आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित पँथरचा ‘राजा’ काळाच्या पडद्याआड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, कवी, चित्रकार, लेखक, संपादक व राजकारणी अशा अनेकविध भूमिकांत वावरलेले ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले (७९) यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. बुधवारी चैत्यभूमी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात पत्नी दीक्षा व कन्या गाथा ढाले आहेत. 


राजा ढाले यांनी १९५० मध्ये महाराष्ट्र दलित साहित्य संघ संस्था स्थापन केली. त्यांचा मूळ पिंड साहित्यिक व चित्रकाराचा होता. १९७२ मध्ये दलित पँथर सामाजिक संघटनेची ज. वि. पवार, अरुण कांबळे व नामदेव ढसाळ यांच्या साथीने त्यांनी स्थापना केली. लघुनियतकालिकाच्या चळवळीतील ते बिनीचे शिलेदार होते. १९७२ मध्ये साधना साप्ताहिकात ‘काळा स्वातंत्र्यदिन’ व येरू अनियतकालिकात छापलेल्या ‘सत्यकथेची सत्यकथा’ या त्यांच्या लेखांनी वादांचे मोहळ उठवले होते. या लेखांनीच ढाले यांना बंडखाेर नेता म्हणून पुढे आणले. अॅट्राॅसिटीचे खटले लढवण्यासाठी सक्षम वकील निर्माण व्हावेत यासाठी अलीकडेच त्यांनी वकिलांचे राज्यव्यापी संघटन बांधण्याचा प्रयत्न केला होता.