Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 08, 2018, 12:01 AM IST

Today Horoscope in Hindi (8 Sep 2018): 12 राशीचे राशीफळ एकत्र वाचा दिव्य मराठीच्या या पेजवर

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  Today Horoscope (आजचे राशिभविष्य, 8 Sep 2018): आजची कुंडली काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी ठीक नाही. कुंडलीतील काही अशुभ ग्रहांमुळे नोकरी करणाऱ्या काही लोकांना धावपळ करावी लागू शकते. यासोबतच व्यर्थ खर्च आणि तणावही वाढू शकतो. याउलट आजच्या कुंडलीतील शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे काही लोकांना अचानक पुढे जाण्याची संधी मिळू शकते. नोकरी आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. यासोबतच लव्ह लाइफ, आरोग्य आणि कुटुंबाबामध्ये काही चांगले घडू शकते. जाणून घ्या, कशाप्रकारे व्यतीत होईल आजचा तुमचा दिवस.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (8 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya): मेष राशीचे लोक अनेकवेळा इतरांचा सल्ला ऐकत नाहीत आणि जो विचार केला आहे तेच करण्यास उत्सुक राहाल. यामुळे आज तुम्ही अडचणीत सापडू शकता, सावध राहण्याची आवश्यकता आहे. आज तुमच्या जीवनात काय चांगले घडू शकते आणि लव्ह लाइफ, हेल्थ, करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर
   

  पॉझिटिव्ह - घरातील परिस्थितीमध्ये सुधार होऊ शकतो. पती-पत्नीच्या संबंधामध्ये गोडवा राहील. कामधंदा आणि नोकरीत उत्तम स्थानावर पोहोचाल. कामावर जास्त फोकस करू शकाल. मेहनतही जास्त राहील. कार्यक्षेत्रामध्ये महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. जेवढे धैर्य बाळगाल तुमच्यासाठी तेवढेच चांगले राहील. एखादी गुप्त गोष्ट समजू शकते. दैनंदिन कामामध्ये फायदा होऊ शकतो. भागीदारीमध्ये जास्त लाभ होण्याचे योग आहेत.


  निगेटिव्ह - काम आणि जबाबदारी वाढेल. ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नये. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे वागणे तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. कोणावरही गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवू नये. जेवढे जास्त बोलाल तेवढे जास्त अडचणींमध्ये गुंतून पडाल.


  काय करू नये - वारंवार थुंकू नये. 


  लव्ह - पार्टनरला तुमच्या मनातील गोष्ट न सांगता समजेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील.


  करिअर - बिझनेसमध्ये चांगला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी सुखद वातावरण राहील. स्पर्धेमध्ये यश मिळण्याचे योग आहेत. मेहनत जास्त कराल आणि यशही प्राप्त होईल.


  हेल्थ - ऍसिडिटी आणि पोटाचा त्रास होऊ शकतो. जेवण कमी करावे.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  8 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या चौथ्या स्थानात राहील. एखादी महत्त्वाची व्यक्ती तुमचे वैशिष्ट्य हेरणार आहे. तुम्हाला मदत मिळत राहील. आईशी प्रेम वाढेल. सहकार्यही मिळेल. आईच्या प्रभावाने एखादे मोठे काम तुमच्या बाजूने होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही पुढे जाल. काही जण तुमच्यामुळे प्रभावित होतील. पैशांच्या बाबतीत विचार केल्यास तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. मौजमजा करण्याकडे कल राहील. तुमच्या मनाची आणि फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी जराही संकोच करू नका. जीवनसाथीचा सल्ला तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हालाही फायदा होऊ शकतो.


  निगेटिव्ह - घरात जाताना आपल्या ऑफिसचे प्रॉब्लेम सोबत आणू नका. फालतू खर्च होण्याचेही योग आहेत. सावधान राहा. तुम्हाला खूप कठीण कामे करावी लागू शकतात. तुमच्या अडचणीही संपतील. एखादा प्रेम-प्रसंग असेल, तर परिस्थिती तुमच्यावर उलटणार आहे. यातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. एखादा शारीरिक त्रासही होऊ शकतो. नोकरी वा व्यवसायासंबंधित एखादी बाब तुम्हाला सतत परेशान करत राहील.


