आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्यहत्या करण्यापूर्वी मुलीने मम्मीला लिहिले, पप्पांना माझ्या मृतदेहाला हातही लावू देऊ नकोस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - सोमवारी रात्री आयडीए मल्टी बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आई-वडिलांसाठी एक सुसाइड नोट लिहून ठेवली होती. रागामध्ये तिने वडिलांसाठी लिहिले आहे की, त्यांनी शवाला हात लावू नये कारण त्यांच्या रोजरोजच्या बोलण्यामुळे ती त्रस्त झाली होती. आत्महत्येमागे मुख्य कारण प्रेम प्रकरण सांगण्यात येत आहे.


आई-वडील घराबाहेर असताना मुलीने घेतली केली आत्महत्या
- राजेंद्र नगर पोलीस स्टेशनचे अधिकारी अशरफ अली अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजनाचा आपले आवडली बळीराम निराळे यांच्यावर राग होता. सोमवारी आई-वडील घराबाहेर गेल्यानंतर तिने गळफास घेतला. वडील परत आल्यानंतर दरवाजा उघडला नाही यामुळे त्यांनी दरवाजा तोडला तर ती लटकलेल्या अवस्थेत होती.


- शेजाऱ्यांनी सांगितले की, संजनाचे कॉलनीतील एका मुलाशी प्रेम प्रकरण चालू होते. याची चाहूल वडिलांना लागली होती. ते तिला वारंवार त्या मुलाला भेटू नकोस म्हणून रागवत होते. याच कारणामुळे रागात येऊन तिने हे पाऊल उचलले असावे. 


- संजनाने सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे की- मम्मी! मी जात आहे. रोज-रोजचे बोलणे आता ऐकू शकत नाही. त्या बळीरामला सांग की, माझ्या जवळही येऊ नको. माझ्या शवाला हातही लावू नको. मी सीड (तरुणाचे नाव)शी बोलणे सोडून दिले आहे. सॉरी मम्मी, मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...