Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Danave said the terrorists Instead of martyrs

सोलापुरातील मेळाव्यात रावसाहेब दानवेंची जीभ घसरली..शहिदांऐवजी संबोधिले अतिरेकी

प्रतिनिधी | Update - Mar 26, 2019, 11:29 AM IST

पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारले

  • Danave said the terrorists Instead of martyrs

    सोलापूर - देशात युद्धजन्य स्थिती आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात कधी युद्ध होईल हे सांगता येत नाही. पाकिस्ताने भारतावर हल्ला केल्याचे सांगत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाकिस्तानने भारताचे ४० अतिरेकी मारले असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले.

    सोमवारी भाजप व शिवसेनेच्या वतीने सोलापुरातील हेरिटेज गार्डन येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना रावसाहेब दानवे यांची जीभ घसरली. भारतीय सैनिक म्हणणाएेवजी ते अतिरिकी म्हणाले. त्यामुळे मेळाव्यात एकच खळबळ उडाली. दानवे यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. या वेळी सुभाष देशमुख, नीलम गोऱ्हे आदी उपस्थित होते. दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी असे म्हटले नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

Trending