  काय करावे - तंबाखू वा पानमसाला खाऊ नका.
   

  लव्ह - जोडीदारा रागात असेल तर विनम्रतेने सामोरे जा. लव्ह लाइफमध्ये चढ-उतार होतील.


  करिअर -  बिझनेससंबंधित कायदेशीर प्रकरणांचा निपटारा होण्याचे योग नाहीत, परंतु थोडासा दिलासा जरूर मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. 


  हेल्थ - आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास एखादा मोठा रोग उद्भवू शकतो.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  मिथुन राशिफळ, 8 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - जुन्या अडचणी समाप्त होतील. मित्राच्या वादामध्ये तुम्हाला पडावे लागेल. तुम्ही एखादे मोठे काम आज पूर्ण कराल. मोठा फायदाही होऊ शकतो. ठरवलेल्या गोष्टी वेळेवर पूर्ण होतील. नवीन नोकरी किंवा प्रमोशनसाठी चांगली ऑफर मिळू शकते. अडचणींमध्ये जवळच्या लोकांचे सहकार्य मिळेल. चंद्र गोचर कुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये असल्यामुळे मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कोर्ट प्रकरणात यश प्राप्त होऊ शकते.


  निगेटिव्ह - जवळच्याच लोकांच्या वागणुकीमुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या गोष्टी मागील काही काळापासून त्रासदायक वाटत होत्या त्यामधील काही गोष्टी नियंत्रणाच्या बाहेर जाऊ शकतात. यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. थोडे सांभाळून राहावे. कोणासोबतही विचार न करता मनातील गोष्ट शेअर करू नये.


  काय करावे - लाइफ पार्टनर किंवा लव्हरला पान खाऊ घालावे.


  लव्ह - आज विचारपूर्वक बोलावे.


  करियर - कामाच्या व्यापामुळे तणावात राहाल. स्थावर मालमत्तेशी संबंधित समस्या नष्ट होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. यश प्राप्त होईल.


  हेल्थ - आरोग्यही चांगले राहील. थकवा दूर होईल.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  8 Sep 2018, कर्क राशिफळ (Aajche Kark Rashi Bhavishya): कर्क राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे आणि चंद्राच्या कलांनुसार या लोकांचा मूड बदलत राहतो. यामुळे आज तुम्ही सावध राहावे. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला मिळू शकते यश आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - आपल्या मतांवर ठाम राहा. परिस्थिती तुमच्या बाजुने आहे. जी कामे मनात आहेत, ती वेळेत पूर्ण होतील. त्यातून तुम्हाला फायदादेखील होईल. तुमचे आकर्षण वाढेल. आव्हानात्मक गोष्टी आल्यास व्यावहारिक राहा. अपत्य आणि शिक्षणाशी निगडीत कामे पूर्ण होतील. काही जुनी प्रकरणे समोर येतील. धन लाभाचे योग आहेत.


  निगेटिव्ह - ऑफिस किंवा फिल्डवर आव्हान मिळू शकते. तुमच्या बोलण्या किंवा विचारांना विरोध होऊ शकतो. काही प्रकरणात तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाहीत. मानसिक चढउतार येतील. काय करावे आणि काय करु नये, अशी परिस्थिती निर्माण होईल. विचारपूर्वक बोला. 

  काय करु नये - धूम्रपान करु नका. 


  लव- जोडीदाराकडून पाठिंबा आणि पैसा मिळण्याचे योग आहेत. तुमच्यासाठी दिवस उत्तम आहे. 


  करिअर - नवीन योजनांवरील कामे टाळू नका. आर्थिक फायद्याचे योग आहेत. कर्क राशीच्या काही विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे, तर काहींसाठी चढउतारांचा दिवस आहे. 


  हेल्थ - एखादा जुना आजार डोके वर काढू शकतो.  जुन्या आजारांपासून सावध राहा. 

