आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Dangerous Places Life In The Swat Valley Began To Change, School And Hotel In Malangar City Start Up!

धाेकादायक ठिकाण-स्वात खाेऱ्यातील जीवन बदलू लागलेय, मलालाचे शहर मिंगाेरात शाळा-हॉटेलही सुरू!

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • आधी तालिबानी हत्या करून भरचाैकात मृतदेह टांगत; आता व्यवसायाबद्दल चर्चा...
  • २० लाख लाेकांनी हिंसाचारामुळे घर साेडले हाेते. बहुतांश लाेक परतले

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील स्वात खाेरे नैसर्गिक साैंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा प्रदेश सध्या बहरू लागला आहे. जगातील सर्वात धाेकादायक ठिकाण म्हणून स्वात खाेरे आेळखले जायचे. तेव्हा तालिबानींचा स्वातवर ताबा हाेता. हिंसाचार वाढलेला हाेता. ताे वाईट काळ हाेता. स्वातमधील मिंगाेरा एक शहर. युसूफझाई मलालाचे शहर म्हणून ते परिचित आहे. ते आधी तालिबानचे मुख्यालय हाेते. मिंगाेरात तेव्हा भरचाैकात ४ ते ५ लाेकांचे मृतदेह टांगलेले असायचे. एकदा तर आठवडाभरात ३८ नागरिकांचे मृतदेह लटकलेले दिसायचे. परिस्थिती प्रचंड भयंकर हाेती. त्यामुळे या भागाला ‘खूनी चाैराहा’ म्हणून आेळखले जात हाेते. स्थानिक दुकानदार आझम खान म्हणाले, दहशतवाद्यांनी या चाैकात माझ्या काकांची हत्या केली हाेती. तालिबानी केवळ संशयावर लाेकांचे प्राण घेत.  

२० लाख लाेकांनी हिंसाचारामुळे घर साेडले हाेते. बहुतांश लाेक परतले :

मलालाच्या वडिलांनी १९९४ मध्ये शाळेची सुरुवात केली हाेती. त्याला ‘खुशहाल स्कूल’ असे नाव देण्यात आले हाेते. परंतु तालिबानने या शाळेला उद्ध्वस्त केले हाेते. परंतु आता खुशहालसह १६०० शाळांच्या दुरुस्तीचे काम व्यापक पातळीवर सुरू आहे. सात जिल्ह्यांच्या मलकंद विभागाला आता उद्याेगाचे केंद्र बनवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एप्रिल २००९ पर्यंत स्वात खाेऱ्यातील सुमारे २० लाख लाेकांनी घर साेडले हाेते. त्यापैकी बहुतांश पुन्हा गावी परतले आहेत. ते पुन्हा आपली िनत्याची कामे करू लागले आहेत. ‘खुनी चाैक’ आता खुशहाल चाैक, पर्यटकांचेही आगमन 
 
स्वात खाेऱ्यात आनंद बहरू लागला आहे. या भागावर आता सरकार व लष्कराचे नियंत्रण आहे. हत्येचे केंद्र झालेला ‘खून चाैराहा’ आता खुशहाल चाैक म्हणून आेळखला जाताे. व्यापारी मंडळी आता भयमुक्त वातावरणात व्यवहार करू लागले आहेत. शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. हाॅटेल सुरू झाले. रुग्णालयापासून पर्यटनापर्यंतचे व्यवहार सहजपणे हाेऊ लागले आहेत. अनेक देशांचे पर्यटकही स्वात खाेऱ्याकडे वळले आहेत.