आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्कः शुक्रवारी रिलीज झालेल्या रजनीकांत स्टारर 'दरबार' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर शानदार सुरुवात झाली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार या चित्रपटाने भारतात जवळपास 32 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे. अहवालानुसार, हा आकडा रजनीकांत यांच्या मागील चित्रपटांच्या कमाईच्या अपेक्षेप्रमाणे नाही. पण ही सुरुवात छान आहे.
'दरबार'ने भारतात 32 कोटींची कमाई केली असली, तरी हिंदी बेल्टमध्ये हा चित्रपट फीका पडला. चित्रपटाने येथे 1.88 कोटी रुपये कमावले असून त्यात हिंदीचे 1.2 कोटी आणि तामिळ आवृत्तीचे 68 लाख रुपयांचे कलेक्शन सामील आहे.
प्रांत | पहिल्या दिवसाची कमाई |
तामिळनाडू | सुमारे 16 कोटी रुपये |
आंध्र प्रदेश | सुमारे 6.50 कोटी रुपये |
कर्नाटक | सुमारे 5 कोटी रुपये |
केरळ | सुमारे 2.50 कोटी रुपये |
हिंदी भाग | सुमारे 1.88 कोटी रुपये |
'दरबार'सोबत 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'छपाक' हे दोन हिंदी चित्रपटही रिलीज झाले असून या दोघांनीही घरगुती बॉक्स ऑफिसवर अनुक्रमे 16 कोटी आणि 4.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तुलनात्मक दृष्टीकोनातून पाहिल्यास दरबारचे एकूण कलेक्शन (32 कोटी रुपये) दोन्ही हिंदी चित्रपटांच्या एकुण कलेक्शन (20.75 कोटी रुपये) च्या एकूणच दीडपट अधिक आहे.
'दरबार' पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये विजय स्टारर 'बिगिल' च्या तुलनेत मागे राहिला, जो तामिळ चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 'बिगिल'ने 35 कोटींचा व्यवसाय केला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात म्हटले आहे की, 'दरबार' रजनीकांतच्या आधीच्या '2.0' आणि 'कबाली' चित्रपटांच्या मागे राहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.