आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • David Dhawan Said About The Incident With Son Varun On The Set Our Hands And Feet Swelled Up After Seeing Him.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेटवर मुलगा वरुणसोबत घडलेल्या अपघाताविषयी डेविड धवन म्हणाले - त्याला बघून माझे हात पाय थरथर कापायला लागले होते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूडचा हॅण्डसम हंक म्हणून अभिनेता वरुण धवन आगामी 'कुली नंबर 1' या चित्रपटातील एका स्टंट सीनचे चित्रीकरण करताना बाल-बाल बचावला. या अपघाताविषयी वरुणचे वडील आणि दिग्दर्शक डेविड धवन यांनी इंग्रजी वेबसाइटसोबत बातचित केली. त्यावेळी ते म्हणाले, ''सीन खराखुरा वाटावा यासाठी वरुण काहीही करु शकतो. कार पहाडावरुन खाली उलटी लटकत ऐन शॉटवेळी कारचा दरवाजा अडकला. हे बघून माझ्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. माझे हात पाय थरथर कापायला लागेल होते. त्यावेळी काहीही घडू शकले असते. पण सुदैवाने सर्वकाही ठिक झाले. वरुणला गाडीतून सुखरुप बाहेर काढण्यास आम्हाला यश आले. यावेळी वरुण अगदी संयम आणि धीराने वागला.''  ही घटना अलीकडेच पुण्यात चित्रीकरणादरम्यान घडली. पहाडावरुन कार खाली लटकत असताना त्या कारमध्ये वरुण क्लोजअप शॉट देत होता. 

  • चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती...

वडील म्हणून तुम्ही मुलाला हा थरारक स्टंट सीन करण्यापासून रोखू शकला असता? असा प्रश्न डेविड यांना विचारला असता ते म्हणाले, वरुणच नव्हे तर जेव्हा कधीही अॅक्शन सीन असतो, तेव्हा आम्ही सर्व कलाकारांना सुरक्षा व्यवस्था पुरवत असतो. आम्ही वरुणसाठीही चोख व्यवस्था केली होती. पण आजचे तरुण अभिनेते स्वतः जोखिम घेऊ इच्छितात. वरुणसुद्धा आजच्या जनरेशनचा आहे. तो पडद्यावर एखादा सीन रिअल वाटावा यासाठी काहीही करु शकतो. 

  • यापुढे घेणार नाही रिस्क...

डेविड म्हणाले की, ते यापुढे कोणत्याही कलाकाराच्या बाबतीत अशी जोखिम घेणार नाहीत. ते म्हणाले, माझ्या चित्रपटांमध्ये सहसा कॉम्पिकेटेड अॅक्शन सीन नसतात. पण 'कुली नंबर 1'च्या रिमेकमध्ये असे काही सीन टाकण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. पण यापुढे मी अशा थरारक स्टंटसाठी परवानगी देणार नाही. प्रेक्षक माझे विनोदी चित्रपट बघण्यासाठी येतात, थ्रिलसाठी नाही.

  • मॉरिशसमध्ये चित्रीत होतील दोन गाणी...

डेविड धवन यांनी सांगितल्यानुसार, या चित्रपटाचे जवळजवळ चित्रीकरण पूर्ण झाले आहे. केवळ दोन गाण्यांचे चित्रीकरण राहिले असून ही गाणी मॉरिशसमध्ये चित्रीत केली जाणार आहेत. ही गाणी पूर्ण होताच आमचा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शनासाठी सज्ज होईल. डेविड धवन यांच्यानुसार, जुन्या आणि नवीन 'कुली नं. 1'ची तुलना होऊ शकत नाही.  वरुण धवन स्टारर 'कुली नं. 1' मध्ये जुन्या चित्रपटातील 'हुस्न है सुहाना' आणि 'मैं तो रास्ते से जा रहा था' ही दोन गाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. 

चित्रपटात वरुण धवनसह सारा अली खान, परेश रावल, राजपाल यादव, शिखा तलसानिया आणि जॉनी लीवर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

बातम्या आणखी आहेत...