Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

रिलिजन डेस्क | Update - Sep 13, 2018, 12:01 AM IST

Aajche Rashi Bhavishya (13 Sep 2018): सर्व 12 राशींचे राशिभविष्य येथे वाचा

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  Today Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 13 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  आजचे मेष राशिफळ (13 Sep 2018, Aajche Mesh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - धनलाभ आणि जुन्या सौद्यांमधून फायदा होऊ शकतो. दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बिझनेसमध्ये दीर्घकाळ गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासू लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. जोडीदाराला वेळ द्यावा. पार्टनर तुमच्यासाठी पैसा आणि आरोग्य संदर्भात चर्चा करू शकतो. रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. रोमँटिक संबंध आणखी चांगले होतील. मित्रांच्या मदतीने एखादे काम लवकर पूर्ण होऊ शकते.


  निगेटिव्ह - तुम्हाला एखादी अनामिक भीती त्रास देऊ शकते. एखादी नवीन समस्या समोर उभी राहील. पैशांशी संबंधित काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. लोखंडामुळे जखम होऊ शकते. सावध राहावे. एखादा व्यक्ती धोका देण्याचा प्रयत्न करू शकतो. 


  काय करावे - सरकारी अधिकारी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला मिठाई खाऊ घालावी.


  लव्ह -  या राशीच्या लोकांना प्रेमासाठी हा काळ अनुकूल राहील. लग्नासाठी एखाद्याला विचारणा करायची असल्यास ग्रहस्थिती तुमच्यासाठी चांगली आहे.


  करिअर - बिझनेसमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही भावुक जास्त आणि व्यावहारिक कमी राहाल. कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नये. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. जखमही होऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  13 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आपल्या कामावर आणि व्यवसायावर लक्ष द्या. कामाची पद्धत बदलण्याचे विचार मनात येतील. काही दैनंदिन कामे आज पूर्ण होतील. कोणतेही काम परफेक्शनने करण्याचा प्रयत्न कराल. वेळे ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करा आणि कामात कुणालाच तक्रार करायला जागा ठेवू नका. नातेसंबंधांच्या दृष्टीने चांगला दिवस. नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न कराल. खासगी आणि विशेष संबंधांतील मतभेद थोड्याशा समजुतीनंतर मिटू शकतील. एखाद्याशी नवी मैत्री होईल. नवे प्रेमप्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे.


  निगेटिव्ह - तुमची धावपळ वाढू शकते. कामात तणाव आणि थकवा राहील. आजपासून पुढचे काही दिवस तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. महत्त्वाच्या कामांसाठी इच्छा नसूनही कर्ज घ्यावे लागेल. विनाकारण राग काढल्याने नुकसान होईल.


  काय करावे - हाताच्या छोट्या बोटावर चंदन लावा.
   

  लव्ह - दांपत्य जीवनात आनंद राहील. तुम्ही एखादे मोठे पाऊल उचलण्याआधी विचार केला पाहिजे. घाई करू नका. नुकसानही होऊ शकते.


  करिअर - बिझनेस आणि कार्यक्षेत्रात तोलूनमापून व्यवहार करा. बिझनेसमध्ये चढ-उतार येतील. मोठी गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत टाळावी. कमी मेहनतीतही यश मिळेल.


  हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  मिथुन राशिफळ, 13 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह - काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. नोकरी किंवा बिझनेसमध्ये धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहे. कोणत्याही प्रकारच्या लिखित कामामुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग आहेत. सहकार्याची भावना ठेवून काम केल्यास लवकर यश प्राप्त होऊ शकते. आज एखाद्या मोठ्या कामाची प्लॅनिंग केल्यास भविष्यात याचा फायदा होऊ शकतो. नोकरीतील अडचणी दूर होऊ शकतात. बिझनेसमध्ये रिस्क घेणे फायदेशीर ठरू शकते. अचानक धन लाभाचे योग जुळून येत आहेत.


  निगेटिव्ह - एखादे काम तुमच्या इच्छेनुसार वेळेवर होत नसेल तर त्याचा जास्त विचार आज करू नये. आज तुम्ही इच्छा नसतानाही तुम्हाला विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. काही कारणांमुळे आज कामामध्ये उशीर होऊ शकतो. उत्साहात येऊन जास्त खरेदी करू नये. आज तुम्हाला आजिबात आवडत नसलेले काम करावे लागू शकते.
   

  काय करू नये - आज निळ्या रंगाचे बेडशीट, टेबल क्लॉथ आणि चेअर कव्हरचा युज करू नये.


  लव्ह - तुमचा मूड झटपट बदलू शकतो. तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. तणाव वाढत असल्याचे जाणवल्यास पार्टनरपासून काही काळासाठी दूर जावे.


