आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी विवाहितेचा बळी, वर्षभरापूर्वीच झाला होता विवाह. उपचारादरम्‍यान पिडीतेचा मृत्‍यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मकराना (नागौर/राजस्‍थान) - मकराना मध्‍ये एक हादरावून टाकणारी घटना समोर आली आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी लग्‍न झालेली एक विवाहिता मंगळवार रोजी सासरच्‍या मंडळींच्‍या रागाची शिकार झाली आहे. भाजलेल्‍या अवस्‍थेत तिला उपचारासाठी जयपूर येथील एसएमएस रूग्‍णालयात दाखल केले होते. मंगळवार रोजी उपचारादरम्‍यान तिचा मृत्‍यू झाला. पिडीताच्‍या माहेरच्‍यांनी सांगितले की, तिच्‍या सासुने तिला रॉकेल टाकून जिवंत जाळले. सासरच्‍यांनी जाळण्‍याच्‍या आधी विवाहितेने एका नातेवाईकाला फोन करून तिला जिवंत जाळत असल्‍याचे सांगितले, यासोबतच आपल्‍या भावाला फोन करून घाबरलेल्‍या आवाजात म्‍हणाली ''हॅलो दादा, मला वाचव.....'' सदरील विधानांचा व्हिडीओ आणि घटना घडायच्‍या आधीचा ऑडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.      

 

मृताने मरण्‍याच्‍या आधी बनविला विडीओ -

किस्‍मतचे वडील भंवर सिंह यांनी सांगितले की, त्‍यांची मुलगी किस्‍मत कंवर हिचा विवाह 5 फेब्रुवारी 2017 रोजी बलराज सिंह याच्‍याशी झाला होता. 23 ऑक्‍टोबर रोजी संध्‍याकाळी किस्‍मत हिला भाजलेल्‍या अवस्‍थेत पति व दीर नंदसिंह यांनी सर्वप्रथम जयपुर येथील एका खासगी रूग्‍णालयात व नंतर एसएमएस हॉस्पिटल मध्‍ये दाखल केले होते. जेहा मुलीला शुद्ध आली तेव्‍हा तिने सांगितले की, तिच्‍या सासुने तिच्‍यावर रॉकेल टाकुन जाळले. सासू तिचा छळ करत होती. नव-याला सांगतिले पण त्‍याने लक्ष दिलं नाही. तो सुद्धा तिच्‍याशी बोलत नव्‍हता.

तिच्‍या कुटुंबीयांनी रात्री 8 वाजता तिने सासरच्‍या मंडळींविरोधात दिलेल्‍या तक्रारींचा व्हिडीओ बनविला. त्‍यानंतर त्‍यादिवशी रात्री साडे नऊच्‍या सुमारास किस्मत कंवर हिचा उपचारादरम्‍यान मृत्‍यु झाला. सदरील घटनेची माहिती पिडीताच्‍या कुटंबीयांनी मकराना पोलिस स्‍टेशनला दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक महेंद्र यांनी जयपूर येथे जाऊन सदरील या घटनेची माहिती घेतली आहे.
 

सासरच्‍यांनी केली होती पैशाची मागणी, कैफे हाऊस उघडण्‍यासाठी बायकोचे दागिने ठेवले होते गहाण.  

भंवर सिंह यांनी सांगितले की, लग्‍नानंतर पैशासाठी बलराज सिंह त्‍यांच्‍या मुलीचा छळ करत होता. हळू हळू करत मी त्‍याला 5 लाख रूपयांपेक्षा जास्‍त पैसे दिले. हुंड्यामध्‍ये 40 तोळे सोने तसेच 1 लाख रूपये नगदी दिले होते. एवढं सगळं देऊनही अजुन 5 लाख रूपये आणि चारचाकी गाडीची मागणी केली. त्‍यांची मागणी पूर्ण करू शकलो नाही म्‍हणुन ते  माझ्या मुलीचा छळ करत होते. मुलगी आनंदात राहावी यासाठी बलराजला 2 वेळेस अजुन 3 लाख रूपये दिले होते व एकदा 1 लाख 25 हजार रूपये मुलीसोबत पाठविले होते. त्‍यानंतर जयपूर येथे कॅफे सुरू करण्‍यासाठी बलराज ने किस्‍मत चे 40 तोळे दागिने एका फायनान्‍स कंपनीत गहाण ठेवून त्‍यावर कर्ज घेतले. हे सर्व केल्‍यांनतर त्‍यांनी माझ्या एकुलत्‍या एक मुलीला मारायला नको होते.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार वडील भंवर सिंह यांनी पति बलराज सिंह, सासरा भवानी सिंह, सासु तसेच आत्‍येसासु यांच्‍याविरूद्ध गुन्‍हा दाखल केला आहे. 


अद्यापही अटक नाही.

मकराना पोलिस ठाण्‍यातील पोलिस कर्मचा-यांना जयपूर येथे पाठविले असुन सदरील घटनेचा तपास सुरू आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्‍यात आलेली नसल्‍याचे मकराना ठाणे अंमलदार सहदेव चौधरी यांनी सांगतिले.

बातम्या आणखी आहेत...