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  सिंह राशी, 8 Sep 2018, Aajche Singh Rashi Bhavishya: सिंह राशीचे लोक आज काम करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत पंरतु तुमच्या कामाचे कौतुक झाल्यास तुमची आणखी चांगले प्रदर्शन करू शकाल. आज तुमच्या राशीमध्ये बुध, शुक्र आणि शनीची कशी आहे स्थिती, धनलाभचा योग आहे की नाही. वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - उत्साहाने तुमचे काम पूर्ण होतील. चंद्राची स्थिती तुमच्या राशीसाठी चांगली राहील. यश प्राप्त होऊ शकते. लोकांचे मन आणि मूड पाहून काम केल्यास यशस्वी होऊ शकता. तुम्ही एखाद्या नवीन किंवा अनोळखी व्यक्तीची मदत करू शकता. मित्र आणि नातेवाईकांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. रुटीनमध्ये थोडासा बदल करू शकता. एक-एक पाऊल पुढे टाकत राहिल्यास यश प्राप्त होऊ शकते. सकारात्मक फळ प्राप्त होईल.


  निगेटिव्ह - नवीन आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कामामध्ये मन लागणार नाही. आज काही गोष्टींमध्ये जास्तच उतावळे व्हाल. काही कामामध्ये स्वतःलाच असुंतष्ट वाटेल. एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.


  काय करावे - उत्तर दिशेकडे मुख करून कुलदेवतेला नमस्कार करावा.


  लव्ह - पार्टनरला वेळ द्यावा. त्याच्या भावनांचा सन्मान करावा.


  करिअर - बिझनेस ठीक चालेल. अडकलेला पैसा मिळेल. आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य राहील. नवीन जोडीदार बनतील.


  हेल्थ - आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटदुखी होऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  8 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - कन्या राशींच्या स्वामींसाठी काळा चांगला आहे. तुम्हाला स्वतःचे गुण दाखवता येतील. एखादी मोठी समस्या सोजवण्याची जबाबदारी मिळू शकते. वाद आणि गुंतागुंतीच्या स्थितीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जीवनात पुढे जाण्याच्या संधीही मिळू शकतात. लहान सहान अडचणींचा सामना करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्यासाठी दिवस चांगला असेल. 


  निगेटिव्ह - धावपळ आणि लहान लहान प्रवासांचा योग आहे. गोचर कुंडलीच्या बाराव्या स्थानी चंद्र असल्याने अडचण निर्माण होऊ शकते. विनाकारणचे खर्चही वाढू शकतात. कामकाज अधिक असेल. थकवा जाणवेल. काही महत्त्वाचे कामही प्रलंबित राहू शकते. दिवसभर व्यस्त असाल. एखादे काम पूर्ण करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक परिश्रम कराल. आजुबाजुच्या काही लोकांच्या वर्तनामुळे उदास होऊ शकता. खर्च वाढू शकतो. प्रवासाचेही योग आहेत. वाईट बातमीची शक्यता असल्याने मूड खराबही होऊ शकतो. 


  काय करावे - घर किंवा ऑफिसच्या टेबलची स्वच्छता करून घ्या. 


  लव्ह - लव्ह पार्टनरबरोबर वेळ घालवता येईल. सहकार्य आणि प्रेम मिळेल. 


  करिअर - व्यवसायाशी संबंधित कामात बेजबाबदारपणा दाखवू नका. तुमची आर्थिक स्थितीही चांगली राहील. कमी मेहनतीमध्येही चांगले फळ आज मिळू शकेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. 


  हेल्थ - पोटाच्या खालच्या भागांमध्ये समज्या जाणवू शकते. सावध राहा

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  तूळ राशी, 8 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - दिवसाच्या सरुवातीला मोठ्या फायद्याची संधी मिळेल. मोठ्या गरजेला कोणीतरी मदतीला धावून येईल. पैशासंदर्भात मोठे निर्णय सल्ला घेऊनच घ्या. एखादी व्यक्ती तुमच्या करिअरच्या समस्येवर तोडगा काढू शकते. कामामध्ये मन रमेल. काम करायची इच्छा असेल तर परिस्थिती तुमच्या बाजुने असेल. धैर्य ठेवा आणि वेळ जाऊ द्या. रोजच्या समस्या सहजपणे सोडवता येतील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. आर्थिक आणि काटुंबीक बाबींवर पूर्ण लक्ष्य केंद्रीत असेल. इंटरव्ह्यू असेल तर मोजकी उत्तरे द्या. 
   

  निगेटिव्ह - करिअरमझ्ये चढ उतार येऊ शकतात. पैशांशी संबंधित प्रकरणात मोठा निर्णय करू शकणार नाहीत. कुटुंबातील व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. जास्त तणाव आणि थकवा करून घेऊ नका. समस्या संपण्यास वेळ लागेल. 


