आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Daughter Sarah Reveals What Mother Amrita Said Whn She Heard The News Of Saif's Second Marriage

सैफच्या दुसऱ्या लग्नाची बातमी ऐकताच काय म्हणाली होती अमृता, पहिल्यांदा मुलगी साराने केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सारा अली खान बॉलिवूडच्या जबरदस्त नवोदित अभिनेत्रींनपैकी एक आहे. आयफा अवॉर्ड 2019 दरम्यान 'केदारनाथ' साठी बेस्ट डेब्यूचा अवॉर्डदेखील दिला गेला होता. अशातच सारा अली खानने आपल्या मुलाखतीदरम्यान वडिल सैफ अली खान आणि करिना कपूर यांच्या लग्नाबद्दल एक खास गोष्ट सांगितली. जे कळल्यावर सर्वजण हैरान होतील.  

सारा अली खानने सांगितले की, जेव्हा सैफ करीना कपूरसोबत लग्न करणार होता. तेव्हा तिच्या आईने तिला सर्वात सुंदर लेहंगा दिला होता. सारा अली खानने हे हॅलो मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. अभिनेत्री म्हणाली, "जेव्हा माझे वडिल करिनासोबत लग्न करत होते. तेव्हा मला चांगले आठवते मी माझ्या आईसोबत लॉकरजवळ गेले आणि तिथून दागिने काढू लागले. मी माझ्या आईला विचारले की, मी कोणते कानातले घातले पाहिजे ? त्यानंतर तिने संदीप आणि अबु यांना बोलावले आणि म्हणाली, "सैफ लग्न करणार आहे आणि माझी इच्छा आहे की, साराने सर्वात सुंदर लेहंगा घालावा."