आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानच्या शोमधून बाहेर झाली दलजीत कौर, म्हणाली - 'दुःखी आहे, लांबचा प्रवास करायचा होता' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : दलजीत कौर 'बिग बॉस 13' मधून बाहेर झाली. या सीजनचे हे पहिले इव्हिक्शन आहे. ती दोन आठवड्यांपूर्वी 29 सप्टेंबरला शोमध्ये इंटरट झाली होती. बिग बॉसच्या घरातून बेहरे आल्यानंतर तिने दैनिक भास्करसोबत विशेष बातचीत केली. यावेळी ती म्हणाली की, तिला या शोमध्ये लांबचा प्रवास करायचा होता. अशात एवढ्या लवकर एलिमिनेट झाल्याचे तिला खूप दुःख होत आहे.  
 

'नाही माहित कुठे चूक झाली'
दलजीत म्हणते, "मला नाही माहित चूक कुठे झाली. पण घरात जाण्यापूर्वीच मी एंडेमॉल (प्रोडक्शन हाउस) ला सांगितले होते की, मी जाताच कनेक्शन बनवू शकणार नाही. मला लोकांसोबत जुळवून घ्याल थोडा वेळ लागतो. मी स्ट्रॉन्ग कनेक्शन बनवायला सुरुवात केलीच होती आणि मला आउट केले गेले. मला वाटते की, मला आणखी थोडा वेळ मिळायला हवा होता. पहिला आठवडा तर आम्हाला एकमेकांना ओळखण्यातच निघून गेला."

'बिग बॉस' पूर्णपणे रिअल'
दलजीत म्हणाली, "मला वाटले होते की, 'बिग बॉस' च्या घरात गेले तर, लोक मला आणखी जास्त ओळखतील. माझ्यासाठी दुसरी मोठी कामे मिळवण्यासाठी हा खूप मोठा प्लॅटफॉर्म होता. दुसरी गोष्ट सलमान सरांना भेटणे अचिव्हमेंट होते. ते खूप चांगले आणि समंजस व्यक्ती आहेत. शोमधून निघाल्यानंतर ते मला म्हणाले, 'तू खूप छान पद्धतीने हा खेळ खेळलास. तू तुझ्या सन्मानसोबत बाहेर जात आहेस.' ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे." 

'रोचक कामाचा शोध घेईन'
दलजीत तिचा सुरु असलेला शो (गुड्डन तुमसे न हो पाएगा') सोडून 'बिग बॉस' मध्ये गेली होती. तिने सांगितल्यानुसार, 'गुड्डन...' च्या मेकर्ससोबत तिचे नाते एवढे चांगले आहे की, त्यांनी आनंदाने मला 'बिग बॉस' चा भाग होऊ दिले. मात्र आता ती बाहेर येऊन काय करेल ? याच्या उत्तरात ती म्हणाली, "बाहेर आल्यानंतर मी सर्वात आधी काही तास माझ्या मुलासोबत घालवले. त्याला भेटून खूप समाधान वाटत आहे. पुढे चांगले काम करायचे आहे. रोचक प्रोजेक्ट्सच्या शोधात राहीन."

'रियलिटी शो पाहण्याचा वेळ नाही'
घरातील अनुभव आणि सशक्त प्रतिस्पर्धीबद्दल दलजीतने सांगितले, "जो रियलिटी शो करून आले आहेत, त्यांना माहित आहे की, हा गेम कसा खेळायचा आहे. अटेंशन कसे मिळेल ? मी तर डेलीसोप करत आले आहे. घर सांभाळते. माझ्याकडे वेळ नसतो की, मी रियलिटी शो पाहावा आणि समजून घ्यावे की, तो समजून घ्यावा. मी जशी आहे, स्वतःला तसेच तिथे दाखवले. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की, तिथे जेवढे लोक आहेत, त्यांच्यासोबत माझे चांगले नाते होते." 

'सिद्धार्थ, रश्मि, आरती यांच्यासोबत मैत्री वाढत होती'
दलजीतने पुढे सांगितले, "बिग बॉस' च्या घरात 100 पेक्षा जास्त कॅमेरे लागलेले आहेत. असा कोणताच कोपरा नाहीये, जिथे केमेर्याच्या नजरेपासून वाचता येईल. कुठे ना कुठे याचे एक प्रेशरदेखील असते. तिथे एवढे सगळे लोक आहेत आणि खूप स्ट्रॉन्ग पर्सनॅलिटीचे आहेत. त्यांच्यासोबत मिसळणे, भांडणे, वाद आणि प्रत सर्वकाही विसरून सोबत जेवण करणे. मला हे सर्व आयुष्यभर आठवणीत राहील. ज्यांना मी सर्वात जास्त मिस कारेन, ते रश्मि (देसाई), आरती (सिंह) आणि सिद्धार्थ शुक्ला आहेत. त्यांच्यासोबत उत्तर मैत्री झाली होती."

'सिद्धार्थ शुक्ला स्ट्रॉन्ग कन्टेस्टंट आहे'
दलजीत म्हणाली, "सिद्धार्थ शुक्लाला सशक्त प्रतिस्पर्धी मानते. कारण तो रिअल आणि स्ट्रॉन्ग आहे. त्यांच्यासोबतच्या मैत्रीने खूप खुश आहे. तो कमी बोलतो, पण चांगले बोलतो. स्पष्टपणे बोलतो. त्याला जे आवडत नाही, ते तो तोंडावर बोलतो. त्याच्यासोबत कनेक्ट करायला काहीच कठीण वाटले नाही. बाहेर आल्यावर आम्ही टचमध्ये राहू. माझे रिलेशन सीरियस असतात. पण ते बनण्यात वेळ लागतो. ज्यांनी तावरीत घराबाहेर आले पाहिजे त्यांच्यामध्ये शेफाली (बग्गा), शहनाज (कौर), पारस (छाबड़ा) हे आहेत. हे सर्व खूप फेक आहेत."

बातम्या आणखी आहेत...