  काय करावे - भैरव मंदिरात तेल दान करा. 


  लव्ह - पार्टनरशी संबंध चांगले होऊ शकतात. स्वतःच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे पुन्हा नात्यात दुरावा येऊ शकतो. 


  करिअर - बिझनेसमध्ये यश मिळू शकते आणि तुमचे उत्पन्न वाढू शकते. आळस आणि थकव्यामुळे विद्यार्थी त्रस्त होऊ शकतात. 


  हेल्थ - आरोग्यात महत्त्वाच्या सुधारणा होऊ शकतात. 

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  8 Sep 2018, वृश्चिक राशिफळ (Aajche Vrishchik Rashi Bhavishya): वृश्चिक राशीच्या लोकांना वेळेचे फार महत्त्व असते. यामुळे तुमची इतरांसोबत फार कमी वेळ व्यतीत करता. तुमच्या या स्वभावाचा तुम्हाला फायदाच होतो परंतु काही गोष्टींमध्ये यामुळे नुकसानही होऊ शकते. आज ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, तुमचा दिवस कसा राहील आणि कोणत्या गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. वाचा, सविस्तर.
   

  पॉझिटिव्ह - तुम्ही धैर्य आणि संयम ठेवा. धावपळ वाढू शकते. त्याचे पुर्ण सकारात्मक फळ तुम्हाला मिळू शकते. पैशांचे एखादे काम बिघडलेले असेल तर ते ठिक होईल. एखाद्या मोठ्या कामासाठी पैशांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न कराल तर तुमचे काम होऊ शकते. लोनसंबंधीत काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. नियोजित काम वेळेवर पुर्ण होतील. बिझनेस, प्रेम आणि कुटूंबाविषयी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती होतील. तुमच्या यशाचा स्तर इतर लोकांच्या तुलनेत जास्त असू शकतो. इनकम आणि फायद्याची स्थिती येऊ शकते. भावा-बहिणींचा सपोर्ट मिळत राहिल. 


  निगेटिव्ह - एखादे कर्ज फेडण्यात तुम्ही व्यस्त राहाल आणि टेंशनमध्ये येऊ शकता. काम जास्त राहिल. धावपळ होऊ शकते. तुमचे काही आवश्यक कामं अपुर्ण राहू शकता. धन लाभ सहजासहजी होऊ शकणार नाही. तुम्ही पैशांसाठी किंवा फायदा व्हावा यासाठी अवैध काम करु शकता. 


  काय करावे - दिवसातून 2 वेळा स्वच्छ पाण्याने पाय धुवा.


  लव्ह - पार्टनरसोबत वाद-विवाद होऊ शकतो. मानसिक तणाव वाढण्याचे योग आहेत.


  करिअर - आर्थिक तंगीपासून सुटका मिळू शकते. ऑफिसमध्ये अधिका-यांपासून सहकार्य मिळेल. विद्यांर्थ्यांसाठी दिवस चांगला राहिल. बिझनेस फिल्डमधील विद्यार्थ्यांना मेहतनीने जास्त फळ मिळेल. 


  हेल्थ - आरोग्य चांगले राहिल, परंतू कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे टेंशनमध्ये राहाल. भोजन आणि झोपेच्या बाबतीत सुख मिळेल. 

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  आजचे धनु राशिफळ (8 Sep 2018, Aajche Dhanu Rashi Bhavishya): धनु राशीचे लोक आज आपल्या बुद्धी आणि हसमुख स्वभावामुळे जवळपासचे वातावरण हलके-फुलके ठेवण्याचा प्रयत्न करतील. काही गोष्टींमध्ये आज तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते तर काही गोष्टींमध्ये सांभाळून राहण्याची आवश्यक्ता आहे. सूर्य-चंद्राची तुमच्या राशीमध्ये कशी आहे स्थिती, वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
   

  पॉझिटिव्ह - आज तुम्ही जसे आहात, तसेच राहा. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी डोक्यात घोळत राहील. काहीतरी करून दाखवण्याची इच्छा प्रबळ होईल. महत्त्वाकांक्षा वाढून काही नव्या संधी प्राप्त होणार आहेत. एक्स्ट्रा इन्कमसाठी एखादे नवे माध्यम सुरू होऊ शकते. घरातून एखादे काम सुरू करू शकता. एखादे पार्टटाइम कामही मिळू शकते. तुम्ही असे काही करण्याचा प्रयत्न कराल, ज्याने दिनचर्या बदलून जाईल. एखाद्या अडचणीतील व्यक्तीची मदत कराल. एखाद्या धार्मिक कार्यातही तुम्ही पैसा लावाल.


