आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरा करत होता सुनेचा छळ, शारिरीक संबंध बनविण्यासाठी टाकत होता दबाव; पोलिस ठाण्यात गेल्यावर तिला मागितला पुरावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर (हरियाणा) : जगाधारी येथील एका विवाहितेने आपल्या सासऱ्याविरूद्ध गैरवर्तन केल्याप्रकरणी आणि छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होऊन एक महिना झाला पण अद्यापही सासऱ्याविरूद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे सदर पीडिता आपल्या 4 महिन्याच्या मुलासोबत एसपी ऑफिसमध्ये दाखल झाली. तसेच मला न्याय द्या असे पोस्टर तिने आपल्यासोबत आणले होते. 


अश्लील चाळे करत असल्याचा पुरावा मागत होते डीएसपी

महिलेने आरोप केला आहे की, ती पोलिस ठाण्यात गेली असता तिचे म्हणणे कोणीही ऐकले नाही. उलट डीएसपीने तिच्याकडे अश्लील चाळे करण्याचा पुरावा मागत आहे. तेथे न्याय मिळत नसल्यामुळे तिने एसपीकडे न्याय मागितला आहे. सदर प्रकरणाची पूर्ण चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे डीएसपींनी तिला आश्वासन दिले आहे. 


जबरदस्तीने संबंध बनवण्यासाठी दबाव टाकत होता सासरा 

जानेवारी 2017 मध्ये महिलेचा विवाह झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी तिचा छळ करण्यास सुरुवात केली. छळाला कंटाळून ती माहेरी गेली. तेथेच तिने मुलाला जन्म दिला. यादरम्यान तिचा पती त्यांचा खर्च उचलणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. भाऊबीजेनंतर तिचा पती तिला नेण्यासाठी आला होता. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या सासऱ्याने माहेरीच तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तेथे तिच्यावर संबंध बनविण्यासाठी दबाव टाकला होता. सासऱ्याच्या या छळाला कंटाळून तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी सासऱ्याविरूद्ध केस दाखल करून घेतली. पण अद्यापही या प्रकरणाबाबत सासऱ्याला अटक करण्यात आली नाही. 

बातम्या आणखी आहेत...