आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रफाल : दसॉल्टचे सीईओ म्हणाले, अंबानींना आम्हीच निवडले, राहुल यांच्या आरोपांबाबत म्हणाले-मी खोटे बोलत नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रफाल डीलबाबत विमान तयार करणारी फ्रान्सची कंपनी दसॉल्टचे सीईओ एरिक ट्रॅपियर म्हणाले की, अनिल अंबानीना त्यांच्या कंपनीने स्वतः निवडले आहे. यामध्ये रिलायन्सबरोबरच इतरही 30 भागीदार आहेत. ट्रॅपियर म्हणाले की, भारतीय वायूसेना या डीलला पाठिंबा देत आहे कारण त्यांना या विमानांची गरज आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ट्रॅपियर यांनी रफाल डीलबाबत हे वक्तव्य केले. 

 

#WATCH: ANI editor Smita Prakash interviews CEO Eric Trappier at the Dassault aviation hangar in Istre- Le Tube air… https://t.co/0igomqmE2i

— ANI (@ANI) November 13, 2018

 

काय म्हणाले ट्रॅपियर 
- अंबानींना आम्ही स्वतःच निवडले होते. आमच्याबरोबर रिलायन्सशिवाय इतरही 30 पार्टनर आधीपासूनच आहेत. 
- भारतीय वायूसेना या डीलचे समर्थन करत आहे कारण त्यांना लढाऊ विमानांची गरज आहे. 
- 36 विमानांची किंमत अगदी तेवढीच आहे जेवढी 18 तयार विमानांची ठरवण्यात आली होती. 
- 36 म्हणजे 18 च्या दुप्पट होतात. त्यामुळे माझ्या मते किंमत दुप्पट व्हायला हवी होती. पण हा सरकारशी सरकारचा व्यवहार होता. त्यामुळे किंमत त्यांनी ठरवली आणि मलाही 9 टक्के किंमत कमी करावी लागली. 
- राहुल गांधींच्या आरोपांबाबत बोलताना ट्रॅपियर म्हणाले, मी खोटे बोलत नाही. जे सत्य मी आधी बोललो होतो आणि जे वक्तव्य मी केले होते ते खरे आहेत. माझी प्रतिमा खोटे बोलणाऱ्यांची नाही. CEO म्हणून माझ्यासारख्या जागी असताना खोटे बोलू शकत नाही. 

 

दरम्यान, केंद्र सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये बंद लिफाफ्यात रफाल सौद्याबाबतची माहिती सादर केली. देशामध्ये रफाल सौद्यावरून चांगलाच गदारोळ माजलेला आहे. काँग्रेस केंद्र सरकारवर या सौद्यामध्ये घोटाळा केल्याचा आरोप लावत आहे. मोदींनी रिलायन्सला यातून फायदा करून दिला असा आरोप राहुल गांधी वारंवार करत आहेत. 
 

 

बातम्या आणखी आहेत...