  करिअर - बिझनेसमध्ये फायद्याची स्थिती बनू शकते. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.


  हेल्थ - जुने आजार त्रास देऊ शकतात. जळजळ वाढेल.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  कर्क राशी, 13 Sep 2018, Aajche Kark Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह - एखादा जवळच्या नात्यात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. खर्च करताना स्वतःवर नियंत्रण ठेवा फायद्यात राहाल. पैसा कमावण्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. नवीन पार्टटाइम कामही मिळेल. जुन्या वस्तूंची विक्री करु शकता. कुटुंब आणि अपत्यांच्या गरजांकडे अधिक लक्ष द्यावे लागले. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. भौतिक सुख वाढेल. कामकाज करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो.

   
  नेगिटिव्ह - तुमच्यासमोर एखादा असा त्रास उभा राहू शकतो, ज्यामुळे तुमच्या कामकाजात तुम्हाला अचडण येऊ शकेल. यातून मार्ग काढण्यात तुमचा अर्धा दिवस निघून जाईल. 


  काय करावे - 2 लवंगा चाकूने कापून घराबाहेर फेका. 


  लव्ह - जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत घालवलेल्या वेळामुळे तुम्हाला एक नवी उर्जा मिळेल. 


  करिअर - नौकरी करणा-या लोकांसाठी हा काळ ठिक नाही. वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यास मन रमणार नाही.


  हेल्थ - तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. कुठल्याही आजाराला जास्त वाढू देऊ नका.  

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  13 Sep 2018, सिंह राशिफळ (Aajche Singh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - जुनी प्रकरणे मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आहे. काळही तुम्हाला साथ देऊ शकतो. आज तुम्ही जास्त भावूक व्हाल. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवाल तर तुम्हाला यश मिळू शकते. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. कुटुंबातील अनेक प्रकरणांचा आज निपटारा करता येऊ शकतो. आज केलेली बहुतांश कामे पूर्णही होऊ शकतात. सुख आणि आनंद मिळेल. वैवाहिक जीवनही चांगले राहील. 

   
  निगेटिव्ह - आपले मत इतरांवर लादू नका. पैशांच्या काही प्रकरणांमध्ये तुम्ही गरजेपेक्षा जास्त चिंता करू शकता. कोणत्याही प्रकारची चिंता किंवा भीती तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. कुटुंबाच्या कोणत्याही गरजेकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या खास विषयावर काहीही बोलण्यापासून सावध राहावे लागेल. वाद-विवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 


  काय करावे - कच्च्या दुधामध्ये पिवळ्या फुलाची पाने टाकून पिंपळाच्या मुलामध्ये टाका. 


  लव्ह - मोकळ्या मनाने बोलण्याचा आणि ऐकण्याचा दिवस आहे. भावना लक्षात घ्या आणि समजून सांगा. तुमची लव्ह लाइफही चांगली राहील. लाईफ पार्टनरकडून गिफ्ट मिळू शकते. 


  करिअर - धन लाभासाठी थोडी मेहनत करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. यशही मिळेल. 


  हेल्थ - आरोग्यावर लक्ष असू द्या. जास्त गरम वस्तूंपासून लांब राहा. 

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  13 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - तुम्ही ज्याबाबत पार विचार करत असाल अशी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या अडचणींबाबत मोकळेपणाने बोला. यश मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळण्याचेही योग आहेत. नातेवाईकांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही लोक तुम्हाला कॉपी करू शकतात. अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असाल. उत्साहाने काम केले तर चांगले राहील. आई-वडिलांबरोबर नाते सुधारण्याचे योग आहेत. व्यवसायासाठी दिवस चांगला ठरू शकतो. 


  निगेटिव्ह - आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गोष्टीबाबत जिद्द करू नका. विनाकारणचे खर्च होऊ शकतात. एखाद्या वाईट व्यसनाकडेही आकर्षित होऊ शकता. जुने शत्रू त्रास दोऊ शकतात. एखादा व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल. 


  काय करावे - 3 बदाम गोडेतेलात भिजवून घराबाहेर फेका. 


  लव्ह - वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. फिरायला जाण्याचे योग आहेत. अविवाहितांनी इतरांचा राग पार्टनरवर काढणे टाळा. 


  करिअर - बिझनेससाठी बाहेर जावे लागू शकते. तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. 


  हेल्थ - मानसिक तणावामुळे डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. 

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  आजचे तूळ राशिफळ (13 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे. बिझनेसमध्ये भरभराटी येईल. जुने मित्र भेटतील. मित्रांसोबत विचारविनिमय करावा लागेल. ऑफिसमध्ये प्रसन्न वातावरण राहील. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. भविष्याबाबत काही तरतूद करावी लागेल. सहकार्‍यांना खुश ठेवण्यासाठी खर्च करावा लागेल. 
   

