आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तू : सर्व 12 राशींसाठी कसे फळ प्रदान करते दक्षिण मुखी घर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यतः दक्षिणमुखी घर अशुभ मानले जाते. बहुतांश लोक पूर्व किंवा पश्चिमुखी घरात राहणे पसंत करतात, परंतु वास्तुनुसार दक्षिणमुखी घर सर्व राशीच्या लोकासांठी अशुभ नसते. कोलकाताच्या वास्तू विशेषज्ञ डॉ. दीक्षा राठी यांच्यानुसार सर्व 12 लग्न कुंडलींसाठी दक्षिणमुखी घराचा प्रभाव वेगवेगळा राहतो. कुंडलीमध्ये एकूण 12 लग्न सांगण्यात आले आहेत. पहिले स्थाणज्य राशीचे असते, कुंडली त्या लग्नाची मानली जाते. लग्नाचे नाव 12 राशीच्या आधारे निश्चित होते.

1. मेष लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर किंवा प्लॉट शुभ राहतो. अशा घरामध्ये राहिल्याने व्यक्तीचा विकास होतो.

2. तुमची कुंडली वृषभ लग्नची असल्यास दक्षिणमुखी घर अशुभ राहते.

3. मिथुन लग्न असलेल्या लोकांसाठी ही दिशा अशुभ राहते. अशा घरामध्ये व्यक्तीला आजार होण्याची शक्यता राहते.

4. कर्क लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर अत्यंत शुभ राहते. यांना मान-सन्मान, नोकरीत प्रमोशन आणि अपत्य सुख मिळते.

5. सिंह लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर भाग्योदय कारक ठरते.

6. कन्या लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर कष्टदायक ठरते. घरातील आजार आणि खर्च कधी थांबत नाहीत.

7. तूळ लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी या दिशेचे घर सामान्य राहते.

8. वृश्चिक लग्न असलेल्या लोकासांठी दक्षिणमुखी घर अत्यंत शुभ राहते. या घरामध्ये राहिल्याने मान-सन्मान आणि आत्मविश्वास वाढतो.

9. धन लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी या दिशेचे घर शुभ राहते. अशा घरामध्ये राहिल्याने व्यक्तीला अपत्य, शिक्षण आणि धन सुख मिळते.

10. मकर लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर कुटुंबासाठी शुभ राहते.

11. कुंभ लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर अडचणी वाढवणारे ठरू शकते. अशा घरात राहिल्याने जीवनात संघर्ष वाढतो.

12. मीन लग्न कुंडली असलेल्या लोकांसाठी दक्षिणमुखी घर धनलाभ करून देणारे आणि भाग्योदय कारक ठरते.

बातम्या आणखी आहेत...