आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार तास हवेत उडत राहिले फुटलेले विमान; इमर्जन्सी लँडिंग, सर्व 130 प्रवासी सुरक्षित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तामिळनाडूत त्रिची विमानतळावर एअर इंडियाचे दुबईला जाणारे विमान उड्डाणादरम्यान गुरुवारी रात्री १:३० वाजता ५ फूट उंच भिंतीला धडकले. विमान पुरेशी उंची गाठू शकले नाही म्हणून त्याची चाके व खालचा भाग भिंतीला धडकला. विमानात १३० प्रवासी व ६ क्रू सदस्य होते. सर्व सुखरूप आहेत. अपघातानंतर विमान तसेच वळवून पहाटे ५.३५ वाजता मुंबईत उतरवण्यात आले. उड्डयनमंत्री सुरेश प्रभूंनी सांगितले की, एअर इंडियाच्या सुरक्षेची जबाबदारी आता खासगी कंपन्या पाहतील. मंडळही स्थापले जाईल. 

 

दोन वैमानिक हटवले 
विमानाचे दोन्ही वैमानिक डी. गणेश बाबू व अनुराग यांना सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत एअर इंडियाने कामावरून काढले आहे. गणेश बाबूला तब्बल ३६ हजार तास, तर अनुराग यालाही ३० हजार तासांच्या उड्डाणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. 

बातम्या आणखी आहेत...