आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनच्या लाडक्या लेकीने पूर्ण केले ग्रॅज्युएशन, लंडनमधून या विषयात मिळवली पदवी.. पाहा PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा हिने तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. शुक्रवारी साराने तिचे ग्रॅज्युएशन सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले, या पोस्टला सध्या पसंती मिळत आहे. साराने लंडन युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युशन पूर्ण केले आहे. ग्रॅज्युएशन सेरेमनीसाठी सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकरही खास उपस्थित होते.

 

साराने पोस्ट केला फोटो..

साराने सोशल मीडियावर ग्रॅज्युएशनचा फोटो पोस्ट केला. त्यावर साराने लिहिले..What I did.. तसेच तिचा सचिन आणि अंजली बरोबरचा फोटोही व्हायरल होत आहे. या फोटोत सारा ग्रॅज्युएशन सेरेमनीला परिधान केला जाणारा ब्लॅक गाऊन आणि ग्रॅज्युएशन कॅप परिधान केलेली दिसत आहे.  


सचिनची कन्या सारा लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये (UCL) मेडिसिनचे शिक्षण घेत होती. नुकत्याच झालेल्या या सेरेमनीमध्ये तिला तिची मेडिसीनची पदवी मिळाली. साराची आई अंजली ही देखिल डॉक्टर आहे. या सेरेमनीनंतर साराने ग्रॅज्युएशन कॅप हवेत भिरकावत सेलिब्रेशनही केले. लंडनला ग्रॅज्युएशनसाठी जाण्यापूर्वी साराने मुंबईच्या Dhirubhai Ambani International School मधून शालेय शिक्षण पूर्ण केले होते. 

 

पुढे पाहा, साराच्या ग्रॅज्युएशन सेरेमनीचे PHOTOS

बातम्या आणखी आहेत...