आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी असा दिसायचा 21 वर्षांचा यूट्यूबर दानिश, लाइफस्टाइलमुळे होते अनेक चाहते, आता मृत्यूनंतर दुप्पटीने वाढले आहेत फॉलोवर्स, 34 मिलियनच्या पुढे गेला आकडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. प्रसिध्द यूट्यूबर आणि एमटीव्हीचा शो Ace of Space चा कंटेस्टेंट राहिलेला 21 वर्षांच्या दानिशचा गुरुवारी एका अपघातात मृत्यू झाला होता. दानिश फक्त 21 वर्षांचा होता. तो इंटरनेटच्या जगतात जगभरात परिचित होता. रिपोर्ट्सनुसार दानिशच्या मृत्यूनंतर त्याचे इंस्टाग्राम अकाउंट ऑफिशियली डिलीट करण्यात आले आहे. पण बिग बॉसचा एक्स केंटेस्टेंट आणि प्रोड्यूसर विकास गुप्ताने हे रीइंस्टॉल करण्यास सांगितले आहे. दानिशचे अनेक चाहते आहेत. दानिशच्या मृत्यूनंतर त्याच्या इंस्टा फॉलोअर्सची संख्या 16 मिलियनवरुन वाढून 35 लाखांवर गेली आहे. दानिश यू-ट्यूबसोबतच सोशल मीडियावरही खुप अॅक्टिव्ह होता.

दानिशच्या मृत्यूनंतर त्याच्या चाहत्यांना धक्का पोहोचला आहे. चाहते दानिशला ट्विटरवरुन श्रध्दांजली अर्पण करत आहेत. विकास गुप्ताही दानिशचा खुप मोठा फॅन होता. तो दानिशच्या निधनाने खुप दुःखी आहे. एका सोशल पोस्टमध्ये त्याने दानिशचा फोटो शेअर करत म्हटले की, "दानिश तू नेहमी मनात राहशील."


फिटनेसविषयी अॅक्टिव्ह होता दानिश 
- दानिश हा फिटनेसविषयी खुप अॅक्टिव्ह होता. तो नेहमी आपले वर्कआउट व्हिडिओ शेअर करत राहायचा. दानिशने इंस्टावर आपले अनेक देन अँड नाऊ फोटोज शेअर केले होते. यामध्ये त्याच्या लूकमधील बदल स्पष्ट दिसत होता. 
- दानिश नेहमी आपले सिक्स पॅक एब्स फ्लॉन्ट करताना आणि शर्टलेश फोटोज शेअर करायचा. दानिशला स्पीडमध्ये बाइक चालवणे आणि कार रेस लावणे खुप आवडायचे. 
- दानिशने स्वतःचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहे, यामध्ये तो आपली कलरफुल बाइक स्पीडमध्ये पळवताना दिसतोय. तर काही फोटोंमध्ये तो कार पोज देतानाही दिसतोय. 
- सक्सेसफुल यू-ट्यूबर बनण्यापुर्वी तो चाळीत राहायचा. त्याला पहिला फोन त्याच्या मोठ्या भावाने गिफ्ट केला होता. 
- आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला दानिशचे फिटनेस व्हिडिओ आणि त्याच्या साटलिश लाइफस्टाइलविषयी काही फोटोज दाखवणार आहोत. 

 

सारा अली खाननेही दिली श्रध्दांजली 
- दानिशच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर अभिनेत्री सारा अली खानने शोक व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ क्लिप शेअर करुन लिहिले की, "देव तुझ्या आत्म्यास शांत देओ दानिश"
- साराने यासोबतच एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, यामध्ये दानिश तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ दानिशचा शेवटचा रियलिटी शो Ace of Space मधील आहे. विकास गुप्ताच्या या शोमध्ये दानिश एक कंटेस्टेंट म्हणून पोहोचला होता. तर सारा येथे सेलिब्रिटी गेस्ट म्हणून पोहोचली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...