  निगेटिव्ह - एखाद्याची नक्कल करणे अंगलट येईल. वाहन सावधगिरीने चालवा. दुखापत होण्याची शक्यता. विनाकारण एखाद्यावर राग काढाल. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चुकीचा प्रभाव पडेल. एखाद्याचा राग दुसऱ्यावर काढल्याने तुमचेच नुकसान होणार आहे.


  काय करावे - मंदिरात माचिस दान करा.
   

  लव्ह - मनोबल वाढल्याने तणाव कमी होऊ शकतो. प्रेमसंबंध मजबूत होतील.


  करिअर - घाईगडबडीत कोणतेही काम करू नका. आपल्या व्यवहारातही संतुलन ठेवा. बिझनेस चांगला चालेल. विद्यार्थ्यांना मेहनतीनेच यश मिळेल. शारीरिक त्रास होऊ शकतो.


  हेल्थ - आरोग्यावरून सावध राहा. पोटाशी संबंधित रोग तुम्हाला त्रास देतील.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  मकर राशी, 8 Sep 2018 (Aajche Makar Rashi Bhavishya): मकर राशीच्या लोकांच्या डोक्यात आणि विचारात आज काही खास काम करण्याच्या गोष्टी चालतील. आज तुम्ही घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्यापासून दूर राहावे. यासोबतच तुमच्या संशयी स्वभावावरही आज नियंत्रण ठेवावे. याचा फायदाच तुम्हाला होईल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, आजची ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे की नाही आणि तुमच्या नोकरी, बिझनेसवर ग्रह-ताऱ्यांचा कसा राहील प्रभाव.

   

  पॉझिटिव्ह - रुटीन लाइफमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हला चांगले वाटेल. जूने मित्र आणि नातेवाईकांसोबत गप्पा होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांना भेटू देखील शकता. तुमच्या आसपासचे काही लोक तणावातून बाहेर येणासाठी तुमची मदत करू शकतात. थोडा संयम ठेवा. तुमच्यासाठी चांगले राहील. आज यात्रेची योजना देखील बनू शकते.
   

  निगेटिव्ह - मोठा खर्च करण्यापूर्वी विचार करून निर्णय घ्या. काम पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. कामातील अडचणी वाढू शकतात. तुमच्या रुटीन लाईफवर परिणाम होऊ शकतो. स्वत:ला शांत ठेऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे काम खराब होऊ शकते. विचार न करता बोल्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. तुमची एखादी चूक चिंता वाढवू शकते.


  काय करू नये - अपोझिट जेंडरच्या लोकांचे मन दुखवू नका.


  लव्ह  - लाईफ पार्टनर तुमची मदत करेल. कमात पार्टनरचे सहकार्य लाभेल. तुमचा मान सन्मान देखील वाढेल.


  करिअर - स्थायी संपत्ती विकत घेण्यात घाई करू नका. नव्या व्यावसायाची सुरूवात केली नाही तरच ठिक राहील.


  हेल्थ - मौसमी आजारांमुळे त्रस्त व्हाल. सुस्ती आणि थकावट जाणवेल.

   
 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  आजचे कुंभ राशिफळ (8 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशीमुळे संकोच करणेही तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही तुमच्या या सवयीपासून दूर राहावे. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये. संकोच केल्यामुळे नोकरी किंवा बिझनेसमध्ये आज कमी लाभ होऊ शकतो. याव्यतिरिक्त तुम्ही प्रामाणिकही आहात. यामुळे प्रामाणिकपणे आज केलेल्या कामाचा फायदा भविष्यात होईल. जाणून घ्या, आजची ग्रह-स्थिती तुमच्यासाठी कशी राहील. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, कसा राहील दिवस.

