Home | International | Other Country | david headley says to in court isi planed to attack on indian nuclear power plant

भारतातील अणुभट्ट्यांवर हल्ला करण्याचे आयएसआयचे नियोजन होते- डेवि़ड हेडली

agency | Update - May 26, 2011, 08:14 PM IST

मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेविड हेडली याला पाकिस्तानातील काही दहशतवादाच्या गटाच्या म्होरक्यांनी भारतातील अणुभट्ट्यांची माहिती गोळा करण्यासाठी सांगितले होते.

  • david headley says to in court isi planed to attack on indian nuclear power plant

    वॉशिंग्टन - मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेविड हेडली याला पाकिस्तानातील काही दहशतवादाच्या गटाच्या म्होरक्यांनी भारतातील अणुभट्ट्यांची माहिती गोळा करण्यासाठी सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसारच भारतात जाऊन हे्डलीने तेथील अणुभट्ट्यांची माहिती पाकिस्तानात विस्ताराने पुरवत एक अहवाल सादर केला होता. हेडलीवर शिकागो न्यायालयात मुंबईत हल्ला केल्याप्रकरणी खटला चालू असून त्यादरम्यान त्याने ही माहिती दिली. तसेच पाकिस्तानात आयएसआयकडे प्रशिक्षण घेतल्याचे नमूद केले.
    हेडलीवर मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून त्याबाबतची सुनावणी शिकागोमधील न्यायालयात चालू आहे. त्यादरम्यान त्याने हल्ल्यासंदभार्तील विविध माहिती दिली. हेडलीचा जुना साथीदार तहव्वुर राणा यांच्याविरोधात हेडलीने माहिती दिल्याचे त्यांच्या वकिलाने सादर केलेल्या कागदपत्रामुळे उघड झाले आहे. यात म्हटले आहे की, आयएसआयचा अधिकारी मेजर इकबाल यानेच हेडलीला भारतात जाण्यासाठी भारतीय चलनाचे पैसे दिले होते. त्यामुळे त्याला भारतात कोणतीही अडचण आली नाही. याकाळात हेडलीने भारतातील अणुभट्ट्यांची व इतर सविस्तर माहिती गोळा केली. काही ठिकाणाचे छायाचित्रणही केले. त्यानंतर तो पाकिस्तानात गेल्यानंतर जकी, अबु कहाफा यांच्यासह काही दहशतवाद्यांना भेटला होता.
    तसेच पाकिस्तानातच आपल्याला टेहाळणी करण्याचे प्रशिक्षण मिळाले असल्याचे त्याने न्यायालयात सांगितले. यामुळे मुंबईतील हल्ला हा पाकिस्ताननेच केला असल्याच्या आरोपाला मोठा पुरावा मिळाल्याचे मानण्यात येत आहे.

Trending