आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे वडिलांनी संपवले जीवन, रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तालुक्यातील भादली येथील तरुणीने प्रेमविवाह केल्याने मानसिक तणावात असलेल्या वडिलांनी गुरुवारी रात्री नशिराबाद-भादली रुळावर रेल्वेसमाेर उडी घेऊन आत्महत्या केली. नरेंद्र मुरलीधर नारखेडे (५२ रा. नारखेडेवाडा, भादली) असे मृताचे नाव आहे. नारखेडे यांच्या मुलीने तपत कठाेरा येथील तरुणाशी प्रेमविवाह केला आहे. मुलीने नारखेडे यांच्या मनाविरुध्द मुलाशी प्रेमविवाह केल्याने ते व्यथीत झाले हाेते. या प्रकाराने मानसिक तणावात असलेले नारखेडे गुरुवारी रात्री ८.३० वाजता घराबाहेर पडले. बऱ्याच वेळानंतरही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने भाच्याला याबाबत सांगितले. त्यांचा भाचा कपिल पाटील यांनी नारखेडे यांचा शाेध घ्यायला सुरुवात केली. कपिल याला रात्री ११ वाजेच्या सुमारास नशिराबाद-भादली गेटजवळ मृतदेह आढळून आला. ताे मृतदेह नारखेडे यांचा असल्याचे त्याने ओळखले. नारखेडे इलेक्ट्रिशियनचे काम करत हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दाेन मुली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत.