आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपत्तीसाठी मुलीने आईला दिला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - संपत्तीसाठी बहिणीने आईला झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला. यामुळे आईचा मृत्यू झाल्याची तक्रार एका व्यापाऱ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात दिली. संबंधित ४८ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंद श्रवणकुमार पटेल (४५,रा. शुक्रवार पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे, तर शारदाबेन पटेल असे मृत महिलेचे नाव आहे. फिर्यादी व आरोपी सख्खे भाऊ-बहीण आहेत. दोघांचाही पुण्यामध्ये व्यवसाय आहे. त्यांची आई आजारी पडल्यावर मुलीने उपचारादरम्यान नातेवाइकांना भेटण्यास मज्जाव केला होता.  दरम्यान, अहमदाबाद येथे उपचारांसाठी हलवण्यात आल्यानंतर आईचा मृत्यू झाला होता. 
 

आईकडील ६० लाखांची राेकड, शेअर्स घेतले
आईकडील ६० लाख रुपये व शेअर्स घेण्यासाठी आईला मुलीनेच झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस दिला. यातच तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शारदाबेनचा मृत्यू २३ ऑगस्ट २०१८ रोजी झाला होता.