  निगेटिव्ह - जुने विचार स्वस्थ बसू देणार नाहीत. कामाचा व्याप वाढेल. कोणतेही नवे काम हाती घेताना विचार करा, काम बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


  काय करावे - काळभैरव ‍किंवा हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा.


  लव्ह - जोडीदाराला वेळ द्याल. अनेक गैरसमज दूर होतील.


  करिअर - धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरदारांना अच्छे दिन येतील. पार्टनरशिप यशस्वी होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.


  हेल्थ - दातांचे विकार डोके वर काढेल. खातापितांना सावधगिरी बाळगा. 

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  आजचे वृश्चिक राशिफळ (13 Sep 2018, Aajche Vrishchik Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - जुन्या गोष्टींशी तुमचा संबंध असल्याची जाणिव होईल. आज तुम्ही सकारात्मक राहाल. लोक तुमच्याकडे प्रभावित होऊ शकतात. नवीन लोकांसोबत मैत्री होण्याचे योग आहेत. एखाद्या जुन्या संबंधांमध्ये नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. आत्मविश्वासामुळे तुम्हाला यश मिळू शकते. एखाद्या खास कामासाठी तुम्हाला संधी मिळू शकते. अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन काम करा.


  निगेटिव्ह - एखादे खास काम पुर्ण करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. चंद्र हा गोचर कुंडलीतील बाराव्या स्थानावर असल्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते. शारीरिक अडचणींसोबतच एखाद्या खास गोष्टीचे टेंशनही वाढू शकते. एखादा जुना रोग तुम्हाला त्रास देऊ शकतो. वायफळ कामांमध्ये वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो. 


  काय करावे - पराठ्यांवर थोडी हळद आणि साखर टाकून गायीला खाऊ घाला. 


  लव्ह - प्रेमी किंवा जोडीदाराला वेळ देण्याचा प्रयत्न करा. पार्टनरच्या छोट्या-छोट्या इच्छा पुर्ण केल्या तर तुमची लव्ह लाइफ मजबूत होऊ शकते. वैवाहित जीवनात येत असणा-या समस्या कमी होण्याचे योग आहेत.  


  करिअर - बिझनेसमध्ये चढ-उतार येण्याचे संकेत मिळू शकतात. बॉस तुमच्यावर खुश राहतील. अभ्यासात विशेषतः एखाद्या रिसर्चमध्ये यश मिळण्याचे योग जुळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. 


  हेल्थ - जुने रोग वाढू शकतात. अॅलर्जी होऊ शकते.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  13 Sep 2018, धनु राशिफळ (Aajche Dhanu Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज तुम्हाला आगामी काळातील घटनांचे संकेत मिळतील. कागदोपत्री कामे, बातचीत आणि प्रवास आज सहज पूर्ण होतील. तुम्ही तुमचे बोलणे आणि कामाच्या पद्धतीने लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न कराल. काही जण तुमची मदतही करतील. पैशांच्या बाबतीत स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. लोकांच्या सहकार्याने तुम्हाला आज फायदा होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक शांतीही तुम्हाला मिळू शकते. अचानक धनलाभाची शक्यता आहे. वाहन सुखाचे योग आहेत. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल.


  निगेटिव्ह - तुम्ही जी कार्ये केलेली आहेत, त्यांच्या परिणामांवर मनात संशय उत्पन्न होईल. तुम्ही स्वत:च्या कामावर असंतुष्ट असाल. तुम्हाला सुस्तीही जाणवेल. इतरांच्या बाबतीत तुम्हाला काही त्याग करावा लागू शकतो. याचा रिझल्ट तुम्हाला ताबडतोब मिळू शकतो. खरेदीसाठी दिवस ठीक नाही. जोडीदाराशी मतभेद होतील.


  काय करावे - आपल्या जिभेवर थोडे मध लावा.


  लव्ह - दांपत्य जीवनात त्रासाचे योग आहेत. कोणत्याही बाबीवरून खटके उडू शकतात. तुमच्या बाबतीत एखादी अफवा उडेल, सावध राहा.


  करिअर - नोकरदारांना अचानक धनलाभाची शक्यता. प्रमोशनचे योग बनत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सामान्य दिवस राहील.


  हेल्थ - आरोग्याच्या दृष्टीने सामान्य दिवस. तरीही जेवणावर लक्ष देणे गरजेचे.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  आजचे मकर राशिफळ (13 Sep 2018, Aajche Makar Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - एखादे मोठे यश मिळ्याची शक्यता आहे. केलेल्या कामांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. जे काम आज समजले नाही, ते सोडून देखील देऊ शकता. यामुळे कोणतेच नुकसान होणार नाही. अधिकाऱ्यांकडून मदत मिळू शकेल. सामाजिकरित्या तुम्ही अॅक्टीव रहाल. नविन लोकांशी ओळख होऊ शकते. नवे मित्र बनू शकतात. एखाद्या व्यक्तीविषयी तुमचे मत बदलू शकते. तुमच्या आत्मविश्वास वाढू शकतो. एखादे मोठे काम देखील तुम्हाला मिळू शकते.


  निगेटिव्ह - कामात रिक्स घेऊ नका. आपल्या मनातील गोष्टी आसपासच्या लोकांशी शेअर करू नका. आपल्या काही कामांविषयी थोडी अनिश्चितता जाणवेल. ऑफिसमध्ये तुमच्या किंवा इतरांच्या कामामुळे कलह निर्माण होऊ शकतो. व्यर्थ खर्च करू नका.


  काय करावे - पैसे ठेवण्याच्या जागी तुपाचा दिवा लावा.


  लव्ह - पार्टनरशी चांगले वर्तन ठेवा. त्याच्या भावनांचा सन्मान करा आणि आपल्या भावना त्यांच्यावर लादू नका.


  करिअर - करियरच्या बाबतीत दिवस चांगला जाऊ शकतो. मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन आभ्यासत रमेल.


  हेल्थ - जूने आजार उद्भवण्याची शक्यता आहे. जास्तीचे जेवण करू नका. शक्य असल्यास जेवणात पिवळी मिठाई खा.

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  13 Sep 2018, कुंभ राशिफळ (Aajche Kumbh Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज दिवसभर तुम्ही उत्साहित राहाल. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यासाठी हा दिवस रोमँटिक आणि फायद्याचा आहे. गोचर कुंडलीच्या ग्रहांमुळे यश मिळण्याचे योग आहेत. तुमची कामाची क्षमता वाढेल. खासगी प्रकरणात तुम्हाला निर्णय घ्यावा लागू शकतो. आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. 


  निगेटिव्ह - ठाऊक नसलेल्या माहितीविषयी बोलून अडचण निर्माण होऊ शकते. कर्क राशींच्या लोकांना मानसिक ताण जास्त होऊ शकतो. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात एखादे मोठे काम तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही. तुमची काही कामे अर्धवट राहू शकतात. 


  काय करावे - एखाद्या मंदिरात पिवळे नॅपकिन किंवा कापड दान करा.


  लव्ह - जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबीयांच्या सहकार्याने एखाद्या खास कामात यश मिळेल. 


  करिअर - गुंतवणूक केल्यास त्यापासून फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. अभ्यासात मन रमेल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. 


  हेल्थ - तब्येतीत चढउतार येतील. छोट्या छोट्या अडचणींमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.  

 • आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018
  आजचे मीन राशिफळ (13 Sep 2018, Aajche Meen Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - ताऱ्यांची स्थिती ठीक-ठाक आहे. जूने काम आटोपण्यात काहीच अडचण नाही. आरोग्याशी निगडीत काही समस्या दूर कमी होण्याची शक्यता आहे. नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे. नविन अनुभव येऊ शकतो. तुम्ही काही नविन गोष्टी देखील समजून घेऊ शकाल. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ मिळू शकतो.


  निगेटिव्ह - अनोळखी लोकांशी संभाळून बोला. चर्चा आणि गुंतवणूकीचे प्रकरणे पुढे ढकला. तुमच्यासाठी त्रासदायक दिवस असू शकतो. कोणतीच महत्वाची चर्चा किंवा व्यवहार आज करू नका. इतरांवर अवलंबून राहणे तुमच्यासाठी ठीक नसेल. नशिबाच्या भरवशावर राहू नका. जे काम तुम्हाला सोपे वाटत होते ते आज सुरू केल्यास कठिन आणि अशक्य वाटू शकते. काही नवे करण्याची इच्छा झाल्यास स्वत:वर ताबा ठेवा.


  काय करावे - आपल्या खालच्या स्तरातील लोकांचे मन दुखवू नका.


  लव्ह - प्रेमातील एखादी जूनी अडचण आज संपून जाईल. जिवनसाथीचे सहकार्य आज तुम्हाला मिळू शकेल. आज ठरलेली नाती चिरकाल टिकणारी ठरेल. प्रेम आणि वैवाहिक आयुष्य प्रसन्नदायक राहिल. एखाद्या नव्या व्यक्तीची ओळख होऊ शकते.


  करिअर - प्रोफेशनल लाइफ ठीक असेल. लॉ स्टूडेंट्सला यश मिळू शकते.


  हेल्थ - कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्बेतीत चढ-उतार येण्याची शक्यता आहे.

Trending