आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 महिन्यानंतर लाँच होईल लक्झरी इंटेरिअरची ही स्वस्त SUV, कमी किमतीत मिळतील अनेक हायटेक फीचर्स; मायलेजही असेल 30KM

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्क - डॅटसनने आपली स्वस्त 5 सीटर Go आणि 7 सीटर Go+ भारतात लॉन्च केलेली आहे. यामुळे आता कंपनी आपल्या स्वस्त परंतु पॉवरफुल Datsun Cross ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या SUV ला डिसेंबर 2018 पासून जानेवारी 2019 दरम्यान लाँच केले जाऊ शकते. 

 

कंपनीने ही कार इंडोनेशिया आणि जकार्तामध्ये आधीच लाँच केलेली आहे. या कारचे नाव आधी Datsun Go Cross होते, परंतु नंतर कंपनीने यातील Go हटवून फक्त Cross केले. त्यापूर्वी ही ऑटो एक्स्पो 2018 मध्ये लॉन्च केल्याचे वृत्त आले होते.

 

एवढी पॉवरफुल असेल SUV

रिपोर्टनुसार, Datsun Go Cross ला पेट्रोल आणि डिझेल दोन्ही व्हेरिएंटमध्ये लाँच केले जाईल. यात 1.2 लिटरचे पेट्रोल आणि 1.3 लिटरचे डिझेल इंजिन मिळेल. पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 22KM/L आणि डिझेलचे मायलेज 30KM/L च्या आसपास असू शकते. दुसरीकडे, याची सुरुवातीची किंमत 4.5 लाख रुपये असू शकते.

 

कारच्या इंटेरिअरबद्दल बोलायचे झाल्यास यात 7 इंचांची टचस्क्रीन असणारा अॅडव्हान्स स्टीरियो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असेल. दुसरीकडे, पॉवर विंडो आणि रिअर पार्किंग सेन्सर यासारखे फीचर्सही मिळतील.

 

या कारमध्ये होऊ शकते टक्कर
असे मानले जात आहे की, Datsun Go Cross ची भारतात किंमत 4.5 लाखांपासून सुरू होऊ शकते. दुसरीकडे, याचे टॉप मॉडेल 6.8 लाखांच्या आसपास असेल. अशा वेळी मारूतीची सिलेरियो आणि महिंद्राची KUV 100 ला ही टक्कर देऊ शकते. सिलेरियो 5 लाख आणि KUV 100 तब्लल  5.5 लाखांपासून सुरू होते. म्हणजेच  Go Cross भारतातील सर्वास्त स्वस्त  SUV म्हणून ओळखली जाईल.

 

 

बातम्या आणखी आहेत...