळे तुमची इतरांसोबत फार कमी वेळ व्यतीत करता. तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाच होतो परंतु काही गोष्टींमध्ये यामुळे नुकसानही होऊ शकते. आज ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, तुमचा दिवस कसा राहील आणि कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर.

  पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीतील भाग्य स्थानात आहे. यामुळे तुमचे काम पुर्ण होऊ शकतात. तुम्ही जवळपास सर्वच प्रयत्नात यशस्वी होऊ शकता. तुमची ताकद आणि योग्यता पाहून लोक प्रभावित होतील. कुटूंबासोबत कुठे बाहेर जाण्याचा प्लान बनवू शकता. तुमच्या कामाची स्तुती होईल. इनकम वाढू शकते. आपत्याकडे लक्ष द्यावे लागेल. अभ्यासात मन लागेल.


  निगेटिव्ह - जास्त भोजन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडू शकतो. तुमच्या मनातील गोष्टी सांगण्यात तुम्हाला अडचण वाटू शकते. तुमचे लक्ष ध्येयावरुन भरकटू शकते. प्रवासाचे योग जुळत आहेत. परंतू यामध्येही अडचणी येतील. आरोग्याकडे लक्ष द्या. 


  काय करावे - गायीला गुळ खाऊ घाला. 


  लव्ह - लव्ह पार्टनरवर जास्त खर्च होऊ शकतो.


  करिअर - कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये मोठ्या बदलाची शक्यता आहे. करिअरसंबंधीत चिंता आज संपू शकते. ऑफिसमध्ये मिळालेले काम मित्रांना सांगा. आज तुम्ही तणाव घेणे टाळा. पद आणि मान-सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनतीनंतरच यश मिळेल. 


  हेल्थ - अॅलर्जी किंवा अंगदुखीमुळे अडचणी येतील. सांभाळून राहा. 

   
 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  आजचे धनु राशिफळ (7 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - आज तुमच्या दृष्टिकोनात बदल येऊ शकतो. तुमच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक वातावरणाशी ताळमेळ साधण्यात मदत मिळेल. मनात नवे विचार येतील, नव्या आव्हानांसाठी तयार राहाल. जे तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे ठरतील, अशा लोकांपासून, विचारांपासून दूर राहा.
   

  निगेटिव्ह - कोणताही निर्णय घेताना दबाव किंवा तणाव जाणवेल. आज घेतलेल्या निर्णयांबद्दल सतर्क राहावे लागेल. शेअर बाजार वा जमीन संबंधित प्रकरणात गुंतवणूक केली असेल, तर यावरून तुमच्या परिस्थितीत बदल होऊ शकतो. आज तुम्ही कोणत्याही प्रकारचे नवे कर्ज घेणे टाळा. पैशांचा व्यवहार जपूनच करा. मेहनत जास्त राहील.


  काय करावे - मातीच्या भांड्यातील पाण्याने चेहरा धुवा.


  लव्ह - प्रपोजल पाठवण्यासाठी चांगला दिवस. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल. लव्ह लाइफ उत्तम राहील.


  करिअर - नोकरदारांना नव्या ऑफर मिळतील, परंतु त्यात जोखीमही राहील. बिझनेसमध्ये जोखमीचे सौदे चुकूनही करू नका. काहीही नवे काम करू नका. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागू शकते.


  हेल्थ - जुने रोगही समाप्त होतील. आरोग्य आधीपेक्षा चांगलेच राहील.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  आजचे मकर राशिफळ (7 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीचे लोक आज दीर्घकाळ लाभ करून देणाऱ्या कामाचा विचार आणि त्यानुसार प्लॅनिंग करतील. आज या राशीच्या नोकरदार लोकांनी घाईगडबड करू नये. विचारपूर्वक धैर्याने पुढे गेल्यास फायदा होऊ शकतो. तुमच्या राशीसाठी ग्रह-स्थिती कशी राहील, नोकरी आणि बिझनेसमध्ये काय घडणार, कशी राहील लव्ह-लाइफ आणि हेल्थ, दिव्य मराठीच्या या पेजवर जाणून घ्या.

  पॉझिटिव्ह - भविष्यासाठी मोठ्या योजना बनवा. एखादे असे काम करू शकता ज्यामुळे पुढेचालून चांगला फायदा होऊ शकतो. प्रेम, सम्मान आणि सुरक्षेत वृद्धी होईल. खाजगी संबंध मजबूत होऊ शकतात. आज घेतलेले अनेक निर्णय येत्या काही दिवसात अतिशय चांगले परिणाम देणारे ठरतील. कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्याआधी स्वत: येत्या काळात कराव्या लागणाऱ्या मेहनतीसाठी तयार ठेवा.


  निगेटिव्ह - मानसिक तनाव जाणवेल. काही लोकांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो. प्रेमात खर्च वाढू शकतो. पैशांशी संबंधीत व्यवहारात नुकसान देखील होऊ शकते. आज कोणतेही महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.


