Home | National | Other State | daughter in law escaped with the Gold and 5 lakh cash from the house

9 महिन्यांपूर्वी झाले लग्न, पीडित म्हणाला- न्याय नाही मिळाला तर करेल आत्महत्या

नॅशनल डेस्क | Update - Feb 13, 2019, 03:31 PM IST

दिवसाढवळ्या नव्या नवरीने पती आणि सासरच्या लोकांना दाखवले तारे..., पीडित म्हणाला- न्याय नाही मिळाला तर आत्महत्या करणार

  • गुरुदासपूर - येथिल एका विवाहितेने दिवसाढवळ्या आपल्या सासरच्या लोकांना गुंगीचे औषध देऊन घरातून 12 तोळे सोन आणि 5 लाख 35 हजारांची कॅश तसेच महत्त्वाचे कागदपत्र घेऊन पोबारा केला. पीडित कुटुंबातील गगन शर्मा यांच्यानुसार- 9 महिन्यांपूर्वी त्याचे लग्न दीप्तीसोबत झाले होते. गगन गुरुदासपूर येथे प्रायव्हेट इन्स्टिट्यूट चालवून घर चालवत आहे.


    लग्नानंतर दीप्तीसोबत त्याचे कधीही भांडण झाले नाही. सोमवारी दुपारी दीप्तीने आपल्या मोठ्या जावेला आणि सासूला दुधातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिने घरातून 12 तोळे सोन, 5 लाख 35 हजारांची कॅश आणि गगनच्या गाडीचे कागदपत्र घेऊन आपल्या कुटुंबियांसोबत हे शहर सोडले. गगननुसार, शेजारी राहणाऱ्या काही लोकांना दीप्ती आणि आणखी दोन तरुणांना घरातून सामान घेऊन जाताना पाहिले आहे.


    दीप्तीचे हे दुसरे लग्न
    गगनने दिलेल्या माहितीनुसार, दीप्तीचे त्याच्यासोबत हे दुसरे लग्न आहे. दीप्तीचे पहिले लग्न उधमपूर येथे झाले होते. तेथून 2014 मध्ये तिने घटस्फोट घेतला आणि तेथील सासरच्या लोकांकडून 17 लाख रुपये घेतले होते. या सर्व चोरीचा आरोप गगनने आपल्या सासरवाडीवर लावला आहे. गगनने सांगितले की, न्याय मिळाला नाही तर तो आत्महत्या करणार आणि यासाठी दिप्तीला जबाबदार धरावे.

  • daughter in law escaped with the Gold and 5 lakh cash from the house
  • daughter in law escaped with the Gold and 5 lakh cash from the house

Trending