आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचा एक दिग्गज प्रोड्यूसर बनवणार वरुण धवनच्या वडिलांच्या चित्रपटांचा रिमेक, खरेदी केले त्यांच्या सर्व नंबर वन टायटल चित्रपटांचे राइट्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क. गतकाळातील जास्तीत जास्त मेकर्सला आजच्या काळात कमी काम मिळतेय. 'गदर' फेम अनिल शर्मा तर वारंवार म्हणतात की, कॉरपोरेट स्टूडिओज आता त्यांच्या जनरेशनला चित्रपटच देत नाही. मग त्यांच्या तरुण असिस्टेंट डायरेक्टरला ते काम देतात. पण आपल्या काळातील हिट डायरेक्टर राहिलेले डेविड धवन त्या हिशोबाने नशीबवान आहेत. विशेषतः 'जुडवां-2' 100 कोटींच्या क्लबमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील प्रोड्यूसर्सचा विश्वास वाढला आहे. साजिद नाडियाडवाला त्यांच्या प्रसिध्द टायटल असणा-या चित्रपटांचे राइट्स घेत आहे अशा चर्चा आहेत. येणा-या काळात ते त्यांच्या चित्रपटांचे रीमेक बनवणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व चित्रपटांचे डायरेक्शन आजच्या काळातील डायरेक्टर्स नाही तर डेविड धवन यांच्याकडून करुन घेणार आहेत. यापुर्वी डेविड यांनी तापसी पन्नूसोबत दीप्ती नवल-फारुख शेख यांच्या चश्मेबद्दूर चित्रपटाचा रिमेक बनवला होता. साजिद नाडियाडवाला दिर्घकाळापासून साउथ चित्रपटांचे राइट्स खरेदी करुन त्याचा रिमेक बनवत आहेत. पण आता ते हिंदी चित्रपटांचे रिमेक बनवणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...