आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3-3 गर्लफ्रेंड्स सांभाळता-सांभाळता डान्सरपासून चोर बनला हा तरुण, एकाच वर्षात 4 वेळा झाली अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल डेस्क - दिल्लीतील गोविंदपुरी चौक परिसरातून पोलिसांनी एक युवकाला चोरी प्रकरणी अटक केली आहे. तो एक प्रोफेशनल डान्सर होता. तसेच त्याला एक-दोन नव्हे, तर तीन-तीन गर्लफ्रेंड्स आहेत. सुरुवातीला डान्सिंगचा कोर्स करून त्याने एक ग्रुप जॉइन केले. डान्स शो आणि छोट्या-छोट्या कार्यक्रमांमध्ये कमाई केली. एवढे पैसे स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे होते. परंतु, तीन-तीन प्रेयसींचे नखरे पूर्ण करून त्यांना फिरवून खिशात एक पैसाही वाचत नव्हता. त्यामुळेच, तो चोरीकडे वळला अशी कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी दिलेल्याम माहितीनुसार, त्याला चोरीच्या प्रकरणात अटक केल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी त्याला तीनदा अटक करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा असेच कारण समोर आले होते.

 

बातम्या आणखी आहेत...