आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाईट लोक तुमच्यासमोर झुकल्यास व्हावे सावध, अन्यथा वाढू शकतात अडचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवार 18 ऑक्टोबरला संपूर्ण भारतात दसरा (विजयादशमी) साजरा केला जाईल. या वर्षी दसरा तिथीसंदर्भात पंचांग भेदही आहे. काही ठिकाणी दसरा 19 ऑक्टोबर, शुक्रवारी साजरा केला जाईल. हा चांगल्या गोष्टींचा वाईटावर विजय प्राप्त झाल्याचा दिवस आहे. 


गोस्वामी तुलसीदार व्दारे रचलेल्या श्रीरामचरित मानसमध्ये सांगितल्या प्रमाणे, सीतेचे हरण करण्यासाठी जेव्हा रावण लंकेतून निघतो आणि आपले मामा मारीचकडे पोहोचतो. रावण वाकून मारीचला नमस्कार करतो. रावणाला वाकलेले पाहून मारीचला समजते की, भविष्यात काही तरी संकट येणार आहे.

श्रीरामचरित मानसमध्ये लिहिले आहे की,
नवनि नीच कै अति दुखदाई। जिमि अंकुस धनु उरग बिलाई।।
भयदायक खल कै प्रिय बानी। जिमि अकाल के कुसुम भवानी।।


या ओळींचा अर्थ आहे की, रावणाला अशा प्रकारे वाकलेला पाहून मारीच विचार करतो की, नीच व्यक्तीचे नमन करण्याचे कारण हे दुखदाई असते. मारीच रावणाचा मामा होता, नात्यात मोठा होता, परंतु रावण राक्षसांचा राजा आणि अभिमानी होता. तो विनाकारण कोणासमोर वाकू शकत नाही. हे मारीचला माहिती होते. रावणाने त्यांच्या समोर वाकणे हा भयंकर अडचणीचा संकेत होता.


मारीच विचार करतात की, ज्या प्रकारे एखादा मनुष्य धनुष्य वाकवतो तेव्हा तो एखाद्याच्या मृत्यूसाठी बाण सोडतो. जेव्हा साप वाकतो तेव्हा तो डसण्यासाठी वाकतो. मांजर वाकते ती शिकार करण्यासाठी. त्याच प्रकारे रावणसुध्दा मारीचसमोर वाकला होता. एखाद्या नीच व्यक्तीची गोड वाणी खुप दुखदाई असते. मारीचला कळाले होती की, भविष्यात त्याच्यासोबत काही तरी वाईट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...