आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरियाणाची डान्सर सपना चौधरीने घेतला भारतीय जनता पक्षात प्रवेश, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारींच्या उपस्थितीत केली प्राथमिक सदस्य नोंदणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- डान्सर सपना चौधरीने आज(रविवार) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्ली भाजप अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत सपनाने पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी केली. अद्याप यावर अधिकृत विधान समोर आले नाहीये. लोकसभा निवडणुकीपूर्वी सपना काँग्रेसमध्ये सामिल होत असल्याच्या बातम्या होत्या. पण सपनाने त्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यानंतर ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.


दिल्लीमध्ये जवाहर लाल नेहरू स्टेडियमवर पक्षाच्या सदस्या नोंदणी कार्यक्रमात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप महासचिव रामलाल आणि मनोज तिवारींच्या उपस्थितीत सपनाने भाजप प्रवेश केला.

 

काँग्रेसने सदस्य फॉर्म दाखवला होता
सपनाच्या राजकिय पदार्पणाबद्दल अनेक चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस जॉइन करण्याच्या बातमीपासून सुरू झाल्या होत्या. सपनाने त्या सर्व बातम्यांचे खंडन केल्यावर, काँग्रसने तिचा काँग्रेस सदस्य फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तरीदेखील सपनाने काँग्रेस प्रवेशाच्या बातम्या फक्त अफवा असल्याचे सांगितले.


सपना चौधरी भाजपात येणार हे तेव्हाच पक्के झाले, जेव्हा दिल्लीत निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी तिने उत्तर-पूर्वचे भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्यासाठी एक रोड शो केला होता. 


बिग बॉस-11 मधून फेमस झाली सपना
हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील नजफगडची रहिवासी असलेली सपना एक स्टेज परफॉर्मर आहे, तसेच ती हरियाणवी लोकगितांमध्ये चर्चेतले नाव आहे. ती भारतात फेमस तेव्हा झाली, जेव्हा तिला रिअॅलिटी शो बिग बॉस सीजन-11 मध्ये एंट्री मिळाली. तिला भोजपुरी आणि हिंदी चित्रपटातही काम करण्याची संधी मिळाली.

बातम्या आणखी आहेत...