आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dangal Actress Fatima Sana Shaikh REACTS To Her Social Media Trolls See What She Said

दंगल गर्लने दिले युझरला सडेतोड उत्तर, रमजानमध्ये नाश्ता करताना शेअर केला होता फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- दंगल गर्ल म्हणून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री फातिमा सना शेखने एका सोशल मीडिया यूझरला चांगलेच खडसावले आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे. युझरने तिला रमजानमध्ये शेअर केलेल्या एका फोटोमुळे ट्रोल केले होते. खरंतर, रविवारी फातिमाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, यामध्ये ती एका गार्डनच्या लॉनमध्ये बसलेली दिसत आहे. एका हातात कॉफी आहे आणि दुसरा कप खाली ठेवलेला आहे. यासोबतच नाश्त्याची प्लेट दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "पिकनिक, यह मेरा खाना नहीं है।"

 

सोशल मीडिया युझरने व्यक्त केली नाराजी
फातिमाचा फोटो पाहिल्यावर एका सोशल मीडिया यूझरने आपली नाराजी व्यक्त करत लिहले की, "रमजानमध्ये अशी पोस्ट टाकू नको, इतर मुस्लीमसुद्धा आहेत जे तूला फॉलो करतात. रोजाचे महत्व समजून घे." यामुळे फातिमाने या युझरला उत्तर दिले की, जर आपल्याला फोटोमुळे अडचण होत असेल तर ऑनलाइन येऊ नये." यावर इतर काही सोशल मीडिया यूझर्सनी फातिमाला प्रश्न केला की, तू रोजा ठेवते का? पण या प्रश्नावर तिने कोणतेच उत्तर दिले नाही.


'ठग्स ऑफ हिंदोस्तान' होता शेवटचा चित्रपट
27 वर्षाच्या फातिमा सना शेखला चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करताना 20 वर्षांपेक्षा जास्त झाले आहेत. 1997 मध्ये आलेला कॉमेडी चित्रपट 'चाची 420' मध्ये तिने बालकलाकार म्हणून कमल हसन यांच्या मुलीची भुमिका केली होती आणि तिची ही भुमिका लोकांना खूप आवडली. यानंतर ती 'बिट्टू बॉस' आणि 'आकाश वाणी' या चित्रपटामध्ये झळकली. पण तिला 2016 मध्ये आलेल्या 'दंगल' चित्रपटामुळे खूप प्रसिद्धी मिळाली. यामध्ये फातीमाने महावीर फोगाट(आमिर खान) यांची मुलगी गीता फोगाटची भुमिका केली होती. फातिमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'(2018) मध्ये शेवटची दिसली होती. ती आता सैफ अली खान स्टारर 'भूत पुलिस' या चित्रपटामध्ये काम करणार आहे. याव्यतिरिक्त अनुराग कश्यपच्या एका चित्रपटात राजकुमार रावसोबत काम करणार आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...