आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाटा स्टोरी : पाच वर्षांत ८२ हजार शिक्षक घटले, ५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण क्षेत्रात शिक्षकांच्या रिक्त जागांची आज सर्वात मोठी समस्या आहे. गेल्या ५ वर्षांत सरकारी शाळांतील शिक्षकांची संख्या ८२७६०ने घटली आहे. शालेय स्तरावर एकूण ५ लाख शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. 

जगातील सर्वात जुने विद्यापीठ भारतातील
नालंदा विद्यापीठ भारतात ५ व्या शतकात स्थापन झाले होते. हे जगातील सर्वात जुने विद्यापीठ मानले जाते. देशात १८४० पर्यंत गुरुकुल प्रथा होती. ब्रिटिश शासन काळात आधुनिक शिक्षणाचा प्रसार झाला. १८५५ पर्यंत देशात २८१० प्राथमिक व २८१ माध्यमिक शाळा होत्या. यात एकूण १,३०,७२४ विद्यार्थी होते. उच्च शिक्षणाच्या बाबतीत पश्चिम बंगालमधील सेरामपोर कॉलेज (१८१८) व आयआयटी रुरकी (१८४७) चा उल्लेख आहे. 
> 15 लाख हून जास्त शाळा देशभरात आहेत
> 994 विद्यापीठे व ४१,३९५ कॉलेजेस देशभरात 
> 2030 ला जगात ४ पैकी एक पदवीधर भारतीय असेल
 

उच्च शिक्षणात विद्यार्थी वाढले, शिक्षक घटले
देशात उच्च शिक्षणात शिक्षकांच्या जागा घटल्या आहेत. २०१३ मध्ये १३,६७,५३५ जागा होत्या. त्या २०१७ मध्ये १२,८४,७७५ उरल्या आहेत. म्हणजे ५ वर्षांत ८२,७६० शिक्षक घटले आहेत. उच्च शिक्षणात विद्यार्थी व शिक्षकांचे प्रमाण २४:१ आहे. चीन, ब्राझीलमध्ये हेच प्रमाण १९:१ असे आहे. 


> 5 लाख शिक्षकांची संख्या रिक्त, ६६०० प्राध्यापकांची पदे केंद्रीय विद्यापीठात रिक्त आहेत. 
> 3.66 कोटी विद्यार्थी उच्च शिक्षणात २०१७-१८ मध्ये. ३.२३ कोटी विद्यार्थी २०१३-१४ मध्ये होते

प्राथमिक स्तरावर विद्यार्थी-शिक्षक प्रमाण अयोग्य
भारतात १५ लाख शाळा असून चीनमध्ये फक्त ५ लाख शाळा आहेत. परंतु भारतात सुमारे ४ लाख शाळांमधून विद्यार्थी संख्या ५० पेक्षाही कमी आहे, तर येथे जास्तीत जास्त २ शिक्षक आहेत. नीती आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात आपला शैक्षणिक खर्च पुढील चार वर्षांत जीडीपीच्या ६ टक्क्यांवर आला पाहिजे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी रिपोर्टनुसार २००९ ते २०१९ पर्यंत शिक्षणाच्या अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे मात्र, खर्च झालेला नाही.


> 35.22 विद्यार्थ्यांमागे सरासरी एक शिक्षक देशात
> 23.65 विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक जगात
> 3 पट अधिक शाळा चीनच्या तुलनेत भारतात

बातम्या आणखी आहेत...