आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विदेशात शो करण्याचे सांगून बोलावले, नंतर कारमध्ये बसवून केले सेक्शुअर हरॅशमेंट', डान्स इंडिया डान्सचा विजेता सलमानविरुध्द डान्सरने केली तक्रार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. बॉलिवूडचा प्रसिध्द कोरियोग्राफर आणि अनेक डान्सिंग रियलिटी शोचा विजेता सलमान यूसुफ खानविरुध्द छेडछाडीची तक्रार करण्यात आली आहे. सलमानवर एका डान्सरला शोच्या प्लानिंगसाठी दुबीमध्ये भेटण्यास बोलावण्याचा आरोप आहे. नंतर कारमध्ये बसून त्याने डान्सरसोबत छेडछाड केली. ओशिवारा पोलिसांनी सलमान खानविरुध्द तक्रार दाखल केली आहे आणि पोलिस आता तपास करत आहेत. 


बोलताना सलमान म्हणाला - तुला घरी सोडून येतो 
- ही महिला डान्ससोबतच मॉडलही आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ती म्हणाली की, 'डान्स इंडिया डान्स' फेम सलमान यूसुफ खानने तिला एका इव्हेंटमध्ये परफॉर्म करण्याच्या नावावर ओशिवाराच्या कॅफेटिरायमध्ये बोलावले होते. सलमाने तिला सांगितले की, तिला दुबईमध्ये बॉलिवूड पार्कमध्ये परफॉर्म करायचे आहे. या शोमध्ये दूसरे अनेक डान्सरही तिच्यासोबत येत आहेत. बोलणे संपल्यानंतर तो म्हणाला की, तुला घरी सोडून येतो. मुलीने आरोप लावला आहे की, कारमध्ये बसल्यानंतर सलमानने तिच्यासोबत छेडछाड केली. मग ती कशीबशी घरी गेली. पण तिचा पासपोर्ट समलानजवळच राहिला होता 

 

दुबई जाण्यास नकार दिला तर सलमानने दिली धमकी 
मुलीने आरोप लावला आहे की, तिने सलमानसोबत दुबई जाण्यास नकार दिला तेव्हा सलमान तिला धमकावू लागला. खुप प्रयत्न करुनही सलमानने तिचा पासपोर्ट परत केला नाही. मग तिला इच्छा नसतानाही दुबईला जावे लागले आणि बहरीन येथे जाऊन परफॉर्म करावा लागला. तिने आरोप केला आहे की, सलमानने तिथेही तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण 2018 चे आहे. तिने लोकांच्या भीतीपोटी तेव्हा तक्रार दाखल केली नाही असे ती म्हणाली आहे. 
 


 

बातम्या आणखी आहेत...