आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाटकांत नृत्य, अंतराळाचा अनाेख्या पद्धतीनेे प्रयाेग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरूमध्ये २८ सप्टेंबरला एका नाटकाचे सादरीकरण झाले, ज्यात तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. रंगमंचाच्या मागील पडद्यावर चित्रपट दाखवण्याची सोय असून थ्रीडी तंत्रज्ञान वापरत त्यावर ‘अंतराळातील संचार’ या विषयावर विज्ञान, कला आणि अन्य गोष्टींना सामावून घेत एक कार्यक्रम झाला. कला आणि संस्कृतीला सीमा नसते. कारण जेव्हा एका युगाचा अंत असतो तेव्हा रात्री १२ वाजता आपण नव्या युगात प्रवेश करतो आणि जुन्या काळातील काही प्रवृत्ती तशाच राहत नव्या युगातील प्रवृत्तीत मिसळून जातात. या युगात सिमेंट किंवा दगडांच्या भिंती नसतात, केवळ त्यावर लावलेल्या कॅलेंडरची पाने उलटली जातात. घड्याळातील काटे मात्र गोलाकार फिरतात. महान गणितज्ञ रामानुजन यांच्या आई सीतादेवी भरतनाट्यमच्या तज्ञ होत्या. त्यांच्या नृत्यमुद्रा पाहत रामानुजन यांच्या मनात अंतराळातील रहस्ये जाणण्याची उत्कंठा जागृत झाली. अंकगणित, बीजगणित आणि रेखागणित हे गणिताचे प्रकार असून या मुद्रांमध्ये शू्न्यातून रेखाचित्रे बनवली जातात. विज्ञानाचा शोध ही आधी एक कल्पनाच असते, अनेक प्रयोगांनंतर ती सत्यतेपर्यंत पोहोचते. एक विचार मनात आल्याने एक शास्त्रज्ञ आंघोळ करतानाच नग्नावस्थेतच ‘युरेका युरेका’ ओरडत प्रयोगशाळेत गेला. मॅडम क्युरीदेखील प्रयोग करता-करता अयशस्वी झाल्या व खुर्चीवरच झोपी गेल्या. परंतु जाग आल्यावर त्यांच्या मनात एक विचार आला व तो यशाच्या शिखरावर घेऊन गेला. जसे आपण हातात पारा पकडू शकत नाही, कल्पनांचेही असेच आहे. झाकलेली मूठ ही कोत्या मनोवृत्तीचे प्रतीक आहे. एका मंदिराच्या प्रांगणात या नाटिकेचे सादरीकरण झाले. अशा प्रकारे ही पूजा करता येऊ शकते हे आश्चर्य आहे. पुराणांना निवडणूक प्रचाराचा भाग बनवला जात आहे. परंतु त्याचा उपयोग विज्ञानातही करता येऊ शकतो. १८९५ मध्ये लुमिअर बंधूंनी चलचित्र कॅमेऱ्याचा शोध लावला, ज्याच्या शुभारंभावेळी उपस्थितात जॉर्ज मेलिए उपस्थित होते. ज्यांनी १९०२ मध्ये त्यांनी ‘जर्नी टू मून’ नामक चित्रपट बनवला. अशा प्रकारे चित्रपटांचा विज्ञानाशी संबंध राहिला आहे. १९६७ मध्ये स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी अशा चित्रपटांची सुरुवात केली, ज्यामध्ये ‘ईटी’ हा मैलाचा दगड ठरली. राकेश रोशननेही अंतराळातून आलेल्या प्राण्यावर चित्रपट बनवला, ज्यात त्याचे नाव ‘जादू’ असते. काॅम्प्युटरमधील आवाजाला ‘ओम’चा स्वर जोडत त्याचाही पुराणाशी संबंध जोडण्यात आला, जो यशस्वी झाला. उदयशंकर यांनी ‘कल्पना’ नामक चित्रपट बनवला, ज्याची कथा नृत्य कार्यक्रमाभोवती आहे आणि भारतातील अनेक नृत्यशैलींना यात दर्शवण्यात आले होते. त्यांच्या अल्मोडा येथील नृत्य विद्यालयात गुरुदत्त यांनीही प्रशिक्षण घेतल्याने ते आपल्या चित्रपटात त्यांना वेगळ्या पद्धतीने दर्शवत होते. बंगळुरूतील या कार्यक्रमात जयालक्ष्मीने नृत्य तर त्यांचा मुलगा अविनाश कुमार यांनी रंगमंच गाजवला होता. येथील सांस्कृतिक कार्यक्रम राजकारणमुक्त असतात. दक्षिणेत अनेक मंदिरे असून तेथे कायम कार्यक्रमांची रेलचेल असते. सर्वात जास्त सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे येथेच असून देशात चित्रपटगृहांची संख्या वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न दिसत नाहीत. वडिलांच्या मृत्यूनंतर बंदुकीचे लायसन्स आपोआप मुलाच्या नावे होते, पण चित्रपटगृहांच्या बाबतीत असे होत नाही. टीव्हीवर होत असलेल्या नृत्य कार्यक्रमात विचित्र नृत्यप्रकारांचे सादरीकरण होते, आणि त्याची तारीफही होते. परंतु प्रतिभावान नृत्यप्रकारांवर बंदी असली तरी यांचा स्फोट होणे कुणीही रोखू शकत नाही, हे मात्र खरे.

बातम्या आणखी आहेत...