Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 10, 2018, 12:00 AM IST

सोमवार, 10 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा असून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  सोमवार, 10 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा असून या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. 12 राशींवर या योगाचा संमिश्र प्रभाव राहील. 7 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार असून बिझनेस, नोकरी व अभ्यासात यश मिळण्याची चिन्हे आहेत. उर्वरित 5 राशींसाठी संमिश्र फळ देणारा दिवस ठरेल.

  पुढच्या स्लाइडवर, प्रत्येक राशीनुसार पाहा, तुमच्यासाठी कसा राहील भाद्रपदाचा पहिला सोमवार...

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  मेष
  कामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार आहे. थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांची अभ्यासातील प्रगती आज तुम्हाला समाधान देईल. पैज जिंकाल.
  शुभ रंग : तांबडा, अंक,-५. 

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  वृषभ 
  बरीच क्लिष्ट कामे सुरळीत पार पडतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन प्रफुल्लीत होईल. म्हणेन ती पूर्व असा दिवस. प्रलोभने मात्र टाळायला हवीत.

  शुभ रंग: पिस्ता, अंक-८

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  मिथुन 
  परिवारातील सदस्य आज तुमच्या मताचा आदर करतील. एखाद्या कौटुंबिक समारंभात आज हजेरी लावाल. वाहन किंवा वास्तू खरेदीचे बेत आखाल.
  शुभ रंग : क्रिम, अंक-४.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  कर्क 
  वेळेचा सदुपयोग करुन बरीच रखडलेली कामे हातावेगळी कराल. मोठे उपक्रम राबवणे शक्य होईल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.
  शुभ रंग : चंदेरी, अंक-३.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  सिंह
  आर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस असून आज सर्व महत्वाची कामे मार्गी लावू शकाल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय हमखास चुकतील.
  शुभ रंग : भगवा, अंक-७. 

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  कन्या 
  कलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. तुमचा अधुनिक व आकर्षक  राहणीमानाकडे कल राहील. स्वत:चे म्हणणे इतरांच्या गळी उतरवता येईल. 
  शुभ रंग : आकाशी, अंक-१.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  तूळ
  आज तुम्ही सढळ हाताने काही दानधर्म कराल. अध्यात्मिक मार्गात असाल तर साधनेची प्रचिती येईल. आज दूरदृष्टीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
  शुभ रंग: नारिंगी, अंक,-२.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  वृश्चिक 
  नोकरी व्यवसायात केलेले कष्ट कारणी लगतील. काही अनपेक्षित लाभ मनास दिलासा देतील. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमणा करा. यशाची खात्री आहे.
  शुभ रंग : मरुन, अंक-६.  

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  धनू
  महत्वाच्या चर्चा, बैठकीत आज आपले विचार इतरांना पटवून देता येतील. अंगी असलेल्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. नोकरीत बढतीचा मार्ग मोकळा होईल.
  शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-९.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  मकर
  काही न आवडणारी कामे करावी लागतील. आज स्वावलंबनाचे महत्व कळेल. इतरांवर विसंबून राहून महत्वाची कामे फसतील. थाेरांचे ऐका.
  शुभ रंग : मोतिया, अंक-३.   

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  कुंभ
  कार्यक्षेत्रातात काही प्रमाणात तणाव असेल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. मतभेद व कलह यांपासून आवर्जुन लांब राहीलात तर बरे होईल.
  शुभ रंग : सोनेरी, अंक-६.

 • आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018

  मीन
  अपूर्व मनोबलाच्या जोरावर विरोधकांच्या विरोधाला न जुमानता पुढे जाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहीक जिवनात सामंजस्य असेल. आनंदी दिवस.
  शुभ रंग : गुलाबी, अंक-२. 

Trending