   

  पॉझिटिव्ह - रोजचे काम वेळेआधीच पुर्ण होईल. पार्टनरपासून सहयोग मिळू शकेल. कामासाठी एक सिमा निश्चीत करा आणि स्वत:वर नियंत्रण ठेवा. अनेक प्रकराणांमध्ये प्रगती होईल. पैशांबाबत कोणते पाऊल उचलण्यापुर्वी त्याची पडताळणी करुन घ्या. एखादा जुना मित्र तुमच्याशी बोलू शकतो. बोलण्याअगोदर ऐकण्यावर लक्ष केंद्रित करा. नशीबाची साथ मिळेल. तुमचे काम पुर्ण होईल. नोकरी आणि व्यवसाय अचानक वाढू शकतो. नवीन व्यवहार होऊ शकतात. जुणे कर्ज तुम्ही चुकवाल. प्रवासही घडू शकतो.


  निगेटिव्ह - तुम्ही अधिक जिद्दी होऊ शकतात. कोणासोबत एखादा मोठा वाद करु नका. ऑफिसमध्ये कोणासोबत असहमती किंवा चिडचिड होऊ शकते. विचार करू बोला. खोटे बोलण्याचा प्रयत्नही कराल तर तुमची परेशानी वाढू शकते.


  काय करावे - खोटो बालू नका.
   

  लव्ह - जोडीदारकडून सहयोग मिळू शकतो. प्रेमीकडूनही गिफ्ट मिळण्याचे योग आहे. 


  करिअर -  नवीन व्यवहार होईल. धनलाभही होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी वेळ सामान्य आहे.


  हेल्थ- जुने आजार कमी होऊ शकतात. तब्येतीसाठी दिवस चांगला असेल.

 • आजचे राशिभविष्य 8 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 8 Sep 2018
  मीन राशी, 8 Sep 2018 (Aajche Meen Rashi Bhavishya): मीन राशीचे असल्यामूळे तुम्ही काम कधीही टाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. तुमच्या या सवयीमुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग जुळून येत आहेत. यामुळे तुमचे कामही वाढू शकते. तुमच्या चांगल्या सवयी आणि स्वतभावामुळे काही लोक तुमच्यावर आज प्रभावित होतील. आज चंद्रासोबत इतर ग्रह स्थितीचाही तुमच्या राशीवर प्रभाव पडेल. दिव्य मराठीच्या राशीफळनुसार जाणून घ्या, नोकरी, बिझनेस, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस.

   

  पॉझिटिव्ह - मोठे निर्णय घेताना शांततेने विचार करा. याचा लाभ होईल. एखाद्या जवळच्‍या मित्राशी बोलल्‍यास बरे वाटेल. अस्‍वस्‍थतेपासून मुक्‍ती मिळवण्‍यासाठी येत्‍या दिवसांत काही बदल करावे लागतील. यामुळे फायदा होईल. तुमचे लक्ष नातेसंबंधावर राहिल. विचार केलेले कामे पुर्ण होतील. लोकांविषयी काही मनोरंजक गोष्‍टी कळतील. 


  निगेटिव्ह - स्‍वत:च्‍या सध्‍याच्‍या परिस्थितीविषयी मनात काहीशी बैचेनी राहिल. कामकाजासंबंधी काही अडचणी उद्भवू शकतात. अडचणींचा सामना करावा लागेल. जुन्‍या शुत्रूंशीही सामना करावा लागेल. मात्र आज तुमचे पारडे जड राहिल. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. वाहनांपासून सावध राहा. जखमही होऊ शकते. 


  काय करावे - सोबत काम करणा-यांना किंवा एखाद्या गरीबाला चहा पाजा. 


  लव्‍ह - पार्टनरच्‍या तब्‍येतीमुळे काहीसे तणावात राहाल. पार्टनरचा मूड तुमच्‍यासाठी अनुकूल असेल. 


  करिअर - व्‍यवसायात यश मिळू शकते. नोकरीमध्‍ये नवी जबाबदारी अंगावर येऊ शकते. विद्यार्थ्‍यांसाठी वेळ चांगला आहे. इतरांकडून मदत मिळेल. यश मिळण्‍याची शक्‍यता आहे.  


  हेल्‍थ - जुन्‍या आजारावर लक्ष असू द्या. गरजेपेक्षा अधिक अन्‍न सेवन करू नका.  

Trending