Home | Sports | Other Sports | david ferer and samantha stotsur enter second round in french open

जोकोविच, स्टोसूर, फेरर दुसऱ्या फेरीत

Agency | Update - May 23, 2011, 01:28 PM IST

ऑस्ट्रेलियाची सामंता स्टोसूर आणि पुरुष गटात सातवा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.

  • david ferer and samantha stotsur enter second round in french open

    पॅरिस : गेतवेळची महिला उपविजेती ऑस्ट्रेलियाची सामंता स्टोसूर आणि पुरुष गटात सातवा मानांकित स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, याच वेळी क्रोएशियाचा मारिन सिलिच आणि इस्रायलची सहर पीर यांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.

    आठव्या मानांकित स्टोसूरने चेक गणराज्याच्या इवेता बेनेसोवा हिला सरळ सेटमध्ये ६-२, ६-३ ने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत तिचा सामना रशियाच्या ऍना कुद्रिवत्सेवाशी होईल. तिने पहिल्या फेरीत रोमानियाच्या सिमोना हालेप हिला ६-२, ६-१ ने नमविले.

    पुरुष गटात फेररने फिनलँडच्या जार्को निमिनेनला सरळ सेटमध्ये ६-३, ६-१ ने पराभूत केले. फेररशिवाय १७ वा मानांकित फ्रान्सचा वेल्फ्रिड त्सोंगा, स्पेनचा अल्बर्ट मोंटानेस, गुलेरमो लोपेज यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केला. सिलिच याला स्पेनच्या रामिरेज हिदाल्गो याने सरळ सेटमध्ये ७-६, ६-४ ने पराभूत करून फ्रेंच ओपनमधून बाहेर केले. महिला गटात स्टोसुरशिवाय सर्बियाच्या येलेना यांकोविच, फ्रान्सची एलिजा कार्नेट, अर्जेंटिनाची गिसेला डुल्को, बग्लेरियाची स्वेताना पिरोनकोवा यांनीही दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. मात्र, सहर पीर हिला स्पेनच्या मारिया जोन्स मार्टिनेज सांचेज हिने ७-६, ६-१ ने पराभूत केले.

Trending