Home | Gossip | Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

हे आहेत बॉलिवूड व्हिलेन्सचे आलिशान घरं, 'डॅनी'ने या खास ठिकाणी बंगला बनवण्याची घेतली होती शपथ

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 03, 2018, 02:55 PM IST

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील बंगले 'प्रतिक्षा' आणि 'जलसा', राजेश खन्नांचा 'आशीर्वाद' आणि शाहरुख खानच्या

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  मुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील बंगले 'प्रतिक्षा' आणि 'जलसा', राजेश खन्नांचा 'आशीर्वाद' आणि शाहरुख खानच्या 'मन्नत'विषयी आपण अनेकदा ऐकले आणि वाचले आहे. मात्र कधी तुम्ही बी टाऊनमध्ये खलनायकाची भूमिका साकारणा-या कलाकारांच्या बंगल्यांविषयी ऐकले आहे का? दिवंगत अभिनेते अमरिश पुरी, शक्ती कपूर आणि डॅनी या प्रसिद्ध खलनायकांच्या आशियानाविषयी फार कमी बोलले गेले आहे.


  आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे हे प्रसिद्ध खलनायक मुंबईत कुठे वास्तव्याला आहेत, ते सांगत आहोत...


  अमरिश पुरी
  'मिस्टर इंडिया' या सिनेमातील मोगॅम्बोच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचे घर वेस्टर्न मुंबईतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या जुहू येथे आहे. अमरिश पुरी यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांचे घरे याच भागात आहेत. 2005 मध्ये अमरिश पुरी यांनी या जगाचा निरोप घेतला.

  पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडचे खलनायक कुठे राहतात...

  (Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  डॅनी डेंजोग्पा


  सिक्कीमहून मायानगरी मुंबईत दाखल झालेले प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेंजोग्पा यांचा जुहू येथे आलिशान बंगला आहे. त्यांनी आपल्या या बंगल्याचे नाव ड्जोंगरिला असे ठेवले आहे. डॅनी यांचा हा बंगला अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे.

   

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  प्रेम चोप्रा 


  बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा वांद्रा येथील पाली हिल परिसरात वास्तव्याला आहे. पाली हिल येथील 'निब्बाना' रेसिडेंशियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा फ्लॅट आहे.

   

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  शक्ति कपूर


  सिनेमांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारे अभिनेते शक्ती कपूर मुंबईत जुहू येथे वास्तव्याला आहेत. जुहू येथील पाम बीचच्या समुद्रकिना-यावर असलेल्या रेसिडेंशियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे घर आहे. अभिनेता अक्षय कुमार त्याचा शेजारी आहे.

   

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  प्राण 


  दिवंगत अभिनेते प्राण यांचे घर वांद्रा येथील 'रॉक' बिल्डिंगमध्ये आहे. वांद्रा वेस्टर्न मुंबईतील पॉश परिसर आहे. सलमान खान, शाहरुख खान, रेखा यांची घरे याच भागात आहेत. 2013 मध्ये प्राण यांनी या जगाचा निरोप घेतला.

   

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  सदाशिव अमरापूरकर 


  2014 मध्ये या जगाचा कायमचा निरोप घेणारे दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचे घर वेस्टर्न मुंबईतील वर्सोवास्थित यारी रोड येथील 'पंचधारा' सोसायटीमध्ये आहे.


   

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  मुकेश ऋषी 


  आमिर खान स्टारर सरफरोश या सिनेमात सलीमची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश ऋषी यांचा पवईस्थित या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. 33 मजली या अपार्टमेंटचे नाव 'एवलोन' असे आहे.

   

 • Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai

  आशुतोष राणा 


  दिग्दर्शिका तनुजा चंद्रा यांच्या दुश्मन या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणा मुंबईत वर्सोवा येथे वास्तव्याला आहेत. वर्सोवा येथील 'लीला' अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे.

Trending