आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिता डेव्हिड धवनने 'फादर्स डे' दिवशी वरुण धवनच्या कानशिलात लगावली, व्हायरल होत आहे व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलीवूड डेस्क - बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सध्या आपल्या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पण असे असले तरी तो सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असतो. वरुणने नेहमीच आपल्या इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया अकाउंटवर आपले फोटोज आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असतो. या फादर्स डे ला वरुण धवनने पिता डेव्हिड धवनसोबतचा एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओमध्ये डेव्हिड धवन वरुण धवनला चापट मारत असल्याचे दिसत आहे. सोबतच दोघेही मस्ती करत असल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले. वरुण धवनचा हा व्हिडिओ अपलोड होताच चांगलाच व्हायरल झाला आहो. 

 


बॉलीवूड कलाकारांनी व्हिडिओवर केल्या कमेंट्स
वरुणने 'फादर्स डे' च्या दिवशी आपल्या वडिलांसोबत व्हिडिओ करत आपल्या भावना व्यक्त केल्या. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत वरुणने लिहिले की, 'बाप बाप असतो. माझ्या वडिलांनी मला प्रेमाने मारल्यास मला त्यांच्या प्रेमाची जाणीव होते. याबाबत तुम्हाला काय वाटतं?' वरुण धवनच्या या व्हिडिओवर अनेक बॉलीवूड कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत. राजपाल यादवने वरुणच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले की, डेव्हिड सरांच्या मारण्यात देखील खूप प्रेम असते. तर अभिनेत्री प्राची शाह ने हा व्हिडिओ खूपच प्रेमळ असल्याचे सांगतिले. 

बातम्या आणखी आहेत...