आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात हिंदी भाषेतील सर्वात अव्वल वेबसाइट DainikBhaskar.com

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दैनिक भास्कर समूहाची न्यूज वेबसाइट DainikBhaskar.com देशात हिंदी भाषेतील अव्वल क्रमांकाची वेबसाइट ठरली आहे. वेबसाइटचे पेज व्ह्यूज व युनिक व्हिजिटर्सची मोजणी करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कॉमस्कोरने ३ कोटी ३५ लाख युनिक व्हिजिटर्ससह दैनिक भास्कर डॉट काॅम देशातील क्रमांक-१ची वेबसाइट असल्याचे प्रमाणित केले आहे. हिंदीतील पहिल्या १० वेबसाइट्समध्ये आजतक, एनडीटीव्ही खबर व न्यूज-१८ या तीन टीव्ही वाहिन्यांच्या वेबसाइट्सचा समावेश आहे. याशिवाय दैनिक जागरण, अमर उजाला, जनसत्ता, नवभारत टाइम्स, पत्रिका व दैनिक हिंदुस्तानसारख्या ६ अन्य हिंदी वृत्तपत्रांच्या वेबसाइट्सचाही यात समावेश आहे. या सर्वांना मागे टाकत भास्कर डॉट कॉमने अव्वल क्रमांक पटकावला.


बातम्यांच्या विश्वासार्हतेसह वाचकांच्या जीवनाशी जोडले जाण्यास भास्कर समूह नेहमीच प्राधान्य देत आला आहे. यासोबतच वैविध्यपूर्ण मजकुरातून विविध क्षेत्रांतील ज्ञानाधारित व कल्पक पत्रकारितेच्या माध्यमातून भास्कर आपल्या वाचकांना नेहमी सर्वात अग्रेसर ठेवण्यास वचनबद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...