आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा MMS बनवून करत होता बलात्कार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिसार- युवती एका डांस अॅकेडमीमध्ये प्रशिक्षण घेत होती. या दरम्यान अॅकेडमीच्या संचालकाने तिचा अश्लील बनवून तिला ब्लॅकमेल करने सुरू केले.  त्यानंतर फिरवण्याच्या बहाण्याने युवतीला  शिमलाला घेऊन गेला आणि होटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला. वापस  आल्यानंतरही तो तिच्यासोबत बलात्कार करत  राहीला आणि ईतक्यावरच न थांबता गुंगीच्या अवस्थेत तिच्या गळ्यात लग्नाचा हार घालून पाच लाख रूपयाची मागणी करू लागला.  युवतीने त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

 

- युवतीने मॉडल टाउनच्या 'फिल दि बीट' डांस अॅकेडमीच्या संचालक सलमानवर बलात्कार आणि अश्लील एमएमएस शूट करून ब्लॅकमेल केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर सलमानचा भाऊ आणि तानसेन डांस अॅकेडमीचा संचालक सॅमवर त्या गुन्ह्यात साथ दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींचा शोध घेत आहे. 

 

- तिने सांगितले की, ती ग्रॅजुएट आहे आणि अंदाजे अडिच वर्षापासून मॉडल टाउनच्या फिल दि बीट डांस अॅकेडमीत डांसचे प्रशिक्षण घेत आहे. युवती अडिच वर्षांपासून सॅमकडून डांस शिकत होती. त्या दरम्यान सॅमने सलमानकडून डांस शिकण्याचे सांगितले. अॅकेडमीत आधीपासून 5-6 मुले शिकत होती. युवतीने सांगितले कि सलमान आधी तिला ग्रुपमद्ये डांस शिकवायचा, पण 6 महिन्यांपासून तो तिला एकट्यात डांस शिकवू लागला.

 

- त्या दरम्यान सलमाने गुपचुप तिचे डांस व्हिडिओ बनवून ते एडिट करून त्यांना अश्लील बनवले. आणि ते व्हिडिओ तिला दाखवून ब्लॅकमेल करणे सुरू केले. तिच्या घरच्यांना ते व्हिडिओ दाखवेल अशी धमकी देउन तिच्याकडून एक लाख रूपयेही घेतले.

 

- इतकेच नाही तर तिला शिमलाला फिरायला घेउन गेला. या कामात त्याला एका महिलेने साथ दिली. तिकडे त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि वापस आल्यावर देखील त्याने तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. 

 

- त्यानंतर त्याने तिला 20 नोव्हेंबर 2018 ला न्यायालय परिसरातील चेंबरमध्ये घेऊन गेला. तिथे तिला कॉफीत गुंगीचे औषध पाजले, आणि तिच्या गळ्यात हार घातला. नंतर तिला त्याने तिच्यासोबत लग्न केले आहे, असे सांगून पाच लाखांची मागणी करू लागला. 

बातम्या आणखी आहेत...