• Home
  • News
  • 'Darbar' earns 150 crores| Rajnikanth film box office| Worldwide earned 150 crore rupees

बॉक्स ऑफिस / 'दरबार'ने जगभरात केली 150 कोटींची कमाई, चार दिवसांत वसूल केला 75 टक्के निर्मिती खर्च

मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे बजेट 200 कोटी आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Jan 14,2020 03:22:00 PM IST

बॉलिवूड डेस्कः शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या 'दरबार' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ग्लोबल बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची निर्मिती करणा-या लायका प्रॉडक्शनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाचे बजेट 200 कोटी आहे.

200 कोटी रुपये आहे चित्रपटाचा निर्मिती खर्च
रिपोर्ट्सनुसार, ए. मुरुगदास यांचा 'दरबार' हा चित्रपट 200 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. प्रॉडक्शन कंपनीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने केवळ चार दिवसांत 75% निर्मिती खर्च वसूल केला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक त्रिनाथ यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट या आठवड्यात 200 कोटींचा व्यवसाय करेल. या अर्थाने, चित्रपट सात दिवसांत त्याची संपूर्ण किंमत वसूल करेल.


'दरबार' तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला. हिंदी वगळता या चित्रपटाने तामिळ, तेलगूमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे रजनीकांत पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहेत. तर सुनील शेट्टी खलनायकाच्या भूमिकेत आहेत.

X
COMMENT