आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच नाही! सोशल मीडियावर पसरवला जाणारा फोटो जुना, पत्रकार परिषदेत सपना चौधरीचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - सपना चौधरीने पत्रकार परिषद घेऊन आपण कुठलाही राजकीय पक्ष जॉइन केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसिद्ध डान्सर आणि सिंगर सपनाने काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले असे वृत्त सर्वच माध्यमांनी लावून धरले. त्यानंतर रविवारी सपनाने पत्रकार परिषद घेऊन हे वृत्त खोटे असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर सध्या पसरवला जाणारा माझा फोटो खूप जुना आहे. एवढेच नव्हे, तर ज्या सोशल मीडिया अकाउंटवरून मी काँग्रेस जॉइन केल्याचे म्हटले जात आहे तो माझा नाही. मुळातच मी ट्विटरवर नाही असा धक्कादायक खुलासा सपना चौधरीने केला आहे. याबरोबरच, ट्विटरवर काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल स्वागत करणारे काँग्रेस नेते राज बब्बर यांना आपण कधीच भेटलो नाही असेही सपनाने म्हटले आहे.

 

कुणाचाही प्रचार करणार नाही -सपना चौधरी
सपना चौधरीने ट्वीट करून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे जाहीर केले असे शनिवारी दाखवण्यात आले. प्रत्यक्षात तो ट्विटर अकाउंट सपनाचा नसून तिचा फॅन पेज आहे. आपण ट्विटरवरच नाही, अशात ट्वीट करणार कसे? असा सवाल सपनाने उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिला काँग्रेसकडून खासदारकीचे तिकीट मिळणार असेही वृत्त आले होते. परंतु, आपण कुठलाही राजकीय पक्ष जॉइन करणे तर दूर निवडणुकीत प्रचार सुद्धा करणार नाही. कारण या सर्व गोष्टींपासून आपल्याला दूरच राहायचे आहे असे सपनाने सांगितले आहे.


राज बब्बर यांनीही केले होते ट्वीट
काँग्रेस नेते राज बब्बर यांनी ट्वीट करून सपना चौधरी काँग्रेसमध्ये सामिल झाल्याचे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी काँग्रेस परिवारात सपना चौधरीचे स्वागत असेही म्हटले होते. आपल्या पक्ष प्रवेशाची घोषणा करणारे राज बब्बर यांना आपण कधीच भेटलेलो नाही असेही सपनाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...