आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Video: विषारी सर्प तोंडात घेऊन आत-बाहेर करून दाखवत होता, अचानक पोटात सरकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरोहा, यूपी - 'बहादुरी' दाखवण्याच्या नादात एका व्यक्तीने विषारी सर्प गिळला. यामुळे त्याचा वेदनादायी मृत्यू झाला. 8 सप्टेंबर रोजीच्या या शॉकिंग घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. 40 वर्षीय या व्यक्तीने रोडवरून साप पकडला होता. 

 

- रजबपूर परिसरातील चकबदौनिया गावातील रहिवासी महीलाल सिंह शेतकरी होता. त्याला दारूचे व्यसन होते. शनिवारीही तो दारू पिऊन भटकत होता. यादरम्यान त्याने रस्त्यावर एक सर्प पाहिला. त्याने तो पकडला तेव्हा काही जणांनी व्हिडिओ बनवण्याचा हट्ट धरला.


- काही जणांनी उचकवल्याने महीपालने सापासोबत खेळ सुरू केला. त्याने सापाला अनेक वेळा तोंडात टाकले व बाहेर काढले. यादरम्यान, साप हातातून निसटून थेट त्याच्या पोटात गेला. यामुळे लगेच त्याची प्रकृती ढासळली. तरीही उपस्थितांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी भोंदूबाबाकडे नेले. अखेर शरीरात विष पसरून त्याचा वेदनादायी मृत्यू झाला. 

 

बातम्या आणखी आहेत...