  काय करावे - एखाद्या झाडाखाली एखादी भाकर ठेवा.
   

  लव्ह - कामात व्यस्त रहाल, पार्टनरची समजूत काढण्यासाठी खर्च करावा लागेल.


  करिअर - बिजनेस वाढवण्यासाठी आज सावधतेने निर्णय घ्या. तुमच्यासाठी दिवस फारसा चांगला नाही. विद्यार्थ्यांना अधिकची मेहनत करावी लागेल. आभ्यासासाठी दिवस फारसा चांगला नाही. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांना अधिकारी गांभिर्याने घेणार नाहीत. जॉब आणि व्यावसायात काही बाबी तुम्हाला चिंतेत टाकू शकतात.


  हेल्थ - तब्येत उत्तम राहील. मानसिक शांति मिळेल. जुन्या रोगांमध्ये आराम मिळेल.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  आजचे कुंभ राशिफळ (7 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.

  पॉझिटिव्ह - जे ही काम असेल ते एका- दुसऱ्याच्या मदतीने पुर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुढे चालून केलेल्या कामाचा मोठा फायदा देईल. समजदारीने काम करावे लागेल. मित्र तुमच्यासाठी चांगली मदतही करेल. मित्रांसोबत बोलल्यानंतर काही चांगले विचारही समोर येऊ शकतात. तुमचे भले होईल असे म्हणणारा तुम्हाला अचानक काही गीफ्टही देऊ शकतो. काम पुर्ण होऊ शकते. एखाद्या कामाची जीद्दच तुम्हाला यश मिळवून देईल.

   

  निगेटिव्ह - आज तुम्ही एखाद्या वादातही अडकू शकता. कामकाजही अधिक असेल. काही लोक कोणत्या ना कोणत्या कामानिम्मीत्त तुमच्या कामामध्ये अडथळे आणू शकतता. कोणासोबत व्यर्थ गोष्टीमध्ये अडकू नका. मित्र आणि प्रेमींबरोबरही उतार-चढ़ाव येऊ शकतात. तुमचे लक्ष विचलीत होऊल आणि वेळही खर्च होईल. एखाद्या महत्वपूर्ण संबंधामध्ये भांडणाचीही शक्यता आहे. शत्रुपासून सावध राहावे लागेल. मुलालाही तब्येतीबाबत परेशानी होऊ शकते. 


  काय करावे - काहीही खाल्यावर पाणी जरूर प्या.


  लव्ह - पार्टनर भावुक असेल. पत्नी आणि मुलांसोबत वेळ घालाल.


  करिअर - बिझनेसमध्ये विचार करुन निर्णय घ्या. ऑफिसमध्ये वाद होण्याचे योग आहे. बोलण्यावर संयम ठेवा. विद्यार्थी परेशान असेल. कॉमर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक थकाव आणि परेशानी होऊ शकते. 


  हेल्थ - दिवसभर पळा-पळीने थकवा जाणवू शकतो.

 • आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 7 Sep 2018
  मीन राशी, 7 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

  पॉझिटिव्ह - दिवसभर व्‍यस्‍त राहाल. मात्र यामुळे तुमची प्रगती होईल. दिवसभर डोक्‍यात अनेक विचार येतील. विद्वानांसोबत दीर्घ चर्चा होईल. भावनात्‍मक प्रगती तुमच्‍या मानसिक संतुलनासाठी लाभदायी ठरेल. काही चांगल्‍या संधी मिळतील. मात्र त्‍यांचा फायदा उठवताना सावधानता बाळगा. काही गोष्‍टी तुमच्‍यासाठी लाभदायी ठरतील. आज विशेष कामांवरच लक्ष द्या. ज्‍या गोष्‍टी तुमच्‍यासाठी अडथळे ठरतील त्‍यांच्‍याकडे दुर्लक्ष करा. धैर्य ठेवा. आवडीच्‍या गोष्‍टी करण्‍याची इच्‍छा होईल. 


  निगेटिव्ह - इतरांच्‍या मदतीसाठी तुम्‍हाला खूप प्रयत्‍न आणि त्‍याग करावा लागेल. काही प्रकरणांच्‍या बाबतीत तुम्‍ही साशंक राहाल.  भावनात्‍मकदृष्‍ट्या कमकुवत राहाल. खाण्‍यापिण्‍यात संयम ठेवा. अनेक दिवसांपासून रेंगाळलेली कामे आजही पुर्ण होण्‍याची शक्‍यता नाही. 


  काय करावे - पुर्व दिशेला तोंड करून 'ऊँ सूर्याय नम:' हा मंत्र म्‍हणा. 


  लव्‍ह - लव्‍ह लाईफची सुरूवात चांगल्‍या पद्धतीने होईल. प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठीही चांगला दिवस आहे. 


  करिअर - व्‍यवसाय फायदेशीर राहिल. विद्यार्थ्‍यांना यशासाठी खूप प्रयत्‍न करावे लागतील. त्‍यांना यात यशही मिळेल. 

Trending