आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेव्हिड धवनचे किस्से व त्याचे मसाला चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट निर्माते डेव्हिड धवन आपल्या २५ वर्षांपूर्वीच्या 'कुली नंबर एक' चित्रपटात काही बदल करून पुन्हा तोच चित्रपट बनवत आहेत. त्यांचे चिरंजीव या कामी त्यांना मदत करीत आहेत. डेव्हिड धवनचे भाऊ बाबूराम इशारा यांच्या 'चेतना'मध्ये अभिनय केला होता. त्यांनीच डेव्हिड यांना पुण्यातील चित्रपट संस्थेत पाठवले, जेथे डेव्हिड यांनी याचे प्रशिक्षण घेतले. डेव्हिड यांनी गोविंदासोबत अनेक मसालेदार मनोरंजनपर चित्रपट बनवले. मसालेदार यांचा मुलगा वरुण धवन हे यशस्वी कलावंत असून त्यांनी मनोरंजनपर चित्रपटांबरोबर 'बदला'सारख्या थरारपटातही भूमिका केली आहे. डेव्हिड यांनी सलमानसोबतही अनेक चित्रपट बनवले व सलमान आजही त्यांचा सल्ला घेतात. डेव्हिड व त्यांचे पुत्र त्यांच्या मोठ्या काकांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. अशा प्रकारे चित्रपट व्यवसायात धवन घराणे सक्रिय आहे.   डेव्हिड यांनी पुण्यातील संस्थेत जगातील सर्वोत्कृष्ट चित्रपट पाहिलेले आहेत. तेथील विद्यार्थ्यांना अभिजात व कलात्मक चित्रपट पाहणे बंधनकारक असून तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे. त्यांनी असे चित्रपट पाहिलेही, पण तसे चित्रपट बनवण्याचा कधी विचार केला नाही. त्यांनी कायम मसालेदार चित्रपट बनवले व प्रेक्षकांना खळखळून हसवणे हाच आपला धर्म मानला. सामाजिक संदेशाच्या चित्रपटांचा त्यांनी कधीच विचार केला नाही. ते आपल्या आवडीनिवडी व मर्यादा ओळखतात आणि त्यांना त्या वाढवण्यात काही रस नाही. स्वत:ला ओळखणे हीसुद्धा काही लहान गोष्ट नाही. प्रतिभाहीन लोक महत्त्वाकांक्षेच्या वारूवर स्वार होतात व अपयशासारखा रोग लावून घेतात. अशा गोष्टीला बालपणीच्या घोड्याच्या रपेटसारखे मानले जाते. याच विचाराच्या पैलूलाही टाळले जाऊ नये व आपल्या सीमांचा विस्तार करण्याच्या इच्छेमुळे मनुष्य प्रकृती आणि जीवनाची रहस्ये उलगडत आहे.   मॅडम क्युरी वर्षानुवर्षे प्रयोगशाळेत असायच्या. त्यांच्याकडे मुबलक साधनसामग्रीही नव्हती व थंडीपासून वाचण्यासाठी उबदार वस्त्रेेही नव्हती. परंतु एके रात्री त्यांनी प्रयोग बंद करण्याचे ठरवले आणि त्याच जागी खुर्चीवर त्या झोपी गेल्या. उठल्यानंतर त्यांनी एक शेवटचा प्रयत्न केला व त्यांना त्यात यश मिळाले. मॅडम क्युरी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सीमारेषा विस्तारण्यात गर्क होत्या. त्यांना दोन वेळा नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशाच प्रकारे डेव्हिड धवन खूप निष्ठेने मसालेदार चित्रपट बनवत आहेत.   एकेकाळी डेव्हिड धवन यांचे वजन खूप वाढले होते. डॉक्टरांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिला. ज्या तन्मयतेने ते विनोदी चित्रपट बनवतात अगदी त्याच पद्धतीने त्यांनी वजन कमी करणे सुरू केले. सॅलड त्यांनी जेवणाप्रमाणे आणि जेवण चटणीइतके कमी केले. त्या वेळी मी त्यांना म्हणालो की, तुम्ही वजन कमी करण्याचा कितीही प्रयत्न करा, पण तुम्ही डेव्हिड धवनचे डेव्हिड लीन कधीच होऊ शकणार नाही. डेव्हिड लीन यांनी 'डॉ. जिवागो', 'लारेन्स ऑफ अरेबिया' आणि 'ब्रिजेस ऑफ रिवर क्वाई'सारखे क्लासिक्स बनवले. त्यांनी कायम महाकाव्यात्मक चित्रपट रचले आहेत. पण डेव्हिड धवन विडंबनात्मक चित्रपट बनवतात आणि सीमारेषेत राहूनच काम करीत आहेत.   यात महत्त्वाचे असे की, डेव्हिड जाड असताना त्यांचे चित्रपट मनोरंजक असायचे व आता त्यांनी त्यांचे वजन कमी केले आहे, तर चित्रपटही सपक झाले आहेत. मनुष्याच्या जीवनप्रक्रियेशी जेवणाचा जवळचा संबंध आहे. राजश्री प्रॉडक्शन कंपनी आपल्या संपूर्ण युनिटला शुद्ध शाकाहारी जेवण देते.

बातम्या आणखी आहेत...