'डान्स इंडिया डान्स'चा / 'डान्स इंडिया डान्स'चा प्रसिध्द कंटेस्टेंट प्रिंसने केले लग्न, नोटांची माळ घालून नववधूला आणण्यासाठी पोहोचला, मग मित्रांनी स्टेजवरच करायला लावला डान्स, गुजरातमध्ये झालेल्या लग्नात पोहचला नाही एकही मोठा स्टार 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 31,2019 10:01:00 AM IST
मुंबई. टीव्ही अभिनेत्री शीना बजाज आणि रोहित पुरोहितने लग्न केले आहे. तर लवकरच टीव्ही अभिनेत्री पलक जैनही विवाहबंधनात अडकणार आहे. याच काळात टीव्हीचा प्रसिध्द डान्सिंग रियलिटी शो 'डान्स इंडिया डान्स'च्या एका कंटेस्टेंटने लग्न केले आहे. 'डान्स इंडिया डान्स'पुर्वी सीजनचा प्रसिध्द कंटेस्टेंट प्रिन्स गुप्ताने आपली गर्लफ्रेंड सोनम लाडियासोबत लग्न केले आहे. प्रिंस आणि सोनमच्या लग्नाच्या विधी गुजरातमध्ये झाल्या. या कपलच्या लग्नाचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये दोघंही लाल रंगाच्या मॅचिंग आउटफिटमध्ये खास दिसत आहेत. नवरदेव प्रिंसने नोटांची माळ घातलेली दिसतेय. तर एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नवरदेवाचे मित्र स्टेजवर त्याला डान्स करायला लावताना दिसत आहेत. काही आठवड्यांपुर्वी टीव्ही अॅक्टर रित्विक धंजानीने प्रिंसच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. खुप कमी लोकांना माहिती असेल की, दोन वर्षांपुर्वी दोघांचा साखरपूडा झाला होता. मंगळवारीच प्रिंसने बरोडामध्ये आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली. यादरम्यान प्रसिध्द कोरियोग्राफर फिरोज खानने या पार्टीत हजेरी लावली होती. विशेष म्हणजे प्रिंसच्या लग्नात कुणीही मोठा स्टार पोहोचला नाही. 'डान्स इंडिया डान्स'च्या पहिल्या सीजनपासून आतापर्यंत प्रिंसमध्ये खुप बदल झाला आहे. प्रिंसने काही दिवसांपुर्वी आपला देन अँड नाओ फोटो शेअर करुन सांगितले होते की, त्याने 46KG वरुन त्याचे वजन 71KG केले आहे. म्हणजेच प्रिंसने आपले एकुण 25 किलो वजन वाढवले आणि त्याच्या लूक्समध्येही खुप बदल झाले आहेत.

X
COMMENT