आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मामावर जडले प्रेम, आई-वडिलांनी केला विरोध, फावड्याने केली हत्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नौज(उत्तर प्रदेश)- जिल्ह्यातील गुरसहायगंजमधील गौरियापूरगावात एका दाम्पत्याला फावड्याने कापून मारण्यात आले. या हत्येच्या मागे त्यांची मुलगी संगीता आणि मुलीचा मामा यांचा हात असल्याचे समोर आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

गौरियापूरगावात गावात संगीता आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. संगीताचे तिच्या सख्या मामासोबत प्रेंम संबंध होते. तिच्या आई-वडिलांचा या प्रेमाला विरोध होता, एके दिवशी संगीताच्या आईने त्या दोघांना आपत्तीजनक परिस्थीत पाहिले आणि संगीताला खुप मारले.

 

 

आईच्या मारण्याने नाराज झालेल्या संगीताने आई-वडिलांना आपल्या प्रेमाच्या मार्गातून बाजुला करण्याचा निर्णय घेतला. या कटात तिने प्रियकर मामाला ही सामील करून घेतले. रात्री आई -वडील झोपल्यावर संगीता आणि मामाने त्यांच्यावर फावड्याने वार केले, त्यात वडिलांचा जागीच मृत्यु  झाला. 

 

त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि पाहिले की, संगीताच्या वडिलांचा जागीच मृत्यु झाला आहे तर तिच्या आईचा श्वास सुरू आहे. पोलिसांनी गंभीर जखमी झालेल्या संगीताच्या आईला रूग्णालयात भर्ती केले पण उपचारादरम्यान त्यांनी जीव सोडला.

 

घटनेनंतर आरोपी फरार झाले. पोलिसांना आधी वाटले की, चोरीच्या उद्देशाने दोघांचा खून झाला असावा पण नंतर तपासात समोर आले की, संगीता आणि तिचा प्रियकर मामा या दोघांनी मिळून हा खून केला आहे. पोलिसांनी आरोपी संगीता आणि तिच्या मामाला अटक केले. त्या दोघांनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली.