आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणामुळे सध्या कुठेच दिसत नाहीय 'दंगल' फेम सान्या मल्होत्रा, प्रेक्षकांना देणार आहे आश्चर्याचा धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा आपला आगामी चित्रपट 'शकुंतला देवी'मध्ये विद्या बालनसोबत 'अनुपमा बनर्जी'ची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारत आहे. जेव्हापासून तिची भूमिका समोर आली तेव्हापासून सान्याचे खूप कौतुक होत आहे. ती खऱ्या आयुष्यातील पात्र साकारत आहे. तथापि, अभिनेत्यासाठी हा काळ सर्वात कठिण बदलांपैकी एक असतो. चित्रपटात तिचा लुक पाहता अनेक ब्यूटी, हेअर ऑइल ब्रँड्सच्या प्रमोशनसाठी तिला संपर्क करण्यात आलेला आहे, परंतु तिने यासाठी नकार दिला आहे. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी पात्राबद्दल अधिक माहिती उघड होऊ नये, हे यामागचे कारण आहे. प्रेक्षकांसाठी आपले पात्र आश्चर्यचकित असावा, असे तिला वाटते. 

सान्या लवकरच आदित्य रॉय कपूरसोबत अनुराग बसुच्या चित्रपटातही दिसेल. दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला रिलीज होण्याची शक्यता आहे.

अभिनेत्रीने नुकतीच आपला आगामी प्रोजेक्ट 'पगलॅट'ची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी ती गुनीत मोंगा आणि एकता कपूरसोबत लखनऊमध्ये शूटिंगही करत आहे.

बातम्या आणखी आहेत...