आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर व्हायरल आहेत रावणाच्या या 8 गोष्टी, किती खऱ्या आणि किती खोट्या?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी विजयादशमी (दसरा) 18 आणि 19 ऑक्टोबर म्हणजे दोन दिवस साजरा केला जाईल. पंचांग भेदामुळे असे घडत आहे. मान्यतायेनुसार विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी रावणाचा वध केला होता. रावण दहनाचा अर्थ असा आहे की, आपण आपल्या मनातील वाईट विचारांचा अंत करून श्रीरामाच्या आदर्शाचे पालन करण्याचा प्रयत्न करावा.


सध्या फेसबुक, व्हॉट्सअपसहित संपूर्ण सोशल मिडीयावर रावणाच्या संदर्भात विविध मेसेज व्हायरल होत आहे की - रावणाचे बहिण शूर्पणखावर खूप प्रेम होते, तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने सीतेचे हरण केले, एवढा संयमी होता की सीतेच्या इच्छेशिवाय तिला कधीहि बळजबरीने स्पर्श केला नाही आणि रावण आपल्या जीवनकाळात कोणाकडूनही पराभूत झाला नाही. या युगात लोक रावण झाले तरी खूप आहे इत्यादी... परंतु या सर्व गोष्टींमागचे सत्य काही वेगळेच आहे. आज आम्ही तुम्हाला तेच सत्य सांगत आहोत...


असत्य 1 - रावण खूप संयमी होता, त्याने कधीच बळजबरीने देवी सीतेला हात लावला नाही.
सत्य - रावणाने सीतेला बळजबरीने कधीच हात लावला नाही कारण त्याला कुबेराचा मुलगा नलकुबेर याने शाप दिला होता की, रावणाने कोणत्याही स्त्रीला तिच्या इच्छेविरुध्द स्पर्श केला किंवा तिला महालात ठेवले तर त्याच्या डोक्याचे शंभर तुकडे होतील. याच कारणामुळे रावणाने सीतेला कधीही हात लावण्याचा प्रयत्न केला नाही आणि आपल्या महालातही ठेवले नाही.


2. भाऊ असावा तर रावणासारखा कारण त्याने आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीतेचे हरण केले...
रावणाची बहिण शूर्पणखाच्या पतीचे नाव विद्युतजिन्न होते. तो कालकेय नावाच्या राजाचा सेनापती होता. जेव्हा रावण विश्वविजयासाठी निघाला तेव्हा कालकेय राजासोबत त्याचे भंयकर युद्ध झाले. या युद्धामध्ये रावणाने विद्युतजिन्नचा वध केला. तेव्हा शूर्पणखाने रावणाला शाप दिला की, माझ्यामुळे तुझा सर्वनाश होईल.


3. रावणाने बहिणीसाठी दिले स्वतःच्या कुळाचे बलिदान
रावणाने आपल्या बहिणीच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीतेचे अपहरण केले नाही तर तो कामांध असल्यामुळे त्याने हे कृत्य केले. रावणाने अनेक स्त्रियांसोबत दुराचार केला होता. जेव्हा शूर्पणखाने रावणासमोर सीतेचा सौंदर्याचे वर्णन केले तेव्हा रावणाच्या मनात सीतेला प्राप्त करण्याची लालसा निर्माण झाली. यामुळे रावणाने सीतेचे हरण केले.


4. रावण महान शिवभक्त होता
पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा रावण वैद्यनाथ शिवलिंग घेऊन जात होता, तेव्हा त्याला लघुशंका लागली आणि त्यांनी ब्राह्मण रुपात आलेल्या विष्णूंच्या हातामध्ये शिवलिंग ठेवले. भगवान विष्णू यांनी ते शिवलिंग तेथेच जमिनीवर ठेवले. रावण परत आल्यानंतर त्याने शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु शिवलिंग त्याच्याकडून हललेसुद्धा नाही. यामुळे रावणाने रागात येउन शिवलिंगावर हाताने प्रहार केला, ज्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त शिवलिंग जमिनीत गेले.


5. रावण अजेय योद्धा होता
सर्वांची अशी मान्यता आहे की, रावण अजेय योद्धा होता. आपल्या जीवनकाळात तो कधीही पराभूत झाला नाही. परंतु हे पूर्णपणे चुकीचे विधान आहे. रावण रामाव्यतिरिक्त आणखी चार जणांकडून पराभूत झाला होता. ते चार जण - 1. पाताळ लोकचे राजा बळी. 2. महिष्मतीचे राजा कार्तवीर्य अर्जुन. 3. वानरराज बाली आणि 4. भगवान शिव.


6. रावण धर्माचा ज्ञाता आणि विद्वान होता
रावण विद्वान अवश्य होता, परंतु त्याने त्याच्या ज्ञानाचा कधीच व्यावहारिक जीवनात उपयोग केला नाही. हजारो ऋषींचा वध केला, विविध यज्ञ उध्वस्त केले आणि हजारो महिलांवर अत्याचार केले. रावणाने रंभा नावाच्या अप्सरेसोबतसुद्धा दुराचार केला. रावणाने वेदवती नावाच्या एका ब्राह्मण स्त्रीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा वेदवतीने आत्मदहन करून रावणाला शाप दिला होता.


रावणाशी संबंधित इतर भ्रम आणि त्यांचे सत्य जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...